मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
यहेज्केल
1. {#1इस्त्राएलाशी देवाचा व्यवहार } [PS]बाबेलातील बंदिवासाच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी असे घडेल, इस्राएलाचे वडील परमेश्वर देवाला विचारणा करण्यास आले, आणि मज पुढे येऊन बसले.
2. परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, आणि म्हणाला
3. मानवाच्या मुला इस्राएलाच्या वडीलांना जाहीर करून सांग की प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारायला आला काय? प्रभू परमेश्वर देव म्हणतो, माझ्या जीवीताची शपथ मी तुला प्रश्न विचारु देणार नाही, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
4. तू त्यांचा न्याय करु नये काय? मानवाच्या मुला तू त्यांचा न्याय करु नये काय? त्यांच्या वाडवडीलांनी केलेली घृणास्पद कृत्ये त्यांना सांग
5. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी ज्या दिवशी इस्राएलास निवडून घेतले आणि माझे हात वर याकोबाच्या वंशजांना शपथ वाहिली आणि मिसर देशात त्यांना प्रकट झाले, मी माझे हात उंचावून शपथ वाहिली मी तुमचा परमेश्वर देव असे म्हणतो.
6. त्या दिवशी मी आपले हात उंचावून त्यांच्याशी शपथ वाहीली की, मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणिन आणि मी त्यांना खात्रीपूर्ण त्यांच्यासाठी निवडलेल्या देशात आणिन ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, तो देश सुंदर असून सर्व देशांचा मुकुट मणी आहे.
7. तेव्हा मी त्यास म्हटले की प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती देवत अशा तिरस्करणीय वस्तू आपल्या दृष्टी समोरुन फेकून द्या, तुम्ही त्यामुळे विटाळू नये, असे तुमचा देव परमेश्वर म्हणतो.
8. तरीही त्यांनी माझा तिव्र विरोध केला आणि ते माझे ऐकेनात त्यातीत प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती, दैवत अशा तिरस्कार आणणाऱ्या वस्तू फेकून दिल्या नाही आणि म्हणून मी त्यांना त्वेषाने माझा क्रोध मिसरावर ओतीन, तरच मी समाधान पावेन, हा माझा केलेला ठराव आहे.
9. माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहत आहेत त्यांच्या दृष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे, त्यांना मिसर देशातून काढून त्याच्या दृष्टीसमोर मी त्यास प्रकट झालो.
10. मी त्यास मिसर देशातून बाहेर पाठवले आणि त्यांना रानात आणिले.
11. मी त्यांना माझे नियम व निर्णय लावून दिले त्यास दाखवून दिलेत ह्यासाठी की जो कोणी हे पाळेल त्यांचा बचाव होईल.
12. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये चिन्ह म्हणून त्यास शब्बाथ दिले, ह्यासाठी की त्यांना समजावे की त्यास पवित्र करणारा मी परमेश्वर देव आहे.
13. रानामध्ये इस्राएल घराण्याने माझा तीव्र विरोध केला. ते माझ्या नियमांनी चालले नाहीत, ज्यांच्यामुळे त्यांचा बचाव होईल, त्याऐवजी त्यांनी माझ्या नियमांचा नकार केला, त्यांनी माझ्या पवित्र शब्बाथाचा अनादर केला; म्हणून मी म्हणालो त्यांचा रानामध्येच नाश करण्यासाठी मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतीन असे मी म्हटले.
14. तथापि माझ्या पवित्र नामाचा अनादर होऊ नये म्हणून त्या राष्ट्रा देखत त्यांना मिसरा बाहेर आणून कृती केली.
15. म्हणून मी माझा हात उंचावून रानात प्रतिज्ञा वाहिली; जो देश त्यांना देण्यासाठी ज्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, जो सर्वात सुंदर असून सर्व देशाचा मुकुटमणी आहे, अशा देशात मी त्यांना घेऊन जाणार नाही.
16. मी शपथ वाहिली कारण त्यांनी माझा करार मोडला माझ्या नियमांनी ते चालले नाहीत आणि माझ्या शब्बाथाचा अनादर केला, कारण त्यांचे अंतःकरण मूर्तीशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले.
