मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
यहेज्केल
1. {#1बेइमान यरूशलेम } [PS]मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
2. मानवाच्या मुला, त्यांच्या किळस वाण्या कृत्याबद्दल यरूशलेमेस बजावून सांग.
3. असे जाहीर कर परमेश्वर देव यरूशलेमेला असे म्हणतो, तुझी सुरुवात आणि जन्म सुध्दा कनान देशात झाला आहे, तुझा बाप आमोरी आणि आई हित्ती होती.
4. तू जन्मला त्या दिवशी तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने स्वच्छ केले नाही, किंवा मिठ लावून चोपडले नाही, किंवा बाळंत्याने गुंडळले नाही, तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझा तिव्र तिटकारा येऊन तुला उघड्यावर फेकून दिले.
5. कुणाच्या डोळ्यात तुझ्याबद्दल करुणा दिसली नाही, ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तुला मोकळ्या जागेत फेकून दिले.
6. पण मी तुझ्या जवळून जातांना तुला रक्तबंबाळ पाहिले; आणि मी तुझ्या ओघळणाऱ्या रक्ताला जीवन बोललो.
7. मी तुला भूमीतील रोपासारखे पेरले. तू बहुगुणीत झालीस. आणि मोठी झालीस, व तू आभुषणांचा दागीना झालीस, तुला उर फुटले आणि केस दाट झाले, तू बिनवस्त्र होती.
8. मी पुन्हा तुझ्या जवळून गेलो, तेव्हा वेळ तुझ्या प्रेमाच्या विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पांघरुन घालून तुझी नग्नता झाकली. मग मी शपथ वाहून तुझ्याशी करार केला. परमेश्वर देव म्हणतो, या कराराने तू माझी झाली आहेस.
9. मी पाण्याने तुला धुतले, आणि तेलाने तुला मळले.
10. तुला नक्षीकाम केलेले कापड घातले, तुझ्या पायात कातड्याचे जोडे घातले, तुझ्या डोक्याला चांगले रेशमाचे मुलायम कापड घातले.
11. त्यानंतर मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातात कडे घातले आणि गळ्यात साखळी घातली.
12. मी तुला नथ घातली आणि कानात बाळी घातली व सुंदर मुकुट तुझ्या डोक्यात घातला.
13. तुला सोन्यारुप्याने सजवीले, तुला रेशमाच्या कापडाचा व नक्षीकाम केलेला पेहराव घातला, तुला जेवणास मधपोळी तेलासह असत. तू अति सुंदर होतीस कारण तुला दिलेल्या तेजाने तू अप्रतीम होतीस असे परमेश्वर देव म्हणतो.
14. तुझ्या देखणे पणाची चर्चा सर्व राष्ट्रात पसरली, ती तुला परिपूर्ण मोहून टाकणारी आहे, जी मी तुला दिली असे परमेश्वर देव म्हणतो.
15. पण तू आपल्या देखणेपणावर विसंबून राहीली आणि वेश्या कर्म केले, ये जा करणाऱ्यांशी तू वेश्या कर्म केले, त्यांनी तुझे सोंदर्य लुटले.
16. मग तू आपले विविध रंगी कपड्यांनी उच्च स्थाने सजवली, कधी झाली नाही व कधी केली जाणार नाही असे वेश्या कर्म तू केलेस.
17. मी दिलेल्या शोभेच्या सोन्याचांदीच्या दागीन्यांची तू पुरुष प्रतिमा बनवीली आणि त्यांच्या बरोबर तू वेश्या कर्म केले.
18. तू त्यांना नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली त्यांनी तू सुगंधी तेलाचा धुप चढवला.
19. भाकर, पिठ, तेल, मध मी तुला दिले व तुला खाऊ घातले ते तुझ्यापुढे सुवासीक अर्पण असे होते. असे घडले प्रभू परमेश्वर देव जाहीर पणे सांगतो.
