मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
यहेज्केल
1. {#1यहेज्केल बंदिवासाचे चित्र दर्शवतो } [PS]परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
2. “मानवाच्या मुला, तू या बंडखोर घराण्याच्या लोकात राहतो, जेथे त्यांच्याकडे बघण्याचे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत, आणि त्यांच्याकडे कान आहेत पण ते ऐकू शकत नाही, कारण ते बंडखोर घराणे आहेत.
3. तथापि मानवाच्या मुला तुझ्यासाठी सर्व काही हद्दपार करण्याची तयारी कर, आणि त्यांच्या डोळ्यांदेखत बाहेर निघून जा, मी तुला तुझ्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर हद्दपार करीन. कदाचित त्यांना कळून येईल ते फितुर घराण्यातले आहेत.
4. आणि तू बाहेर हद्दपार जातांना आपल्या वस्तू दिवसा ढवळ्या त्यांच्या डोळ्यांदेखत घेऊन जाशील; बाहेर हद्दपार होतांना सायंकाळी त्यांच्या नजरे देखत निघून जा.
5. त्यांच्या नजरे देखत भिंतीला (वेशीला) एक भगदड पाड, आणि त्यातून बाहेर निघ.
6. त्यांच्या डोळ्यादेखत आपले सामान वस्तू आपल्या खांद्यावर घे, आणि त्यांना अंधारात घेऊन जा, आणि तोंड झाकून घे म्हणजे तुला जमीन दिसणार नाही, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी हे चिन्ह ठेवले आहे.”
7. म्हणून मी हे केले, जसे तू मला बजावले, दिवसा ढवळ्या मी सर्व वस्तू बाहेर हद्दपार आणल्या, आणि सायंकाळी आपल्या हातांनी वेशीला भगदड पाडले. मी माझ्या सर्व वस्तू अंधारात बाहेर काढल्या आणि त्यांच्या डोळ्यांदेखत सर्व आपल्या खांद्यावर घेऊन आलो.
8. मग परमेश्वर देवाचे शब्द मला प्रभात समयी आले,
9. “मानवाच्या मुला, हे इस्राएलाच्या घराण्या तू काय करतोस, बंडखोर पणा तू केला नाहीस काय?”
10. त्यांना सांग, परमेश्वर प्रभू देव हे सांगतो ही भविष्यात्मक कृती यरूशलेमेच्या राजपुत्रांना, आणि सर्व येथे जमलेल्या इस्राएलाच्या घराण्यासाठी आहे.
11. असे सांग, मी तुम्हासाठी खुण देतो की, जे मी केले ते सर्वांसाठी होईल; ते सर्वजण सरहद्दपार गुलामगिरीत जातील.
12. त्यांच्यातला राजा अंधारात सामान आपल्या खांद्यावर घेऊन जाईल आणि तो वेशीच्या बाहेर निघून जाईल. तो वेशीला भगदड पाडून आपले सामान घेऊन जाईल, तो आपले तोंड झाकील, त्यामुळे आपल्या डोळ्यांनी जमीन बघणार नाही.
13. मी आपली जाळी त्यांच्यावर टाकीन आणि तो माझ्या फंद्यात पकडला जाईल; मग मी त्यांना बाबेलात खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन, पण ती भूमी ते बघणार नाही त्यामध्ये त्यांचा अंत होईल.
14. मी त्यांना सगळ्या अवतीभोवती असलेल्या त्यांच्या मदत करणाऱ्यांना व त्यांच्या सेनेची पांगापांग करेन, आणि त्यांचा पाठलाग तलवारीने करेन.
15. मग त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा मी त्यांना देशातून संपूर्ण भूमीतून पांगवेन.
16. पण त्यांच्यातील काही लोकांस तलवारीने, दुष्काळाने, आणि साथीच्या रोगाने पांगवेन, ज्या भूमीत मी त्यांना घेऊन गेलो तेथे त्यांनी त्यांच्या घृणास्पद गोष्टीची नोंद केलेली असेल, म्हणून त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे.
17. परमेश्वराचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
18. मानवाच्या मुला आपली भाकर थरथरत खाऊन टाक, आणि आपले पाणी थरकापत आणि चिंतातुर होऊन पिवून घे.