17. तरी मी त्यांच्यावर कृपादृष्टी केली, कारण त्यांची होणारी हानी पाहून त्यांचा रानात सर्वनाश करणार नाही.
18. रानात मी त्यांच्या पुत्रपोत्रास म्हणालो तुम्ही आपल्या वाडवडीलांच्या नियमांनी चालू नका, तुम्ही त्यांचा करार पाळू नका किंवा मूर्तीपूजा करून स्वतःस अशुद्ध करु नका.
19. मी तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या नियमांनी चाला माझे निर्णय पाळून माझ्या आज्ञेत रहा.
20. माझे शब्बाथ पवित्र पणे पाळा ह्यासाठी की, ते तुमच्या व माझ्यामध्ये चिन्हा दाखल होतील. ह्यासाठी की मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळून येईल.
21. परंतू त्यांच्या मुलामुलींनी देखील माझ्या विरोधात तीव्र विरोध केला. ते नियमांनी चालले नाहीत किंवा करार पाळला नाही, ज्या आज्ञा पाळल्याने मनुष्य वाचतो. त्यांनी माझ्या शब्बाथाचा अनादर केला, तेव्हा मी ठरवले की मी रानात त्यांच्यावर क्रोधाची वृष्टी करावी ह्यासाठी माझा क्रोध पूर्ण करावा.
22. परंतू मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला ह्यासाठी की ज्या राष्ट्रातून इस्राएलांना मी बाहेर त्यांच्या दृष्टीसमोर माझा अनादर होऊ नये, म्हणून मी कृती केली आहे.
23. रानात मी हात उंचावून अशी शपथ वाहिली की, मी त्यांची राष्ट्रामध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीला लावीन.
24. हे करण्यासाठी मी ठराव केला ह्यासाठी की, जेव्हापासून त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, माझ्या शब्बाथाचा व नियमांचा अनादर केला. कारण त्यांची दृष्टी त्यांच्या वाडवडीलांच्या मूर्तीकडे लागली होती.
25. म्हणून मी देखील जे चांगले नाहित असे नियम त्यांना दिले, ज्यांनी ते जगावयाचे नाहीत असे निर्णय मी त्यास दिले.
26. त्यांच्या मिळालेल्या देणगी व्दारे मी त्यांना अशुद्ध केले. हे सर्व झाल्यामुळे त्यांना गर्भाशयातून प्रथम जन्मलेल्या बालकांचा अग्नीत होम केला, हे केल्याने त्यांनी भीती बाळगावी आणि समजावे की मी परमेश्वर देव आहे.
27. यास्तव हे मानवाच्या मुला इस्राएल घराण्याला जाहिरपणे सांग की, प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, तुम्ही तुमच्या वाडवडीलांनी माझा विश्वासघात केला असून देवनिंदक शब्द बोललेत ते अशा प्रकारे
28. मी आपले हाथ उंचावून शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणिले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे वृक्ष पाहून मला संतापावण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पिली. तेथे त्यांनी सुवासीक धुप जाळीला व पेयार्पण अर्पिली.
29. तेव्हा मी त्यास म्हणालो, तुम्ही ज्या उंचवटयांवर [* बामा ]जाऊन जेथे तुम्ही अर्पण करता? त्या ठिकाणास आजवर उंचवटा म्हटले आहे.
30. ह्यासाठी इस्राएलाच्या घराण्यास सांग, परमेश्वर देव असे म्हणतो काय? तुम्ही आपल्या वाडवडीलांना मार्गास लागून स्वत:ला विटाळवीता काय? आणि वेश्ये प्रमाणे कृती करून किळस आणणाऱ्या गोष्टीचा शोध घेता?
31. आपली अर्पणे वाहून आपल्या पुत्रांना अग्नीत होम करून आजपर्यंत मूर्तीपुजेमुळे तुम्ही स्वतःला अशुद्ध केलेत, हे इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुम्हास प्रश्न विचारु देणार नाही, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ ही माझी घोषणा आहे, मी तुम्हास प्रश्न विचारु देणार नाही.
32. तुमच्या मनात येणारे विचार तरंग बाहेर येतील, तुम्ही म्हणता, चला इतर राष्ट्राप्रमाणे तेथील जमाती काष्ट पाषाणाची पुजा करतात तशी आपण करु.
