मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
यहेज्केल
1. [PS]आता “मानवाच्या मुला, तू गोगच्याविरूद्ध भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, पाहा! मी गोग, मेशेख आणि तुबाल यांचा अधिपती यांच्याविरूद्ध आहे.
2. मी तुला वळविन आणि मी तुला पुढे नेईन; अति उत्तरेकडून मी तुला परत आणीन आणि इस्राएलाच्या पर्वतांशी आणीन.
3. मग मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य उडवून देईन; व तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन.
4. तू इस्राएलाच्या पर्वतांवर तू, तुझे सर्व समुदाय, व तुझ्याबरोबरचे जे कोणी सैन्य आहे ते, मरून पडशील. मी तुम्हास पक्ष्यांचे व रानातील वन्य पशूंचे भक्ष्य करीन.
5. तू शेतातील पृष्टभागावर मरून पडशील कारण मी हे बोललो आहे. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
6. मग मी, मागोगामध्ये व किनाऱ्यावर सुरक्षितपणे राहणाऱ्या लोकांमध्ये अग्नी पाठवीन. मग त्यांना समजेल ‘मी परमेश्वर आहे.’
7. कारण मी माझ्या इस्राएल लोकांमध्ये माझे पवित्र नाव माहीत करून देईन. आणि मी यापुढे आपले पवित्र नाव पुन्हा भ्रष्ट होऊ देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे.
8. पाहा! असा दिवस येत आहे! ते घडेलच!” प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ज्या दिवसाबद्दल मी बोललो तो हाच आहे.
9. “तेव्हा इस्राएलात राहणारे बाहेर निघून ते शस्त्रास्त्रे, लहान ढाली, मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, गदा व भाले यांना आग लावून जाळतील. ते सरपण म्हणून सात वर्षे जाळत राहतील.
10. त्यामुळे त्यांना रानातून लाकडे गोळा करावी लागणार नाही किंवा जंगलातून लाकडे तोडावी लागणार नाहीत. तर ही शस्त्रांस्त्रे ते जाळतील. त्यास ज्यांनी लुटले त्यास ते लुटतील. ज्या कोणी त्यांच्याकडून घेतले ते त्याजकडून घेतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
11. मग “त्या दिवसात असे होईल की, तेव्हा मी समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगास इस्राएल देशात कबरस्थान. ते येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता अडवतील. तेथे गोगाला त्याच्या सर्व समुदायासह पुरतील. ते त्यास ‘हमोन गोग याची दरी’ असे म्हणतील.
12. देश शुद्ध करण्यासाठी, इस्राएल घराणे, सात महिने त्यांना पुरीत राहिल.
13. कारण देशातील सर्व लोक त्यांना पुरतील. मी जेव्हा गौरविला जाईन तो दिवस त्यांच्यासाठी संस्मरणीय होईल.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
14. “हे काम नेहमी करणाऱ्या मनुष्यांना वेगळे करून नेमतील, आणि तो देश शुद्ध व्हावा म्हणून देशातून येथून तेथून जातील; जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांस पुरतील; सात महिने झाल्यावर ते शोधाला लागतील.
15. शोध करणारे देशातून फिरत कोणाला मनुष्याचे अस्थी दिसताच, तो तेथे खूण करून ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या अस्थीला हमोन गोगाच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील.
16. तेथल्या नगराचे नाव हमोना असे होईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
17. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “हे मानवाच्या मुला, तू सर्व पंख असलेल्या पक्ष्यांस व रानातील सर्व वन्यपशूस सांग, माझा यज्ञ, जो मोठा यज्ञ मी इस्राएलाच्या पर्वतावर तुम्हासाठी करतो, त्याकडे तुम्ही चोहोकडून एकत्र होऊन मांस खावे आणि रक्त प्यावे.
18. तुम्ही योद्ध्यांचे मांस खाल आणि पृथ्वींचे अधिपति मेंढ्या, कोकरे, बोकड व बैल यांचे रक्त प्याल; ते सर्व बाशानात पुष्ट झालेले आहेत.
19. कापलेल्या पशूंचा हा माझा यज्ञ मी तुम्हासाठी केला आहे. मग तुमची तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल. त्यांचे रक्त तुम्ही मस्त होईपर्यंत प्याल.
20. माझ्या मेजावर बसून तुम्हास तेथे घोडे, रथ, योद्धे आणि प्रत्येक लढणारा मनुष्य यांस खाऊन तुमची तृप्ती होईल.” प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
21. “मी आपले वैभव राष्ट्रामध्ये ठेवीन आणि माझा न्याय मी केला आहे तो आणि माझा हात मी त्यांच्यावर ठेवला आहे तोही ते सर्व राष्ट्रे पाहतील.
