1. [QS]इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. [QE][QS]त्यास विपुल फळे येतात. [QE][QS]जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. [QE][QS]त्याची भूमी सुपीक झाली, [QE][QS]तो त्याने सुंदर स्तंभ उभारले. [QE]
2. [QS]त्यांचे हृदय कपटी आहे, [QE][QS]त्यांना त्यांची शिक्षा होईल [QE][QS]परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल [QE][QS]त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल. [QE]
3. [QS]आता ते म्हणतील, [QE][QS]“आम्हास राजा नाही, [QE][QS]कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही [QE][QS]आणि राजा आमच्यासाठी काय करणार?” [QE]
4. [QS]ते पोकळ शब्द बोलतात [QE][QS]खोट्या शपथा वाहून करार करतात, [QE][QS]म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात [QE][QS]तसा त्यांच्यावर न्याय येईल. [QE]
5. [QS]शोमरोनाचे रहिवासी [QE][QS]बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील [QE][QS]त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, [QE][QS]सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी [QE][QS]जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते [QE][QS]आता ते त्यांच्याबरोबर नाहीत. [QE]
6. [QS]ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. [QE][QS]एफ्राईम लज्जीत होईल, [QE][QS]आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे [QE][QS]इस्राएल लज्जीत होईल. [QE]
7. [QS]शोमरोनाचा राजा पाण्यावर [QE][QS]तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल. [QE]
8. [QS]दुष्टतेची श्रध्दास्थानाने [QE][QS]आणि इस्राएलाची पापे नाश पावतील [QE][QS]त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. [QE][QS]लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका” [QE][QS]आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा” [QE]
9. [QS]इस्राएला, [QE][QS]गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस; [QE][QS]तू तिथेच राहिला आहेस [QE][QS]गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत? [QE]
10. [QS]मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन, [QE][QS]त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील [QE][QS]व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील. [QE]
11. [QS]एफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे [QE][QS]तिला मळणी करायला आवडते म्हणून [QE][QS]मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन. [QE][QS]मी एफ्राईमावर जू ठेवीन, [QE][QS]यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील. [QE]
12. [QS]तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा [QE][QS]आणि कराराच्या विश्वासूपणाची [QE][QS]फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरुन काढा, [QE][QS]कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही, [QE][QS]तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे. [QE]
13. [QS]तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, [QE][QS]तुम्ही अन्यायाची कापणी केली, [QE][QS]तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले [QE][QS]कारण तू तुझ्या योजनांवर [QE][QS]आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला. [QE]
14. [QS]म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल [QE][QS]आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. [QE][QS]हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला [QE][QS]तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले. [QE]
15. [QS]तुझ्या अती [QE][QS]दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील. [QE][QS]प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील. [QE]