2. एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा
|
6. एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.
|
7. कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यामध्ये त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.
|
12. अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती.
|
14. सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.
|
15. एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज,
|
16. कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.
|
17. एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.
|
18. एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.
|
24. सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे * किंवा जंगली गाढवे सापडले तोच हा अना.
|
31. {अदोम देशाचे राजे} PS इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच:
|
35. हुशाम मरण पावल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते.
|
39. बाल-हानान मरण पावल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.
|
43. माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे. PE
|