33. ही प्रभू परमेश्वर देव घोषणा करतो, मी खात्रीने आपले बाहु उभारुन पराक्रमाने तुमच्यावर राज्य करीन.
34. मी राष्ट्रातून तुम्हास बाहेर आणिन, आणि जेथे जेथे तुमची पांगापांग झाली तेथून आणून तुम्हास एकत्र करीन मी हे आपल्या प्रबळ बाहूने उगारलेल्या हाताने कोपवृष्टी करीन.
35. नंतर मी लोकांस रानात आणून समोरा समोर त्यांचा न्याय करेन.
36. ज्या प्रमाणे मिसराच्या रानात तुमच्या वाडवडीलांचा न्याय केला, तसा मी तुमच्या बरोबर करे, हे परमेश्वर देव घोषणा करून सांगत आहे.
37. तुम्हास माझ्या काठीखाली घालवून बेड्या टाकून करारबध्द करीन.
38. तुम्हातील बंडखोर व माझ्याशी फितुर कोण यांची मी साफ सफाई करणार, अल्पकाळ जे इतर राष्ट्रात राहत होते, त्यांना मी बाहेर घालवून देणार व पुनःरुपी ते इस्राएलात प्रवेश करणार नाही. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
39. मग त इस्राएलाच्या घराण्या परमेश्वर देव असे म्हणत आहे, प्रत्येक जण त्यांच्या मूर्ती मागे गेले आहेत, त्यांची उपासना करून त्यांनी माझे ऐकण्याचे नाकारले आहे, पण तू आता माझ्या पवित्र वस्तूबद्दल मूर्तीला भेट देऊन यापुढे माझा अनादर करणार नाही.
40. माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या पर्वत शिखरावर हे परमेश्वर देव जाहीर करत आहे, सर्व इस्राएलाचे घराणे त्यांच्या भूमित माझी आराधना करतील. तुझ्या अर्पणांनी मी तेथे आनंदी होईन आणि पवित्र ठिकाणी आणलेल्या खंडणीचे प्रथम फळ ते अर्पितील.
41. मी त्यांचे सुवासीक अर्पण स्विकारीन, जेव्हा सर्व लोक देशातून एकत्र जमतील जेथून ते विखुरले गेले होते. मी स्वतःला त्यांना पवित्र असे प्रकट करेन, सर्व राष्ट्रे ते बघतील.
42. जेव्हा मी तुम्हास इस्राएलच्या भूमीत घेऊन येईल, ज्या भूमिला हात उंचावून तुमच्या वाडवडीलांना दिली होती, मग तुम्हास कळेल कि मी परमेश्वर देव आहे.
43. मग तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांचे स्मरण होईल, आणि तुमच्या केलेल्या वाईट कृत्याबद्दल तुम्ही तुमच्या स्वत:ची घृणा कराल.
44. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, मी हे माझ्या नामास्तव केले, तुमच्या वाईट भ्रष्ट मार्गासाठी केले नाही. इस्राएलाच्या घराण्या हे परमेश्वर देव जाहीर करतो. [PE]
45. {#1दक्षिणेविरुद्ध भविष्यवाणी } [PS]मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला
46. मानवाच्या मुला आपले तोंड दक्षिणेच्या भूमीकडे लाव आणि बोल; नेगेबच्या राना विरुध्द भाकीत कर.
47. नेगेबच्या रानाला बोल ऐक परमेश्वर देव काय जाहीर करतो; परमेश्वर देव हे म्हणतोय, बघ मी तुझ्यावर अग्नी पाठवीन. ती सर्व झाडाच्या ताज्या फळांना भस्म करेल व झाडे सुकवून टाकेल. आग विझणार नाही; सर्व उत्तर, दक्षिण भाग जळून भस्म होईल.
48. जेव्हा मी अग्नी पेटवेन तेव्हा सर्व लोक मी परमेश्वर आहे हे समजतील, आणि मी आग विझवणार नाही.