22. मग त्या दिवसापासून पुढे, मीच त्यांचा परमेश्वर देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल.
23. आणि राष्ट्रे जाणतील की, इस्राएलाचे घराणे आपल्या अन्यायामुळे बंदिवासात गेले त्यांनी मजबरोबर विश्वासघात केला म्हणून मी आपले मुख त्यापासून लपविले आणि त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हाती दिले आणि ते सर्व तलवारीने पडले.
24. मी त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे आणि पापांप्रमाणे त्यांचे केले. मी त्यांच्यापासून आपले तोंड लपविले.”
25. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, “आता मी याकोबाच्या लोकांस बंदिवासातून परत आणीन. इस्राएलाच्या सर्व घराण्यावर मी दया करीन. मी आपल्या पवित्र नावाबद्दल आवेशी राहीन.
26. मग ते देशात निर्भय राहतील आणि कोणी त्यांना दहशत घालणार नाही; तेव्हा हे सर्व विसरतील. मग ते आपली लाज व मजबरोबर केलेला देशाचा विश्वासघात विसरतील.
27. मी त्यांना राष्ट्राच्या लोकांतून परत आणीन आणि त्यांना त्यांच्या वैऱ्याच्या देशातून गोळा करीन व बहुत राष्ट्रासमोर मी त्यांच्यामध्ये पवित्र मानला गेलो म्हणजे हे घडेल.
28. नंतर त्यांना समजेल की, मीच त्यांचा परमेश्वर आहे. कारण मीच त्यांना बंदिवान म्हणून दुसऱ्या देशात पाठवले, परंतु नंतर मीच त्यांना एकत्र गोळा करून त्यांच्या देशात परत आणले. मी त्यांच्यातील कोणालाही तेथे सोडून देणार नाही.
29. मी यापुढे आपले मुख त्यांच्यापासून लपविणार नाही, मी आपला आत्मा इस्राएलाच्या घराण्यावर ओतीन.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो. [PE]
Total 48 अध्याय, Selected धडा 39 / 48
1 आता “मानवाच्या मुला, तू गोगच्याविरूद्ध भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, पाहा! मी गोग, मेशेख आणि तुबाल यांचा अधिपती यांच्याविरूद्ध आहे. 2 मी तुला वळविन आणि मी तुला पुढे नेईन; अति उत्तरेकडून मी तुला परत आणीन आणि इस्राएलाच्या पर्वतांशी आणीन. 3 मग मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य उडवून देईन; व तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन. 4 तू इस्राएलाच्या पर्वतांवर तू, तुझे सर्व समुदाय, व तुझ्याबरोबरचे जे कोणी सैन्य आहे ते, मरून पडशील. मी तुम्हास पक्ष्यांचे व रानातील वन्य पशूंचे भक्ष्य करीन. 5 तू शेतातील पृष्टभागावर मरून पडशील कारण मी हे बोललो आहे. असे प्रभू परमेश्वर म्हणतो. 6 मग मी, मागोगामध्ये व किनाऱ्यावर सुरक्षितपणे राहणाऱ्या लोकांमध्ये अग्नी पाठवीन. मग त्यांना समजेल ‘मी परमेश्वर आहे.’ 7 कारण मी माझ्या इस्राएल लोकांमध्ये माझे पवित्र नाव माहीत करून देईन. आणि मी यापुढे आपले पवित्र नाव पुन्हा भ्रष्ट होऊ देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे. 8 पाहा! असा दिवस येत आहे! ते घडेलच!” प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ज्या दिवसाबद्दल मी बोललो तो हाच आहे. 9 “तेव्हा इस्राएलात राहणारे बाहेर निघून ते शस्त्रास्त्रे, लहान ढाली, मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, गदा व भाले यांना आग लावून जाळतील. ते सरपण म्हणून सात वर्षे जाळत राहतील. 10 त्यामुळे त्यांना रानातून लाकडे गोळा करावी लागणार नाही किंवा जंगलातून लाकडे तोडावी लागणार नाहीत. तर ही शस्त्रांस्त्रे ते जाळतील. त्यास ज्यांनी लुटले त्यास ते लुटतील. ज्या कोणी त्यांच्याकडून घेतले ते त्याजकडून घेतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो. 