मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
उत्पत्ति
1. {#1याकोब आपल्या कुटुंबासह मिसरास येतो [BR]निर्ग. 6:14-25 } [PS]इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली.
2. रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”
3. तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन.
4. मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”
5. मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले.
6. त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले; याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली.
7. त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले.
8. इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन;
9. रऊबेनाचे पुत्र हनोख आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कर्मी;
10. शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल;
11. लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी;
12. यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल),
13. इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, लोब व शिम्रोन;
14. जबुलूनाचे पुत्र सेरेद, एलोन व याहलेल
15. (याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुले व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते),
16. गादाचे पुत्र सिफयोन आणि हग्गी, शूनी आणि एसबोन, एरी, अरोदी, आणि अरेली;
17. आशेराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे पुत्र हेबर व मलकीएल
18. (जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती),
19. याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र योसेफ व बन्यामीन हे होते;
20. (योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे पुत्र झाले),
21. बन्यामिनाचे पुत्र बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
22. (याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते),
23. हुशीम हा दान याचा मुलगा होता;
24. नफतालीचे पुत्र यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.
25. (लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे पुत्र. हे सर्व मिळून सात जण होते).
26. याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या स्त्रिया सोडून सहासष्ट जण होती.
27. योसेफास मिसर देशात झालेले दोन पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते. [PE]
28. {#1याकोब आणि त्याचे कुटुंब ह्यांचे मिसर देशात वास्तव्य } [PS]याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली.
29. योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला.
30. मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
31. मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या वडिलाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या वडिलाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत.
32. माझ्या वडिलाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’
33. जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’
34. तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांस मेंढपाळ आवडत नाहीत.” [PE]
Total 50 अध्याय, Selected धडा 46 / 50
याकोब आपल्या कुटुंबासह मिसरास येतो
निर्ग. 6:14-25

1 इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली. 2 रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?” 3 तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन. 4 मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.” 5 मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले. 6 त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले; याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली. 7 त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले. 8 इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन; 9 रऊबेनाचे पुत्र हनोख आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कर्मी; 10 शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल; 11 लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी; 12 यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल), 13 इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, लोब व शिम्रोन; 14 जबुलूनाचे पुत्र सेरेद, एलोन व याहलेल 15 (याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुले व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते), 16 गादाचे पुत्र सिफयोन आणि हग्गी, शूनी आणि एसबोन, एरी, अरोदी, आणि अरेली; 17 आशेराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे पुत्र हेबर व मलकीएल 18 (जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती), 19 याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र योसेफ व बन्यामीन हे होते; 20 (योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे पुत्र झाले), 21 बन्यामिनाचे पुत्र बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द. 22 (याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते), 23 हुशीम हा दान याचा मुलगा होता; 24 नफतालीचे पुत्र यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते. 25 (लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे पुत्र. हे सर्व मिळून सात जण होते). 26 याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या स्त्रिया सोडून सहासष्ट जण होती. 27 योसेफास मिसर देशात झालेले दोन पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते. याकोब आणि त्याचे कुटुंब ह्यांचे मिसर देशात वास्तव्य 28 याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. 29 योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला. 30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.” 31 मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या वडिलाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या वडिलाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत. 32 माझ्या वडिलाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’ 33 जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ 34 तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांस मेंढपाळ आवडत नाहीत.”
Total 50 अध्याय, Selected धडा 46 / 50
×

Alert

×

Marathi Letters Keypad References