20. मग तुझ्या पुत्र कन्यांना जे माझ्यापासून जन्मले त्यांना तू खाऊन टाकण्यासाठी अर्पण केले आणि वेश्याकर्म केलेस.
21. तू मूर्तीच्यापुढे माझ्या लेकरांना अग्नीने जाळून खाक केले व त्यांचे अग्नीअर्पण केले.
22. तुझे सर्व किळसवाणे व वेश्याकर्म तू कुमारी असतांना नग्न होऊन रक्तात लोळत होती याचे स्मरण तुला झाले नाही.
23. तुला हाय हाय असो! असे परमेश्वर देव जाहीर करतो, या सर्व दुष्टपणात आणखी भर,
24. तू आपल्यासाठी संस्कार गृह बांधले, व सार्वजनिक असे पवित्र ठिकाण उभे केले
25. तू पवित्र ठिकाण आपल्यासाठी प्रत्येक रस्त्यावर उभे केले आणि तुझे सौंदर्य जाहीर केले, तू आपले पाय पसरुन आपल्या मना प्रमाणे वेश्या कर्म केले.
26. तू मिसर देशाच्या लोकांशी, शेजाऱ्यांशी जे वासनाधुंद त्यांच्या सोबत वेश्या कर्म केले त्याचा मला राग येतोय.
27. बघ मी माझा हात तुझ्यावर उचलीन व तुझी उपासमार करीन तुझ्या शत्रुंचा हात तुझ्यावर पडेल व पलिष्ट्यांच्या कन्या तुझ्या वासनाधुंदपणाची तुझी लाज काढतील.
28. तू अश्शूरांशी वेश्या काम केले कारण त्यांने तू समाधानी झाली नाहीस. तू समाधान होईपर्यंत वेश्या काम करीत होतीस.
29. तू व्यापाऱ्यांच्या म्हणजे खास्द्यांच्या देशात बरेच वेश्या काम केले किंबहूना यानेही तुझे समाधान झाले नाही.
30. तुझे हृदय इतके कमजोर का? “असे परमेश्वर प्रभू देव जाहीरपणे सांगतो” तू स्वतःच्या मना प्रमाणे निर्लज्ज स्त्री सारखे सर्व काही केले.
31. रस्त्यावर, प्रत्येक नाक्यावर तू संस्कार गृह बांधले व सार्वजनिक ठिकाणी पवित्र ठिकाण उभे केलेस, तू वेश्याकमाई घेतली नाही व वेश्येचा रिवाज मोडला.
32. तू जारीण आपल्या पतीच्या ऐवजी परक्या पुरुषाशी जारकर्म केले.
33. लोक प्रत्येक वेश्येला धन देतात, पण तू आपल्या जारकर्म्यांना उलट पक्षी मोबदला देतेस, तुझ्याशी वेश्या कर्म करावे म्हणून सर्व बाजूने तू त्यांना लाच देतेस.
34. म्हणून तुझ्यात व इतर स्त्रियात फरक आहे, कुणी तुझ्या बरोबर झोपण्यास तयार होत नाही जोपर्यंत तू त्यास मोबदला देत नाही, तो तुला काही धन देत नाही.
35. परमेश्वर देवाचा शब्द तू हे जारीण ऐक.
36. असे परमेश्वर देव म्हणतो, कारण तू आपल्या वासनेची ओतणी करुण निर्लज्जता तुझ्या वेश्याकर्माने जारकर्म्यावर व मूर्तीपुढे उघडी केली, आणि तू आपल्या लेकरांचे रक्त मूर्तीला वाहीले;
37. यास्तव पहा! तुझे चाहाते व द्वेष्टे सर्वांना जमा करून तुझी लाज परराष्ट्री पुढे उघडी करेल व ते तुझी नग्नता सर्व बाजूने बघतील.
38. तुझ्या जारकर्माचे व तू सांडलेल्या रक्ता बद्दल शासन मी तुला करीन व माझ्या रागाने व त्वेषाने तुझे रक्त सांडेल.