11 मग “त्या दिवसात असे होईल की, तेव्हा मी समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगास इस्राएल देशात कबरस्थान. ते येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता अडवतील. तेथे गोगाला त्याच्या सर्व समुदायासह पुरतील. ते त्यास ‘हमोन गोग याची दरी’ असे म्हणतील. 12 देश शुद्ध करण्यासाठी, इस्राएल घराणे, सात महिने त्यांना पुरीत राहिल. 13 कारण देशातील सर्व लोक त्यांना पुरतील. मी जेव्हा गौरविला जाईन तो दिवस त्यांच्यासाठी संस्मरणीय होईल.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो. 14 “हे काम नेहमी करणाऱ्या मनुष्यांना वेगळे करून नेमतील, आणि तो देश शुद्ध व्हावा म्हणून देशातून येथून तेथून जातील; जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांस पुरतील; सात महिने झाल्यावर ते शोधाला लागतील. 15 शोध करणारे देशातून फिरत कोणाला मनुष्याचे अस्थी दिसताच, तो तेथे खूण करून ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या अस्थीला हमोन गोगाच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील. 16 तेथल्या नगराचे नाव हमोना असे होईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.” 17 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “हे मानवाच्या मुला, तू सर्व पंख असलेल्या पक्ष्यांस व रानातील सर्व वन्यपशूस सांग, माझा यज्ञ, जो मोठा यज्ञ मी इस्राएलाच्या पर्वतावर तुम्हासाठी करतो, त्याकडे तुम्ही चोहोकडून एकत्र होऊन मांस खावे आणि रक्त प्यावे. 18 तुम्ही योद्ध्यांचे मांस खाल आणि पृथ्वींचे अधिपति मेंढ्या, कोकरे, बोकड व बैल यांचे रक्त प्याल; ते सर्व बाशानात पुष्ट झालेले आहेत. 19 कापलेल्या पशूंचा हा माझा यज्ञ मी तुम्हासाठी केला आहे. मग तुमची तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल. त्यांचे रक्त तुम्ही मस्त होईपर्यंत प्याल. 20 माझ्या मेजावर बसून तुम्हास तेथे घोडे, रथ, योद्धे आणि प्रत्येक लढणारा मनुष्य यांस खाऊन तुमची तृप्ती होईल.” प्रभू परमेश्वर असे म्हणतो. 21 “मी आपले वैभव राष्ट्रामध्ये ठेवीन आणि माझा न्याय मी केला आहे तो आणि माझा हात मी त्यांच्यावर ठेवला आहे तोही ते सर्व राष्ट्रे पाहतील. 22 मग त्या दिवसापासून पुढे, मीच त्यांचा परमेश्वर देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल. 23 आणि राष्ट्रे जाणतील की, इस्राएलाचे घराणे आपल्या अन्यायामुळे बंदिवासात गेले त्यांनी मजबरोबर विश्वासघात केला म्हणून मी आपले मुख त्यापासून लपविले आणि त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हाती दिले आणि ते सर्व तलवारीने पडले. 24 मी त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे आणि पापांप्रमाणे त्यांचे केले. मी त्यांच्यापासून आपले तोंड लपविले.” 25 म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, “आता मी याकोबाच्या लोकांस बंदिवासातून परत आणीन. इस्राएलाच्या सर्व घराण्यावर मी दया करीन. मी आपल्या पवित्र नावाबद्दल आवेशी राहीन. 26 मग ते देशात निर्भय राहतील आणि कोणी त्यांना दहशत घालणार नाही; तेव्हा हे सर्व विसरतील. मग ते आपली लाज व मजबरोबर केलेला देशाचा विश्वासघात विसरतील. 27 मी त्यांना राष्ट्राच्या लोकांतून परत आणीन आणि त्यांना त्यांच्या वैऱ्याच्या देशातून गोळा करीन व बहुत राष्ट्रासमोर मी त्यांच्यामध्ये पवित्र मानला गेलो म्हणजे हे घडेल. 28 नंतर त्यांना समजेल की, मीच त्यांचा परमेश्वर आहे. कारण मीच त्यांना बंदिवान म्हणून दुसऱ्या देशात पाठवले, परंतु नंतर मीच त्यांना एकत्र गोळा करून त्यांच्या देशात परत आणले. मी त्यांच्यातील कोणालाही तेथे सोडून देणार नाही. 29 मी यापुढे आपले मुख त्यांच्यापासून लपविणार नाही, मी आपला आत्मा इस्राएलाच्या घराण्यावर ओतीन.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Total 48 अध्याय, Selected धडा 39 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References