मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यहेज्केल
1. {इस्त्राएलाच्या सरदारांसाठी विलाप} [PS] मग तू इस्राएलाच्या पुढाऱ्यांच्या आक्रोशा विरुध्द विलाप कर.
2. आणि म्हण तुझी आई कोण? सिंहीण, आपल्या छाव्यासोबत राहते तरुण सिंहाच्यामध्ये ती आपल्या छाव्याचे पालनपोषण करते.
3. आणि ती आपल्या छाव्याचे पोषण करून त्यास तरुण सिंह बनवते जो आपल्या शिकारीला फाडून टाकतो. तो मनुष्यास खाऊन टाकते.
4. मग राष्ट्रांना त्याची वार्ता ऐकू येते, तो त्याच्याच पाशात अडकला जातो, आणि त्यास आकडीने धरुन मिसरात घेऊन गेले.
5. मग जरी तिने हे पाहिले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघून गेली, मग तिने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली.
6. हा तरुण सिंह इतर सिंहाच्यामध्ये हिंडू फिरु लागतो, तो तरुण सिंह असता त्याने आपल्या शिकारीला फाडून टाकणे शिकला, त्याने मनुष्यांना खाऊन टाकले.
7. मग त्याने विधवांवर बलात्कार केले आणि शहराला देशोधडीला लावले, त्याची भूमी पूर्णपणे बेबंदशाहीने भरली कारण त्याच्या गर्जनेचा आवाज दुमदुत होता.
8. सर्व प्रांतातून एकवटून सर्व देशाचे लोक त्याच्या विरोधात जमले; त्यांनी त्याच्या भोवती जाळे टाकले. त्यास पाशात पकडले.
9. त्यास पिंजऱ्यात कोंडून ताळेबंद केले आणि बाबेलाच्या राज्यापुढे आणले, त्यांना त्यास तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले यास्तव त्याचा स्वर इस्राएलाच्या घराण्याला आता ऐकू जाणार नाही.
10. तुझी आई पाण्याजवळ लावलेली द्राक्षाच्या झाडासारखी होती ती फलद्रुप व फांद्यांनी बहरलेली अशी होती कारण तेथे भरपूर पाणी होते.
11. तिच्याकडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तिची उंची दाट रानाच्या फांद्यांच्या वर गेलेली होती.
12. पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषाने उपटून टाकले आणि भूमीवर फेकून दिले, पूर्वेकडील वाऱ्याने तिच्या फळांना सुकून टाकले.
13. मग तिला ओसाड प्रदेशात लावले जेथे पाऊस नाही आणि तहान आहे.
14. तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 48 अध्याय, Selected धडा 19 / 48
यहेज्केल 19:36
इस्त्राएलाच्या सरदारांसाठी विलाप 1 मग तू इस्राएलाच्या पुढाऱ्यांच्या आक्रोशा विरुध्द विलाप कर. 2 आणि म्हण तुझी आई कोण? सिंहीण, आपल्या छाव्यासोबत राहते तरुण सिंहाच्यामध्ये ती आपल्या छाव्याचे पालनपोषण करते. 3 आणि ती आपल्या छाव्याचे पोषण करून त्यास तरुण सिंह बनवते जो आपल्या शिकारीला फाडून टाकतो. तो मनुष्यास खाऊन टाकते. 4 मग राष्ट्रांना त्याची वार्ता ऐकू येते, तो त्याच्याच पाशात अडकला जातो, आणि त्यास आकडीने धरुन मिसरात घेऊन गेले. 5 मग जरी तिने हे पाहिले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघून गेली, मग तिने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली. 6 हा तरुण सिंह इतर सिंहाच्यामध्ये हिंडू फिरु लागतो, तो तरुण सिंह असता त्याने आपल्या शिकारीला फाडून टाकणे शिकला, त्याने मनुष्यांना खाऊन टाकले. 7 मग त्याने विधवांवर बलात्कार केले आणि शहराला देशोधडीला लावले, त्याची भूमी पूर्णपणे बेबंदशाहीने भरली कारण त्याच्या गर्जनेचा आवाज दुमदुत होता. 8 सर्व प्रांतातून एकवटून सर्व देशाचे लोक त्याच्या विरोधात जमले; त्यांनी त्याच्या भोवती जाळे टाकले. त्यास पाशात पकडले. 9 त्यास पिंजऱ्यात कोंडून ताळेबंद केले आणि बाबेलाच्या राज्यापुढे आणले, त्यांना त्यास तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले यास्तव त्याचा स्वर इस्राएलाच्या घराण्याला आता ऐकू जाणार नाही. 10 तुझी आई पाण्याजवळ लावलेली द्राक्षाच्या झाडासारखी होती ती फलद्रुप व फांद्यांनी बहरलेली अशी होती कारण तेथे भरपूर पाणी होते. 11 तिच्याकडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तिची उंची दाट रानाच्या फांद्यांच्या वर गेलेली होती. 12 पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषाने उपटून टाकले आणि भूमीवर फेकून दिले, पूर्वेकडील वाऱ्याने तिच्या फळांना सुकून टाकले. 13 मग तिला ओसाड प्रदेशात लावले जेथे पाऊस नाही आणि तहान आहे. 14 तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.
Total 48 अध्याय, Selected धडा 19 / 48
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References