39. तुला मी त्यांच्या हाती सोपवेन व ते तुझे सर्व घरे पाडून टाकतील तुझे वस्त्र, दागिने हुसकावून तुला उघडी नागडी करतील.
40. मग ते तुझ्या विरुध्द लोक जमा करून तुला धोंडमार करतील व तलवारीने तुझे तुकडे करतील.
41. ते तुझ्या घराला जाळून टाकतील अनेक स्त्रियांच्या डोळ्यादेखत तुझ्यावर शासन केले जाईल, मी तुझे वेश्या कर्म बंद करेन, आणि आता तू कुणालाही मोबदला देणार नाहीस.
42. मग माझा राग तुझ्या वरचा थंड होईल; मग माझा राग निघून जाईल, मी शांत होईन व पुन्हा कोपणार नाही.
43. कारण तू आपल्या तरुणपणात माझी आठवण केली नाहीस आणि मला क्रोधावीष्ट केलेस. बघ तुझ्या वाईट कृत्याचे परीणाम मी तुझ्या शिरी घेऊन येईन; असे परमेश्वर देव जाहीर करतो, म्हणून आता यापुढे तू वाईट वेश्या काम करणार नाहीस.
44. बघ! तुला अनुसरुन जे कोणी म्हणी वापरतील, जशी आई आपल्या मुलीसाठी आहे
45. तू आपल्या आईची मुलगी आहेस, जिने आपल्या पतीचा व लेकराचा तिरस्कार केला व तुझ्या आपल्या बहीणीने बहीणीच्या पतीच्या व तिच्या लेकरांचा तिरस्कार केला, तुझी आई हित्ती आणि तुझा बाप आमोरी आहे.
46. तुझी मोठी बहीण शोमरोनी आणि तिची कन्या पूर्वेकडे वस्तीला आहे त्यापैकी एक सदोम आहे.
47. आता तिच्या पावलावर पाऊल टाकून तिरस्कार करु नको; जरी या थोडक्या बाबी आहेत तरी देखील तू होती त्याहून तुझे मार्ग वाईट आहेत.
48. परमेश्वर देव जाहीर करतो की सदोम तुझी बहीण आणि तुझी मुलगी, तू आपल्या बहिणीप्रमाणे वाईट कृत्ये केली नाहीस.
49. पाहा! सदोम या तुझ्या बहिणीचे हे पातक आहे. ती आपल्या फुरसतीत सर्व बाबतीत उध्दट, निष्काळजी, करुणाहीन, होती. तिने व तिच्या मुलीने गरजू व गरीबांना मदतीचा हात पुढे केला नाही.
50. ती उध्दट आणि किळसवाणी कार्य तिने माझ्या पुढे केले आहे, तुझ्या देखत मी तुला हुसकावून दिले आहे.
51. शोमरोनाने तुझ्या सारखे निम्मे पाप केले नाही, त्यांनी केलेल्या पापापेक्षा तू अनेक किळस वाणे पापे केलीस, तू दाखवलेस की तुझी बहीण तुझ्याहून सरळ आहे कारण सर्व ओंगाळ कर्म तू केलेले आहेस.
52. विशेषत; तू आपली स्वतःची लाज दाखवलीस; या मार्गाने तू आपल्या बहीणीपेक्षा उत्तम आहेस हे दर्शविले, तू केलेल्या पापाने सर्व किळसवाणे कार्य तू केलेले आहेस, तुझी बहीण तुझ्याहून उत्तम आहे, विशेषत; तू आपली लाज उघडी केली, या मानाने तुझी बहीण तुझ्या मानाने उत्तम आहे.
53. यास्तव मी तुझे भविष्य सामान्य स्थितीत आणेन, सदोमाचे भविष्य आणि तुझ्या बहिणीचे आणि शोमरोनाचे व तिच्या बहीणीचे भविष्यपण त्यांच्यापैकी असेल.
