1. {#1मंदिर पुन्हा बांधले जाते [BR]इब्री. 1:1; जख. 1:1 } [PS]त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या नावाने यहूदा व यरूशलेममधील यहूद्यांना भविष्य सांगत असत.
2. तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशूवा यांनी यरूशलेममधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली, देवाच्या सर्व संदेष्ट्यांनी त्यांना उत्तेजन दिले. [PE]
3. [PS]त्यावेळी ततनइ हा नदीच्या पलीकडील प्रांताचा अधिकारी होता. तो शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “तुम्हास हे मंदिर व भिंत पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली?”
4. ते असेही म्हणाले, “हे बांधकाम करणाऱ्या मनुष्यांची नावे काय आहेत?”
5. तरीही यहूदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारयावेशाला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले.
6. नदीच्या अलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे साथीदार मान्यवर लोक यांनी राजा दारयावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत आहे.
7. त्यांनी अहवाल पाठवला, त्यामध्ये लिहिले होते, राजा दारयावेश “सर्व कुशल असो
8. हे राजा, आम्ही यहूदा प्रांतात महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहूदातील लोक मोठे दगड वापरुन हे मंदिर नव्याने बांधित आहेत. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहूदी लोक हे काम मोठया झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल.
9. या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, ‘तुम्हास हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?’
10. आम्ही त्यांची नावेही विचारुन घेतली. त्यांचे पुढारीपण करणाऱ्यांची नावे तुम्हास कळावीत म्हणून आम्ही त्यांची नावे विचारली. [PE]
11.
12. [PS]त्यांनी उत्तर दिले, ‘आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्राएलाच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करत आहोत.” [PE][PS]आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने स्वर्गातील देवाला चिडवून संतप्त केले. तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर खास्दी याच्या हाती दिले आणि त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांस कैद करून बाबेलला नेले.
13. कोरेश बाबेलचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकूमनामा काढला. [PE]
14. [PS]तसेच, देवाच्या मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे होती ती नबुखद्नेस्सराने यरूशलेमतल्या मंदिरातून काढून बाबेलच्या देवळात ठेवली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या स्वाधीन केली. त्यास कोरेश राजाने अधिकारी म्हणून नेमले होते.
15. तो त्यांना म्हणाला, “ही पात्रे घे आणि यरूशलेमातील मंदिरात ठेव. देवाचे मंदिर त्याच्या ठिकाणावर पुन्हा बांध.” [PE]
16.
17. [PS]तेव्हा शेशबस्सरने यरूशलेमात येऊन मंदिराचा पाया घातला आणि तेव्हापासून आजतागायत ते काम चाललेले आहे पण अजून पूर्ण झालेले नाही. [PE][PS]तेव्हा आता जर राजाला चांगले वाटले तर यरूशलेमात मंदिर पुन्हा बांधण्याची राजा कोरेशाने खरोखरच आज्ञा दिली आहे का ते बाबेलाच्या राजभांडारात चौकशी करावी. मग राजाचा याबाबतीत काय निर्णय आहे ते आम्हास कळवावे. [PE]