49. मग मी त्यांना म्हणेन, आहा, हे परमेश्वर देव मला म्हणाला, हा केवळ दाखला सांगणारा आहे का? [PE]
Total 48 अध्याय, Selected धडा 20 / 48
इस्त्राएलाशी देवाचा व्यवहार 1 बाबेलातील बंदिवासाच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी असे घडेल, इस्राएलाचे वडील परमेश्वर देवाला विचारणा करण्यास आले, आणि मज पुढे येऊन बसले. 2 परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, आणि म्हणाला 3 मानवाच्या मुला इस्राएलाच्या वडीलांना जाहीर करून सांग की प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारायला आला काय? प्रभू परमेश्वर देव म्हणतो, माझ्या जीवीताची शपथ मी तुला प्रश्न विचारु देणार नाही, असे परमेश्वर देव जाहीर करतो. 4 तू त्यांचा न्याय करु नये काय? मानवाच्या मुला तू त्यांचा न्याय करु नये काय? त्यांच्या वाडवडीलांनी केलेली घृणास्पद कृत्ये त्यांना सांग 5 प्रभू परमेश्वर म्हणतो, मी ज्या दिवशी इस्राएलास निवडून घेतले आणि माझे हात वर याकोबाच्या वंशजांना शपथ वाहिली आणि मिसर देशात त्यांना प्रकट झाले, मी माझे हात उंचावून शपथ वाहिली मी तुमचा परमेश्वर देव असे म्हणतो. 6 त्या दिवशी मी आपले हात उंचावून त्यांच्याशी शपथ वाहीली की, मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणिन आणि मी त्यांना खात्रीपूर्ण त्यांच्यासाठी निवडलेल्या देशात आणिन ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, तो देश सुंदर असून सर्व देशांचा मुकुट मणी आहे. 7 तेव्हा मी त्यास म्हटले की प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती देवत अशा तिरस्करणीय वस्तू आपल्या दृष्टी समोरुन फेकून द्या, तुम्ही त्यामुळे विटाळू नये, असे तुमचा देव परमेश्वर म्हणतो. 8 तरीही त्यांनी माझा तिव्र विरोध केला आणि ते माझे ऐकेनात त्यातीत प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती, दैवत अशा तिरस्कार आणणाऱ्या वस्तू फेकून दिल्या नाही आणि म्हणून मी त्यांना त्वेषाने माझा क्रोध मिसरावर ओतीन, तरच मी समाधान पावेन, हा माझा केलेला ठराव आहे. 9 माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहत आहेत त्यांच्या दृष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे, त्यांना मिसर देशातून काढून त्याच्या दृष्टीसमोर मी त्यास प्रकट झालो. 10 मी त्यास मिसर देशातून बाहेर पाठवले आणि त्यांना रानात आणिले. 11 मी त्यांना माझे नियम व निर्णय लावून दिले त्यास दाखवून दिलेत ह्यासाठी की जो कोणी हे पाळेल त्यांचा बचाव होईल. 12 माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये चिन्ह म्हणून त्यास शब्बाथ दिले, ह्यासाठी की त्यांना समजावे की त्यास पवित्र करणारा मी परमेश्वर देव आहे. 13 रानामध्ये इस्राएल घराण्याने माझा तीव्र विरोध केला. ते माझ्या नियमांनी चालले नाहीत, ज्यांच्यामुळे त्यांचा बचाव होईल, त्याऐवजी त्यांनी माझ्या नियमांचा नकार केला, त्यांनी माझ्या पवित्र शब्बाथाचा अनादर केला; म्हणून मी म्हणालो त्यांचा रानामध्येच नाश करण्यासाठी मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतीन असे मी म्हटले. 14 तथापि माझ्या पवित्र नामाचा अनादर होऊ नये म्हणून त्या राष्ट्रा देखत त्यांना मिसरा बाहेर आणून कृती केली. 15 म्हणून मी माझा हात उंचावून रानात प्रतिज्ञा वाहिली; जो देश त्यांना देण्यासाठी ज्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, जो सर्वात सुंदर असून सर्व देशाचा मुकुटमणी आहे, अशा देशात मी त्यांना घेऊन जाणार नाही. 