54. या सर्वांचा लेखा जोखा तुला आपली लज्जा उघडी केली जाईल; आणि या मार्गाने तुझे सांत्वन केले जाईल.
55. म्हणून सदोम व तुझ्या बहिणीची पूर्वीच्या स्थितीहून सामान्य स्थिती आणेन. मग शोमरोन व तिच्या मुलीची स्थिती मी सामान्य करेन.
56. जेव्हा तू घमंडी होतीस सदोम तुझ्या बहीणीचे नाव मुखातून उच्चारण केले नव्हते.
57. तुझा दुष्टपणा जेव्हा प्रकट झाला. पण तू आता अदोमाचे कन्ये तिरस्कारणीय बाब आहेस आणि सभोवतालच्या पलिष्टीच्या कन्येसाठी असलेले सर्व लोक तिरस्कार करतील.
58. तू तुझी लज्जा दाखवली आणि तुझे तिरस्करणीय कृती केली असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
59. प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी इतरांशी जसा वागलो तसा मी तुझ्याशी वागेन ज्यांनी शपथेचा तिरस्कार केला व करार मोडला.
60. तुझ्या तरुणपणात केलेल्या माझ्या कराराचे मी सर्वदा स्मरण करीन आणि मी सर्व काही कराराच्या द्वारे स्थापीत करेन.
61. मग तुला तुझ्या मार्गाची आठवण होईल आणि आपल्या थोरल्या बहिणीची व धाकट्या बहिणीबद्दल लज्जीत होशील, तू तुझी मुलगी त्यांना देईल पण तुझ्या करारामुळे नव्हे.
62. तुझ्या सोबत करार स्थापीत करेल, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
63. या बाबीमुळे तुला सर्व काही स्मरण होईल आणि त्याची लाज वाटेल तू केलेल्या सर्व कर्माची मी तुला क्षमा केली, “असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.” [PE]
Total 48 अध्याय, Selected धडा 16 / 48
बेइमान यरूशलेम 1 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला. 2 मानवाच्या मुला, त्यांच्या किळस वाण्या कृत्याबद्दल यरूशलेमेस बजावून सांग. 3 असे जाहीर कर परमेश्वर देव यरूशलेमेला असे म्हणतो, तुझी सुरुवात आणि जन्म सुध्दा कनान देशात झाला आहे, तुझा बाप आमोरी आणि आई हित्ती होती. 4 तू जन्मला त्या दिवशी तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने स्वच्छ केले नाही, किंवा मिठ लावून चोपडले नाही, किंवा बाळंत्याने गुंडळले नाही, तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझा तिव्र तिटकारा येऊन तुला उघड्यावर फेकून दिले. 5 कुणाच्या डोळ्यात तुझ्याबद्दल करुणा दिसली नाही, ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तुला मोकळ्या जागेत फेकून दिले. 6 पण मी तुझ्या जवळून जातांना तुला रक्तबंबाळ पाहिले; आणि मी तुझ्या ओघळणाऱ्या रक्ताला जीवन बोललो. 7 मी तुला भूमीतील रोपासारखे पेरले. तू बहुगुणीत झालीस. आणि मोठी झालीस, व तू आभुषणांचा दागीना झालीस, तुला उर फुटले आणि केस दाट झाले, तू बिनवस्त्र होती. 