मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
उत्पत्ति
1. {#1अब्राहाम आणि कटूरा [BR]1 इति. 1:32-33 } [PS]अब्राहामाने दुसरी पत्नी केली; तिचे नाव कटूरा होते.
2. तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली.
3. यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते.
4. एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते.
5. अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले.
6. अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले. [PE]
7. {#1अब्राहामाचा मृत्यू व त्याचे दफन } [PS]अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला.
8. अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांस जाऊन मिळाला.
9. इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले.
10. हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले.
11. अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता. [PE]
12. {#1इश्माएल आणि एसावाची वंशावळ [BR]1 इति. 1:29-31 } [PS]अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही:
13. इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम,
14. मिश्मा, दुमा, मस्सा,
15. हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा.
16. ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले.
17. ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांस जाऊन मिळाला.
18. त्याचे वंशज हवीलापासून ते शूरापर्यंत वस्ती करून राहिले, अश्शूराकडे जाताना मिसराजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते[* किंवा त्यांनी आपल्या बांधवांच्या पूर्वेस वस्ती केली ]. [PE]
19. {#1एसाव आपला जन्मसिद्ध हक्क विकतो } [PS]अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला.
20. इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन-अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला पत्नी करून घेतले.
21. इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली.
22. मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली.
23. परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.”
24. जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती.
25. आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.
26. त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
27. ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे.
28. एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली. [PE]
29. {#1एसावाचे आपला जन्मसिद्ध हक्क विकणे [BR]इब्री. 12:16 } [PS]याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता.
30. एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले.
31. याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.”
32. एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?”
33. याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.
34. याकोबाने त्यास भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला. [PE]
Total 50 अध्याय, Selected धडा 25 / 50
अब्राहाम आणि कटूरा
1 इति. 1:32-33

1 अब्राहामाने दुसरी पत्नी केली; तिचे नाव कटूरा होते. 2 तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली. 3 यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते. 4 एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते. 5 अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले. 6 अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले. अब्राहामाचा मृत्यू व त्याचे दफन 7 अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला. 8 अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांस जाऊन मिळाला. 9 इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले. 10 हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले. 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता. इश्माएल आणि एसावाची वंशावळ
1 इति. 1:29-31

12 अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही: 13 इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम, 14 मिश्मा, दुमा, मस्सा, 15 हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा. 16 ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले. 17 ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांस जाऊन मिळाला. 18 त्याचे वंशज हवीलापासून ते शूरापर्यंत वस्ती करून राहिले, अश्शूराकडे जाताना मिसराजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते* किंवा त्यांनी आपल्या बांधवांच्या पूर्वेस वस्ती केली . एसाव आपला जन्मसिद्ध हक्क विकतो 19 अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला. 20 इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन-अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला पत्नी करून घेतले. 21 इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली. 22 मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली. 23 परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.” 24 जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती. 25 आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले. 26 त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता. 27 ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे. 28 एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली. एसावाचे आपला जन्मसिद्ध हक्क विकणे
इब्री. 12:16

29 याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता. 30 एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले. 31 याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.” 32 एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?” 33 याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला. 34 याकोबाने त्यास भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.
Total 50 अध्याय, Selected धडा 25 / 50
×

Alert

×

Marathi Letters Keypad References