1. {#1अन्यायाबद्दल हबक्कूकची तक्रार }
2. [PS]संदेष्टा हबक्कूक याला मिळालेले देववचन. [PE][QS]“हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू, [QE][QS]आणि तू ऐकणार नाहीस? [QE][QS]जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली, [QE][QS]पण तू मला वाचवत नाहीस! [QE]
3. [QS]तू मला अन्याय [QE][QS]व अनर्थ का पाहायला लावतोस? [QE][QS]नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत; [QE][QS]आणि भांडण व वाद उठतो! [QE]
4. [QS]ह्यास्तव नियमशास्त्र कमकुवत झाले आहे, [QE][QS]आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही, [QE][QS]कारण दुष्ट नितीमानाला घेरतो, [QE][QS]त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.” [QE]
5. {#1खास्दी यहूदाला शिक्षा करतील } [QS]“इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांचे परिक्षण करा, आणि आश्चर्याने विस्मित व्हा! [QE][QS]कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की, त्या तुम्हास सांगण्यात येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही. [QE]
6. [QS]कारण पाहा! मी खास्द्यांची[* बाबेल ] उठावनी करतो, ते भयानक व उतावळे राष्ट्र आहे. [QE][QS]जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहेत. [QE]
7. [QS]ते दारूण व भयंकर आहेत, त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासूनच पुढे जातात. [QE]
8. [QS]त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात, [QE][QS]आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात. [QE]
9. [QS]ते सर्व हिंसा करण्यास येतात, [QE][QS]त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात! [QE]
10. [QS]म्हणून ते राजांची थट्टा करतील, आणि राज्यकर्ते त्यांच्यासाठी केवळ चेष्टा असे आहेत! [QE][QS]ते प्रत्येक दुर्गाला हसतात, कारण तो धुळीचा ढीग करून तो ताब्यात घेतात! [QE]
11. [QS]मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील, त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे.” [QE]
12. {#1हबक्कूक परमेश्वराजवळ तक्रार करतो } [QS]“हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही. [QE][QS]परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे. [QE]
13. [QS]तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहवत नाही, आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही. [QE][QS]मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस? [QE][QS]जो आपल्याहून नीतिमान त्यास जेव्हा दुर्जन गिळून टाकतो तेव्हा तू का शांत राहतोस? [QE]
14. [QS]तू लोकांस समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस, त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवांप्रमाणे ते आहेत. [QE]
15. [QS]ते त्या गळाने सर्वांना उचलून घेतात; ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात [QE][QS]आणि पागाने त्यांना गोळा करतात. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात. [QE]
16. [QS]म्हणून ते आपल्या माशांच्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात. [QE][QS]कारण त्यापासून त्यांना पुष्ट पशूंचा वाटा आणि त्यांचे अन्न म्हणजे चरबी असलेले मांस हे मिळते. [QE]
17. [QS]तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामे करतील काय? आणि कोणतीही दया न दाखविता, ते राष्ट्रांची कत्तल करीतच राहणार काय?” [QE]