1. {#1मंदिरापासून वाहणारे आरोग्यदायक पाणी } [PS]मग त्या मनुष्याने मला पुन्हा मंदिराच्या प्रवेशदाराकडे नेले आणि पाहा! मंदिराच्या उंबरठ्याखालून पाणी पूर्वेकडे वाहत होते, कारण मंदिराचे तोंड पूर्वेला होते. आणि मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस पाणी वाहात होते.
2. म्हणून त्याने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. तो पाहा, पाणी दाराच्या दक्षिणेकडून वाहत होते.
3. जसा तो मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन पूर्वेला जात होता. त्याने एक हजार अंतर मोजून मला त्या पाण्यातून चालायला सांगितले. तो पाणी घोट्यापर्यंत होते.
4. मग त्याने आणखी एक हजार हाताचे अंतर मोजून पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. आणि आणखी हजार हात अंतर मोजून मला पाण्यातून चालावयास लावले तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते.
5. त्यानंतर त्याने आणखी हजार हात अंतर मोजले तो त्या नदीतून मला चालता येईना, कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून पार जाता आले नसते. इतकी खोल ती होती.
6. तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिले ना?” आणि त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.
7. जसा मी परत आलो तेव्हा पाहा, नदीच्या तीरांवर एका बाजूस व दुसऱ्या बाजूसही पुष्कळ झाडी असलेली पाहिली.
8. तो मनुष्य मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशाकडे वाहत जाते. आणि तेथून अराबात उतरून क्षारसमुद्राला मिळते, ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी ताजे करते.
9. मग असे होईल की, जेथे ही महानदी जाईल तेथे तेथे जो प्रत्येक जिवंत प्राणी राहत असेल तो जगेल, कारण तेथील पाणी क्षारसमुद्रास मिळते त्यामुळे ते ताजे होते आणि तेथे विपुल मासे मिळतात, हे पाणी जेथे जाईल तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे कोठे ही नदी जाते प्रत्येकगोष्ट जिवंत राहते.
10. तिच्या तीरी कोळी उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत जाळी टाकतील. मोठ्या समुद्रातल्या माशांसारखे त्या क्षारसमुद्रात अनेक प्रकारांप्रमाणे विपुल मासे होतील.
11. पण दलदल आणि पाणथळीच्या जागा निर्दोष होणार नाहीत. त्या मिठासारख्या होतील.
12. नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची खाण्याजोगी फळे देणारे सर्व प्रकारची झाडे वाढतीत. त्यांची पाने कधीच सुकून जाणार नाहीत. त्याचे फळ कधीच थांबणार नाही. ती प्रत्येक महिन्याला फळ देईल, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यातील पाने औषधी होतील.” [PE]
13. {#1जमिनीची वाटणी व सीमा [BR]गण. 34:1-12 } [PS]प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही इस्राएलाच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी याप्रमाणे करून द्याल, तेव्हा योसेफाला दोन भाग मिळतील.
14. आणि तुम्ही, प्रत्येक मनुष्य आणि तुमच्यातील बंधु यांचे ते वतन होईल. ज्या देशाविषयी मी तुमच्या पुर्वजांना द्यावा म्हणून आपला हात उंच करून शपथ घेतली त्याच्या सारखी वाटणी करून घ्याल, त्याचप्रमाणे तो तुमचे वतन होईल.
15. जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला मोठ्या समुद्रापासून, हेथलोनच्या वाटेने हमाथकडे सदादाच्या सीमेपर्यंत,
16. हमाथ, बेरोथा, जे दिमिष्क व हमाथाच्या सीमेवरील सिब्राईम, व हौरानच्या सीमेवरील मध्यहासेर.
17. समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिष्काच्या सरहद्दीवरील गांव हसर-एनोन पर्यंत असेल. उत्तरेस हमाथ ही सीमा. ही बाजू उत्तर झाली.
18. पूर्वेला सीमारेषा हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश याच्यामधून गेलेली यार्देन नदी.
19. मग दक्षिण बाजू, तामारपासून पार मरीबोथ कादेशाच्या पाण्यापर्यंत व तेथून मिसरच्या देशाच्या ओढ्याने पुढे मोठ्यासमुद्रापर्यंत, ही दक्षिण बाजू झाली.
20. पश्चिमबाजू दक्षिण सीमेपासून हमाथाच्या प्रवेशाच्या समोरच्या प्रदेशापर्यंत मोठा समुद्र होईल; ही पश्चिम बाजू आहे.
21. “याप्रकारे तुम्ही हा देश आपसांत इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटून द्या.
22. तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहत असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहत आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलाच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही या लोकांस द्यावा.
23. हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएल लोकांनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. [PE]