8 मी पुन्हा तुझ्या जवळून गेलो, तेव्हा वेळ तुझ्या प्रेमाच्या विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पांघरुन घालून तुझी नग्नता झाकली. मग मी शपथ वाहून तुझ्याशी करार केला. परमेश्वर देव म्हणतो, या कराराने तू माझी झाली आहेस. 9 मी पाण्याने तुला धुतले, आणि तेलाने तुला मळले. 10 तुला नक्षीकाम केलेले कापड घातले, तुझ्या पायात कातड्याचे जोडे घातले, तुझ्या डोक्याला चांगले रेशमाचे मुलायम कापड घातले. 11 त्यानंतर मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातात कडे घातले आणि गळ्यात साखळी घातली. 12 मी तुला नथ घातली आणि कानात बाळी घातली व सुंदर मुकुट तुझ्या डोक्यात घातला. 13 तुला सोन्यारुप्याने सजवीले, तुला रेशमाच्या कापडाचा व नक्षीकाम केलेला पेहराव घातला, तुला जेवणास मधपोळी तेलासह असत. तू अति सुंदर होतीस कारण तुला दिलेल्या तेजाने तू अप्रतीम होतीस असे परमेश्वर देव म्हणतो. 14 तुझ्या देखणे पणाची चर्चा सर्व राष्ट्रात पसरली, ती तुला परिपूर्ण मोहून टाकणारी आहे, जी मी तुला दिली असे परमेश्वर देव म्हणतो. 15 पण तू आपल्या देखणेपणावर विसंबून राहीली आणि वेश्या कर्म केले, ये जा करणाऱ्यांशी तू वेश्या कर्म केले, त्यांनी तुझे सोंदर्य लुटले. 16 मग तू आपले विविध रंगी कपड्यांनी उच्च स्थाने सजवली, कधी झाली नाही व कधी केली जाणार नाही असे वेश्या कर्म तू केलेस. 17 मी दिलेल्या शोभेच्या सोन्याचांदीच्या दागीन्यांची तू पुरुष प्रतिमा बनवीली आणि त्यांच्या बरोबर तू वेश्या कर्म केले. 18 तू त्यांना नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली त्यांनी तू सुगंधी तेलाचा धुप चढवला. 19 भाकर, पिठ, तेल, मध मी तुला दिले व तुला खाऊ घातले ते तुझ्यापुढे सुवासीक अर्पण असे होते. असे घडले प्रभू परमेश्वर देव जाहीर पणे सांगतो. 20 मग तुझ्या पुत्र कन्यांना जे माझ्यापासून जन्मले त्यांना तू खाऊन टाकण्यासाठी अर्पण केले आणि वेश्याकर्म केलेस. 21 तू मूर्तीच्यापुढे माझ्या लेकरांना अग्नीने जाळून खाक केले व त्यांचे अग्नीअर्पण केले. 22 तुझे सर्व किळसवाणे व वेश्याकर्म तू कुमारी असतांना नग्न होऊन रक्तात लोळत होती याचे स्मरण तुला झाले नाही. 23 तुला हाय हाय असो! असे परमेश्वर देव जाहीर करतो, या सर्व दुष्टपणात आणखी भर, 24 तू आपल्यासाठी संस्कार गृह बांधले, व सार्वजनिक असे पवित्र ठिकाण उभे केले 25 तू पवित्र ठिकाण आपल्यासाठी प्रत्येक रस्त्यावर उभे केले आणि तुझे सौंदर्य जाहीर केले, तू आपले पाय पसरुन आपल्या मना प्रमाणे वेश्या कर्म केले. 26 तू मिसर देशाच्या लोकांशी, शेजाऱ्यांशी जे वासनाधुंद त्यांच्या सोबत वेश्या कर्म केले त्याचा मला राग येतोय. 27 बघ मी माझा हात तुझ्यावर उचलीन व तुझी उपासमार करीन तुझ्या शत्रुंचा हात तुझ्यावर पडेल व पलिष्ट्यांच्या कन्या तुझ्या वासनाधुंदपणाची तुझी लाज काढतील. 28 तू अश्शूरांशी वेश्या काम केले कारण त्यांने तू समाधानी झाली नाहीस. तू समाधान होईपर्यंत वेश्या काम करीत होतीस. 29 तू व्यापाऱ्यांच्या म्हणजे खास्द्यांच्या देशात बरेच वेश्या काम केले किंबहूना यानेही तुझे समाधान झाले नाही. 