19. मग त्या भूमीतील लोकांस सांग, प्रभू परमेश्वर हे यरूशलेम रहिवाशासंबंधी सांगतोय; इस्राएल निवासी तुम्ही आपली भाकर थरथर कापत खाल व पाणी प्याल आजपावोत तुमची भूमी लुटली जाईल कारण जे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या हिंसेमुळे हे घडेल.
20. म्हणून त्यांच्या राहत्या नगराला उध्वस्त केले जाईल, आणि भूमी ओसाड नापीक होईल; मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे.
21. पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
22. मानवाच्या मुला, इस्राएलाच्या भूमीत जी तुझी प्रसिध्द म्हण आहे, प्रदीर्घ दिवसात सर्व दृष्टांत वायफळ ठरतील.
23. यास्तव त्यांना सांग परमेश्वर प्रभू देव असे म्हणतो, मी या म्हणीला संपुष्टात आणिन यासाठी की इस्राएलात याचा पुन्हा कोणी वापर करणार नाही. “मग त्यांना जाहीर कर, दिवस जवळ येत आहेत सर्व बोलके होतील”
24. आता येथून पुढे कोणतेही पाखंडी दृष्टांत नसणार किंवा अनूकुल भविष्य कथन इस्राएलात होणार नाही.
25. मी परमेश्वर देव आहे आणि मी बोलत आहे. मी बोललेले शब्द पूर्ण करेन. आता येथे उशिर होणार नाही. हे परमेश्वर देव बंडखोर घराण्याला जाहीर करतो की, मी बोललेले शब्द पूर्ण करतो.
26. पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
27. मानवाच्या मुला पहा! इस्राएलाचे घराणे म्हणेल जो दृष्टांत अनेक दिवसा पासून पाहिला आणि पुढच्या काळासाठी भाकीत पूर्ण येत आहे.
28. यास्तव त्यांना सांग परमेश्वर देव असे म्हणतो; माझ्या शब्दाला उशीर होणार नाही, जो शब्द मी बोललो तो पूर्ण करणार आहे, हे परमेश्वर देव जाहीर करत आहे. [PE]
Total 48 अध्याय, Selected धडा 12 / 48
यहेज्केल बंदिवासाचे चित्र दर्शवतो 1 परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, 2 “मानवाच्या मुला, तू या बंडखोर घराण्याच्या लोकात राहतो, जेथे त्यांच्याकडे बघण्याचे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत, आणि त्यांच्याकडे कान आहेत पण ते ऐकू शकत नाही, कारण ते बंडखोर घराणे आहेत. 3 तथापि मानवाच्या मुला तुझ्यासाठी सर्व काही हद्दपार करण्याची तयारी कर, आणि त्यांच्या डोळ्यांदेखत बाहेर निघून जा, मी तुला तुझ्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर हद्दपार करीन. कदाचित त्यांना कळून येईल ते फितुर घराण्यातले आहेत. 4 आणि तू बाहेर हद्दपार जातांना आपल्या वस्तू दिवसा ढवळ्या त्यांच्या डोळ्यांदेखत घेऊन जाशील; बाहेर हद्दपार होतांना सायंकाळी त्यांच्या नजरे देखत निघून जा. 5 त्यांच्या नजरे देखत भिंतीला (वेशीला) एक भगदड पाड, आणि त्यातून बाहेर निघ. 6 त्यांच्या डोळ्यादेखत आपले सामान वस्तू आपल्या खांद्यावर घे, आणि त्यांना अंधारात घेऊन जा, आणि तोंड झाकून घे म्हणजे तुला जमीन दिसणार नाही, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी हे चिन्ह ठेवले आहे.” 7 म्हणून मी हे केले, जसे तू मला बजावले, दिवसा ढवळ्या मी सर्व वस्तू बाहेर हद्दपार आणल्या, आणि सायंकाळी आपल्या हातांनी वेशीला भगदड पाडले. मी माझ्या सर्व वस्तू अंधारात बाहेर काढल्या आणि त्यांच्या डोळ्यांदेखत सर्व आपल्या खांद्यावर घेऊन आलो. 