मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यहेज्केल
1. {यरूशलेमेच्या वेढ्याचे चित्र} [PS] परंतू मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव. व यरूशलेम शहराचे चित्र रेखाट.
2. तिला वेढा पडला आहे आणि तिच्या समोर बुरुज रचून मोरचे बांधले आहेत, तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहे, असे चित्र काढ.
3. तू आपल्याकरता लोखंडाची कढई घेऊन ती लोखंडी भिंत असी तुझ्यामध्ये आणि नगराच्यामध्ये ठेव आणि तू आपले मुख तिच्याकडे कर, म्हणजे तिला घेरा पडेल आणि तू तिला वेढा घालशील. इस्राएलाच्या घराण्याला चिन्ह होईल.
4. मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्राएलाच्या घराण्याचे पाप स्वतःवर घे; इस्राएलाचे पाप जितके दिवस तू झोपून राहाशील, तितके दिवसाच्या गणतीप्रमाणे तू त्याचा अन्याय वाहाशील.
5. मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची तीनशे नव्वद दिवस सोपवून दिली आहे, तू इस्राएलाच्या घराण्याचे अपराध वाहून नेशील.
6. जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीज, चाळीस दिवस यहूदाच्या घराण्याचे पाप तू वाहशील, मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस सोपवून दिला आहे.
7. आपले तोंड यरूशलेमेच्या विरुध्द दिशेला कर जे चित्र रेखाटले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहुंनी झाकु नको; आणि त्यांच्या विरुध्द भाकीत कर.
8. पहा, तुला दोरीने करकचून बांधतील, तू एका बाजूहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.
9. स्वतःसाठी तू गहू, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी, आणि काठ्या गहू घेऊन जितके दिवस तू एका बाजूस रहाशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर, जे तू तीनशे नव्वद दिवस खाशील.
10. हे तुझ्या खाण्यासाठी वीस शेकेल वजनाचे असेल जी वेळोवेळी तुझी उपजीवीका असेल.
11. पाणी साठ हिन मोजून वेळो वेळी तुझ्या पीण्यासाठी असेल.
12. जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वांदेखत मनुष्याच्या विष्टेवर भाजून खा!
13. यासाठी परमेश्वर देव “सांगतो, ती भाकर म्हणजे, इस्राएलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातून मी त्यांना हद्दपार करेन.”
14. परंतू मी म्हणालो “अहा, हे परमेश्वर! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मरण पावलेले व मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”
15. म्हणून तो मला म्हणाला, “पहा! मी तुला मानवाच्या विष्टे ऐवजी गाईच्या विष्टेवर स्वतःसाठी भाकर भाज.”
16. तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला पहा! मी यरूशलेमेच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेन, आणि अस्वस्थतेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केली जाईल.
17. कारण त्यांना अन्नपाण्याचा तुटवडा पडून त्यांची त्रेधा उडेल व ऐकमेकात त्यांच्या अपराधामुळे ते भयभीत होतील.” [PE]

Notes

No Verse Added

Total 48 Chapters, Current Chapter 4 of Total Chapters 48
यहेज्केल 4:39
1. {यरूशलेमेच्या वेढ्याचे चित्र} PS परंतू मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव. यरूशलेम शहराचे चित्र रेखाट.
2. तिला वेढा पडला आहे आणि तिच्या समोर बुरुज रचून मोरचे बांधले आहेत, तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहे, असे चित्र काढ.
3. तू आपल्याकरता लोखंडाची कढई घेऊन ती लोखंडी भिंत असी तुझ्यामध्ये आणि नगराच्यामध्ये ठेव आणि तू आपले मुख तिच्याकडे कर, म्हणजे तिला घेरा पडेल आणि तू तिला वेढा घालशील. इस्राएलाच्या घराण्याला चिन्ह होईल.
4. मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्राएलाच्या घराण्याचे पाप स्वतःवर घे; इस्राएलाचे पाप जितके दिवस तू झोपून राहाशील, तितके दिवसाच्या गणतीप्रमाणे तू त्याचा अन्याय वाहाशील.
5. मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची तीनशे नव्वद दिवस सोपवून दिली आहे, तू इस्राएलाच्या घराण्याचे अपराध वाहून नेशील.
6. जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीज, चाळीस दिवस यहूदाच्या घराण्याचे पाप तू वाहशील, मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस सोपवून दिला आहे.
7. आपले तोंड यरूशलेमेच्या विरुध्द दिशेला कर जे चित्र रेखाटले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहुंनी झाकु नको; आणि त्यांच्या विरुध्द भाकीत कर.
8. पहा, तुला दोरीने करकचून बांधतील, तू एका बाजूहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.
9. स्वतःसाठी तू गहू, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी, आणि काठ्या गहू घेऊन जितके दिवस तू एका बाजूस रहाशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर, जे तू तीनशे नव्वद दिवस खाशील.
10. हे तुझ्या खाण्यासाठी वीस शेकेल वजनाचे असेल जी वेळोवेळी तुझी उपजीवीका असेल.
11. पाणी साठ हिन मोजून वेळो वेळी तुझ्या पीण्यासाठी असेल.
12. जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वांदेखत मनुष्याच्या विष्टेवर भाजून खा!
13. यासाठी परमेश्वर देव “सांगतो, ती भाकर म्हणजे, इस्राएलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातून मी त्यांना हद्दपार करेन.”
14. परंतू मी म्हणालो “अहा, हे परमेश्वर! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मरण पावलेले मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”
15. म्हणून तो मला म्हणाला, “पहा! मी तुला मानवाच्या विष्टे ऐवजी गाईच्या विष्टेवर स्वतःसाठी भाकर भाज.”
16. तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला पहा! मी यरूशलेमेच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेन, आणि अस्वस्थतेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केली जाईल.
17. कारण त्यांना अन्नपाण्याचा तुटवडा पडून त्यांची त्रेधा उडेल ऐकमेकात त्यांच्या अपराधामुळे ते भयभीत होतील.” PE
Total 48 Chapters, Current Chapter 4 of Total Chapters 48
×

Alert

×

marathi Letters Keypad References