30 तुझे हृदय इतके कमजोर का? “असे परमेश्वर प्रभू देव जाहीरपणे सांगतो” तू स्वतःच्या मना प्रमाणे निर्लज्ज स्त्री सारखे सर्व काही केले. 31 रस्त्यावर, प्रत्येक नाक्यावर तू संस्कार गृह बांधले व सार्वजनिक ठिकाणी पवित्र ठिकाण उभे केलेस, तू वेश्याकमाई घेतली नाही व वेश्येचा रिवाज मोडला. 32 तू जारीण आपल्या पतीच्या ऐवजी परक्या पुरुषाशी जारकर्म केले. 33 लोक प्रत्येक वेश्येला धन देतात, पण तू आपल्या जारकर्म्यांना उलट पक्षी मोबदला देतेस, तुझ्याशी वेश्या कर्म करावे म्हणून सर्व बाजूने तू त्यांना लाच देतेस. 34 म्हणून तुझ्यात व इतर स्त्रियात फरक आहे, कुणी तुझ्या बरोबर झोपण्यास तयार होत नाही जोपर्यंत तू त्यास मोबदला देत नाही, तो तुला काही धन देत नाही. 35 परमेश्वर देवाचा शब्द तू हे जारीण ऐक. 36 असे परमेश्वर देव म्हणतो, कारण तू आपल्या वासनेची ओतणी करुण निर्लज्जता तुझ्या वेश्याकर्माने जारकर्म्यावर व मूर्तीपुढे उघडी केली, आणि तू आपल्या लेकरांचे रक्त मूर्तीला वाहीले; 37 यास्तव पहा! तुझे चाहाते व द्वेष्टे सर्वांना जमा करून तुझी लाज परराष्ट्री पुढे उघडी करेल व ते तुझी नग्नता सर्व बाजूने बघतील. 38 तुझ्या जारकर्माचे व तू सांडलेल्या रक्ता बद्दल शासन मी तुला करीन व माझ्या रागाने व त्वेषाने तुझे रक्त सांडेल. 39 तुला मी त्यांच्या हाती सोपवेन व ते तुझे सर्व घरे पाडून टाकतील तुझे वस्त्र, दागिने हुसकावून तुला उघडी नागडी करतील. 40 मग ते तुझ्या विरुध्द लोक जमा करून तुला धोंडमार करतील व तलवारीने तुझे तुकडे करतील. 41 ते तुझ्या घराला जाळून टाकतील अनेक स्त्रियांच्या डोळ्यादेखत तुझ्यावर शासन केले जाईल, मी तुझे वेश्या कर्म बंद करेन, आणि आता तू कुणालाही मोबदला देणार नाहीस. 42 मग माझा राग तुझ्या वरचा थंड होईल; मग माझा राग निघून जाईल, मी शांत होईन व पुन्हा कोपणार नाही. 43 कारण तू आपल्या तरुणपणात माझी आठवण केली नाहीस आणि मला क्रोधावीष्ट केलेस. बघ तुझ्या वाईट कृत्याचे परीणाम मी तुझ्या शिरी घेऊन येईन; असे परमेश्वर देव जाहीर करतो, म्हणून आता यापुढे तू वाईट वेश्या काम करणार नाहीस. 44 बघ! तुला अनुसरुन जे कोणी म्हणी वापरतील, जशी आई आपल्या मुलीसाठी आहे 45 तू आपल्या आईची मुलगी आहेस, जिने आपल्या पतीचा व लेकराचा तिरस्कार केला व तुझ्या आपल्या बहीणीने बहीणीच्या पतीच्या व तिच्या लेकरांचा तिरस्कार केला, तुझी आई हित्ती आणि तुझा बाप आमोरी आहे. 46 तुझी मोठी बहीण शोमरोनी आणि तिची कन्या पूर्वेकडे वस्तीला आहे त्यापैकी एक सदोम आहे. 