16 मी शपथ वाहिली कारण त्यांनी माझा करार मोडला माझ्या नियमांनी ते चालले नाहीत आणि माझ्या शब्बाथाचा अनादर केला, कारण त्यांचे अंतःकरण मूर्तीशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले. 17 तरी मी त्यांच्यावर कृपादृष्टी केली, कारण त्यांची होणारी हानी पाहून त्यांचा रानात सर्वनाश करणार नाही. 18 रानात मी त्यांच्या पुत्रपोत्रास म्हणालो तुम्ही आपल्या वाडवडीलांच्या नियमांनी चालू नका, तुम्ही त्यांचा करार पाळू नका किंवा मूर्तीपूजा करून स्वतःस अशुद्ध करु नका. 19 मी तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या नियमांनी चाला माझे निर्णय पाळून माझ्या आज्ञेत रहा. 20 माझे शब्बाथ पवित्र पणे पाळा ह्यासाठी की, ते तुमच्या व माझ्यामध्ये चिन्हा दाखल होतील. ह्यासाठी की मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळून येईल. 21 परंतू त्यांच्या मुलामुलींनी देखील माझ्या विरोधात तीव्र विरोध केला. ते नियमांनी चालले नाहीत किंवा करार पाळला नाही, ज्या आज्ञा पाळल्याने मनुष्य वाचतो. त्यांनी माझ्या शब्बाथाचा अनादर केला, तेव्हा मी ठरवले की मी रानात त्यांच्यावर क्रोधाची वृष्टी करावी ह्यासाठी माझा क्रोध पूर्ण करावा. 22 परंतू मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला ह्यासाठी की ज्या राष्ट्रातून इस्राएलांना मी बाहेर त्यांच्या दृष्टीसमोर माझा अनादर होऊ नये, म्हणून मी कृती केली आहे. 23 रानात मी हात उंचावून अशी शपथ वाहिली की, मी त्यांची राष्ट्रामध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीला लावीन. 24 हे करण्यासाठी मी ठराव केला ह्यासाठी की, जेव्हापासून त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, माझ्या शब्बाथाचा व नियमांचा अनादर केला. कारण त्यांची दृष्टी त्यांच्या वाडवडीलांच्या मूर्तीकडे लागली होती. 25 म्हणून मी देखील जे चांगले नाहित असे नियम त्यांना दिले, ज्यांनी ते जगावयाचे नाहीत असे निर्णय मी त्यास दिले. 26 त्यांच्या मिळालेल्या देणगी व्दारे मी त्यांना अशुद्ध केले. हे सर्व झाल्यामुळे त्यांना गर्भाशयातून प्रथम जन्मलेल्या बालकांचा अग्नीत होम केला, हे केल्याने त्यांनी भीती बाळगावी आणि समजावे की मी परमेश्वर देव आहे. 27 यास्तव हे मानवाच्या मुला इस्राएल घराण्याला जाहिरपणे सांग की, प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, तुम्ही तुमच्या वाडवडीलांनी माझा विश्वासघात केला असून देवनिंदक शब्द बोललेत ते अशा प्रकारे 28 मी आपले हाथ उंचावून शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणिले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे वृक्ष पाहून मला संतापावण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पिली. तेथे त्यांनी सुवासीक धुप जाळीला व पेयार्पण अर्पिली. 29 तेव्हा मी त्यास म्हणालो, तुम्ही ज्या उंचवटयांवर * बामा जाऊन जेथे तुम्ही अर्पण करता? त्या ठिकाणास आजवर उंचवटा म्हटले आहे. 30 ह्यासाठी इस्राएलाच्या घराण्यास सांग, परमेश्वर देव असे म्हणतो काय? तुम्ही आपल्या वाडवडीलांना मार्गास लागून स्वत:ला विटाळवीता काय? आणि वेश्ये प्रमाणे कृती करून किळस आणणाऱ्या गोष्टीचा शोध घेता? 