मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यहेज्केल
1. {यहेज्केलाला पाचारण} [PS] ती वाणी मला म्हणाली; “मानवाच्या मुला [* नाशवंत मनुष्या] , आपल्या पायांवर उभा राहा; मग मी तुझ्याशी बोलेन.”
2. जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलली तेव्हा देवाच्या आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्यास माझ्याशी बोलताना ऐकले.
3. इस्राएलाच्या लोकांजवळ मानवाच्या मुला, मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले, पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे.
4. त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग.
5. ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल.
6. त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत.
7. पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत.
8. परंतू मी जे तुला मानवाच्या मुला बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा!
9. माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती.
10. तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता. [PE]

Notes

No Verse Added

Total 48 अध्याय, Selected धडा 2 / 48
यहेज्केल 2:56
यहेज्केलाला पाचारण 1 ती वाणी मला म्हणाली; “मानवाच्या मुला * नाशवंत मनुष्या , आपल्या पायांवर उभा राहा; मग मी तुझ्याशी बोलेन.” 2 जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलली तेव्हा देवाच्या आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्यास माझ्याशी बोलताना ऐकले. 3 इस्राएलाच्या लोकांजवळ मानवाच्या मुला, मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले, पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे. 4 त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग. 5 ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल. 6 त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत. 7 पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत. 8 परंतू मी जे तुला मानवाच्या मुला बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा! 9 माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती. 10 तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता.
Total 48 अध्याय, Selected धडा 2 / 48
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References