8 मग परमेश्वर देवाचे शब्द मला प्रभात समयी आले, 9 “मानवाच्या मुला, हे इस्राएलाच्या घराण्या तू काय करतोस, बंडखोर पणा तू केला नाहीस काय?” 10 त्यांना सांग, परमेश्वर प्रभू देव हे सांगतो ही भविष्यात्मक कृती यरूशलेमेच्या राजपुत्रांना, आणि सर्व येथे जमलेल्या इस्राएलाच्या घराण्यासाठी आहे. 11 असे सांग, मी तुम्हासाठी खुण देतो की, जे मी केले ते सर्वांसाठी होईल; ते सर्वजण सरहद्दपार गुलामगिरीत जातील. 12 त्यांच्यातला राजा अंधारात सामान आपल्या खांद्यावर घेऊन जाईल आणि तो वेशीच्या बाहेर निघून जाईल. तो वेशीला भगदड पाडून आपले सामान घेऊन जाईल, तो आपले तोंड झाकील, त्यामुळे आपल्या डोळ्यांनी जमीन बघणार नाही. 13 मी आपली जाळी त्यांच्यावर टाकीन आणि तो माझ्या फंद्यात पकडला जाईल; मग मी त्यांना बाबेलात खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन, पण ती भूमी ते बघणार नाही त्यामध्ये त्यांचा अंत होईल. 14 मी त्यांना सगळ्या अवतीभोवती असलेल्या त्यांच्या मदत करणाऱ्यांना व त्यांच्या सेनेची पांगापांग करेन, आणि त्यांचा पाठलाग तलवारीने करेन. 15 मग त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा मी त्यांना देशातून संपूर्ण भूमीतून पांगवेन. 16 पण त्यांच्यातील काही लोकांस तलवारीने, दुष्काळाने, आणि साथीच्या रोगाने पांगवेन, ज्या भूमीत मी त्यांना घेऊन गेलो तेथे त्यांनी त्यांच्या घृणास्पद गोष्टीची नोंद केलेली असेल, म्हणून त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे. 17 परमेश्वराचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, 18 मानवाच्या मुला आपली भाकर थरथरत खाऊन टाक, आणि आपले पाणी थरकापत आणि चिंतातुर होऊन पिवून घे. 19 मग त्या भूमीतील लोकांस सांग, प्रभू परमेश्वर हे यरूशलेम रहिवाशासंबंधी सांगतोय; इस्राएल निवासी तुम्ही आपली भाकर थरथर कापत खाल व पाणी प्याल आजपावोत तुमची भूमी लुटली जाईल कारण जे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या हिंसेमुळे हे घडेल. 20 म्हणून त्यांच्या राहत्या नगराला उध्वस्त केले जाईल, आणि भूमी ओसाड नापीक होईल; मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे. 21 पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, 22 मानवाच्या मुला, इस्राएलाच्या भूमीत जी तुझी प्रसिध्द म्हण आहे, प्रदीर्घ दिवसात सर्व दृष्टांत वायफळ ठरतील. 23 यास्तव त्यांना सांग परमेश्वर प्रभू देव असे म्हणतो, मी या म्हणीला संपुष्टात आणिन यासाठी की इस्राएलात याचा पुन्हा कोणी वापर करणार नाही. “मग त्यांना जाहीर कर, दिवस जवळ येत आहेत सर्व बोलके होतील” 24 आता येथून पुढे कोणतेही पाखंडी दृष्टांत नसणार किंवा अनूकुल भविष्य कथन इस्राएलात होणार नाही. 25 मी परमेश्वर देव आहे आणि मी बोलत आहे. मी बोललेले शब्द पूर्ण करेन. आता येथे उशिर होणार नाही. हे परमेश्वर देव बंडखोर घराण्याला जाहीर करतो की, मी बोललेले शब्द पूर्ण करतो. 26 पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, 27 मानवाच्या मुला पहा! इस्राएलाचे घराणे म्हणेल जो दृष्टांत अनेक दिवसा पासून पाहिला आणि पुढच्या काळासाठी भाकीत पूर्ण येत आहे. 28 यास्तव त्यांना सांग परमेश्वर देव असे म्हणतो; माझ्या शब्दाला उशीर होणार नाही, जो शब्द मी बोललो तो पूर्ण करणार आहे, हे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
Total 48 अध्याय, Selected धडा 12 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References