1. {#1हबक्कूकची प्रार्थना } [PS]संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथावर प्रार्थनाः
2. परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो. [PE][QS]हे परमेश्वर, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर; [QE][QS]या समयामध्ये ते माहित करून दे. [QE][QS]तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव. [QE]
3. [QS]तेमानाहून[* एदोम ] देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे, [QE][QSS]सेला.[QSE] [QS]परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली. [QE]
4. [QS]त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने तेथे त्याचे सामर्थ्य ठेवले आहे. [QE]
5. [QS]रोगराई त्याच्या मुखासमोरून गेली, आणि मरी त्याच्या पायांजवळून निघते. [QE]
6. [QS]तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली; त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला. [QE][QS]सर्वकाळच्या पर्वतांचेसुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्वकाळच्या टेकड्या खाली नमल्या, [QE][QS]त्याचा मार्ग सदासर्वकाळ आहे. [QE]
7. [QS]कूशानचे तंबू संकटात असलेले मी पाहिले, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या. [QE]
8. [QS]परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथांवर आरुढ झाला होतास काय? [QE]
9. [QS]तू आपले धनुष्य गवसणी बाहेर काढले आहे; तू आपल्या धनुष्यावर बाण चढवला आहे! (सेला). [QE][QS]तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागले आहे. [QE]
10. [QS]पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले! [QE][QS]जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे; [QE][QS]खोल समुद्राने आवाज उंचावला आहे, [QE][QS]समुद्राने आपला हात[† आपला हात ] उंचावला आहे. [QE]
11. [QS]चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दूर गेले आहेत! [QE]
12. [QS]तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस. [QE]
13. [QS]तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे, [QE][QS]व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे, सेला! [QE]
14. [QS]ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हास पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनिकांच्या डोक्यात भोसकले, [QE][QS]गरीब मनुष्यास एकांतात खाऊन टाकावे, ह्यामध्ये त्यांची तृप्तता होती. [QE]
15. [QS]पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला. [QE]
16. [QS]मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. [QE][QS]म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे. [QE]
17. [QS]जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही, [QE][QS]जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही, [QE][QS]कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली, [QE]
18. [QS]तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन. [QE]
19. [QS]प्रभू परमेश्वर माझे बळ आहे, [QE][QS]तो माझे पाय हरणींच्या पायासारखे करतो, आणि तो मला माझ्या उंचस्थानावर चालवील. [QE][QS3](मुख्य वाजवणाऱ्यासाठी, माझ्या तंतुवाद्यावरचे गायन.)[QE]