31 आपली अर्पणे वाहून आपल्या पुत्रांना अग्नीत होम करून आजपर्यंत मूर्तीपुजेमुळे तुम्ही स्वतःला अशुद्ध केलेत, हे इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुम्हास प्रश्न विचारु देणार नाही, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ ही माझी घोषणा आहे, मी तुम्हास प्रश्न विचारु देणार नाही. 32 तुमच्या मनात येणारे विचार तरंग बाहेर येतील, तुम्ही म्हणता, चला इतर राष्ट्राप्रमाणे तेथील जमाती काष्ट पाषाणाची पुजा करतात तशी आपण करु. 33 ही प्रभू परमेश्वर देव घोषणा करतो, मी खात्रीने आपले बाहु उभारुन पराक्रमाने तुमच्यावर राज्य करीन. 34 मी राष्ट्रातून तुम्हास बाहेर आणिन, आणि जेथे जेथे तुमची पांगापांग झाली तेथून आणून तुम्हास एकत्र करीन मी हे आपल्या प्रबळ बाहूने उगारलेल्या हाताने कोपवृष्टी करीन. 35 नंतर मी लोकांस रानात आणून समोरा समोर त्यांचा न्याय करेन. 36 ज्या प्रमाणे मिसराच्या रानात तुमच्या वाडवडीलांचा न्याय केला, तसा मी तुमच्या बरोबर करे, हे परमेश्वर देव घोषणा करून सांगत आहे. 37 तुम्हास माझ्या काठीखाली घालवून बेड्या टाकून करारबध्द करीन. 38 तुम्हातील बंडखोर व माझ्याशी फितुर कोण यांची मी साफ सफाई करणार, अल्पकाळ जे इतर राष्ट्रात राहत होते, त्यांना मी बाहेर घालवून देणार व पुनःरुपी ते इस्राएलात प्रवेश करणार नाही. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे. 39 मग त इस्राएलाच्या घराण्या परमेश्वर देव असे म्हणत आहे, प्रत्येक जण त्यांच्या मूर्ती मागे गेले आहेत, त्यांची उपासना करून त्यांनी माझे ऐकण्याचे नाकारले आहे, पण तू आता माझ्या पवित्र वस्तूबद्दल मूर्तीला भेट देऊन यापुढे माझा अनादर करणार नाही. 40 माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या पर्वत शिखरावर हे परमेश्वर देव जाहीर करत आहे, सर्व इस्राएलाचे घराणे त्यांच्या भूमित माझी आराधना करतील. तुझ्या अर्पणांनी मी तेथे आनंदी होईन आणि पवित्र ठिकाणी आणलेल्या खंडणीचे प्रथम फळ ते अर्पितील. 41 मी त्यांचे सुवासीक अर्पण स्विकारीन, जेव्हा सर्व लोक देशातून एकत्र जमतील जेथून ते विखुरले गेले होते. मी स्वतःला त्यांना पवित्र असे प्रकट करेन, सर्व राष्ट्रे ते बघतील. 42 जेव्हा मी तुम्हास इस्राएलच्या भूमीत घेऊन येईल, ज्या भूमिला हात उंचावून तुमच्या वाडवडीलांना दिली होती, मग तुम्हास कळेल कि मी परमेश्वर देव आहे. 43 मग तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांचे स्मरण होईल, आणि तुमच्या केलेल्या वाईट कृत्याबद्दल तुम्ही तुमच्या स्वत:ची घृणा कराल. 44 मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, मी हे माझ्या नामास्तव केले, तुमच्या वाईट भ्रष्ट मार्गासाठी केले नाही. इस्राएलाच्या घराण्या हे परमेश्वर देव जाहीर करतो. दक्षिणेविरुद्ध भविष्यवाणी 45 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला 46 मानवाच्या मुला आपले तोंड दक्षिणेच्या भूमीकडे लाव आणि बोल; नेगेबच्या राना विरुध्द भाकीत कर. 47 नेगेबच्या रानाला बोल ऐक परमेश्वर देव काय जाहीर करतो; परमेश्वर देव हे म्हणतोय, बघ मी तुझ्यावर अग्नी पाठवीन. ती सर्व झाडाच्या ताज्या फळांना भस्म करेल व झाडे सुकवून टाकेल. आग विझणार नाही; सर्व उत्तर, दक्षिण भाग जळून भस्म होईल. 48 जेव्हा मी अग्नी पेटवेन तेव्हा सर्व लोक मी परमेश्वर आहे हे समजतील, आणि मी आग विझवणार नाही. 49 मग मी त्यांना म्हणेन, आहा, हे परमेश्वर देव मला म्हणाला, हा केवळ दाखला सांगणारा आहे का?
Total 48 अध्याय, Selected धडा 20 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References