47 आता तिच्या पावलावर पाऊल टाकून तिरस्कार करु नको; जरी या थोडक्या बाबी आहेत तरी देखील तू होती त्याहून तुझे मार्ग वाईट आहेत. 48 परमेश्वर देव जाहीर करतो की सदोम तुझी बहीण आणि तुझी मुलगी, तू आपल्या बहिणीप्रमाणे वाईट कृत्ये केली नाहीस. 49 पाहा! सदोम या तुझ्या बहिणीचे हे पातक आहे. ती आपल्या फुरसतीत सर्व बाबतीत उध्दट, निष्काळजी, करुणाहीन, होती. तिने व तिच्या मुलीने गरजू व गरीबांना मदतीचा हात पुढे केला नाही. 50 ती उध्दट आणि किळसवाणी कार्य तिने माझ्या पुढे केले आहे, तुझ्या देखत मी तुला हुसकावून दिले आहे. 51 शोमरोनाने तुझ्या सारखे निम्मे पाप केले नाही, त्यांनी केलेल्या पापापेक्षा तू अनेक किळस वाणे पापे केलीस, तू दाखवलेस की तुझी बहीण तुझ्याहून सरळ आहे कारण सर्व ओंगाळ कर्म तू केलेले आहेस. 52 विशेषत; तू आपली स्वतःची लाज दाखवलीस; या मार्गाने तू आपल्या बहीणीपेक्षा उत्तम आहेस हे दर्शविले, तू केलेल्या पापाने सर्व किळसवाणे कार्य तू केलेले आहेस, तुझी बहीण तुझ्याहून उत्तम आहे, विशेषत; तू आपली लाज उघडी केली, या मानाने तुझी बहीण तुझ्या मानाने उत्तम आहे. 53 यास्तव मी तुझे भविष्य सामान्य स्थितीत आणेन, सदोमाचे भविष्य आणि तुझ्या बहिणीचे आणि शोमरोनाचे व तिच्या बहीणीचे भविष्यपण त्यांच्यापैकी असेल. 54 या सर्वांचा लेखा जोखा तुला आपली लज्जा उघडी केली जाईल; आणि या मार्गाने तुझे सांत्वन केले जाईल. 55 म्हणून सदोम व तुझ्या बहिणीची पूर्वीच्या स्थितीहून सामान्य स्थिती आणेन. मग शोमरोन व तिच्या मुलीची स्थिती मी सामान्य करेन. 56 जेव्हा तू घमंडी होतीस सदोम तुझ्या बहीणीचे नाव मुखातून उच्चारण केले नव्हते. 57 तुझा दुष्टपणा जेव्हा प्रकट झाला. पण तू आता अदोमाचे कन्ये तिरस्कारणीय बाब आहेस आणि सभोवतालच्या पलिष्टीच्या कन्येसाठी असलेले सर्व लोक तिरस्कार करतील. 58 तू तुझी लज्जा दाखवली आणि तुझे तिरस्करणीय कृती केली असे परमेश्वर देव जाहीर करत आहे. 59 प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी इतरांशी जसा वागलो तसा मी तुझ्याशी वागेन ज्यांनी शपथेचा तिरस्कार केला व करार मोडला. 60 तुझ्या तरुणपणात केलेल्या माझ्या कराराचे मी सर्वदा स्मरण करीन आणि मी सर्व काही कराराच्या द्वारे स्थापीत करेन. 61 मग तुला तुझ्या मार्गाची आठवण होईल आणि आपल्या थोरल्या बहिणीची व धाकट्या बहिणीबद्दल लज्जीत होशील, तू तुझी मुलगी त्यांना देईल पण तुझ्या करारामुळे नव्हे. 62 तुझ्या सोबत करार स्थापीत करेल, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे. 63 या बाबीमुळे तुला सर्व काही स्मरण होईल आणि त्याची लाज वाटेल तू केलेल्या सर्व कर्माची मी तुला क्षमा केली, “असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.”
Total 48 अध्याय, Selected धडा 16 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References