1. {#1परमेश्वराचे आपल्या बेइमान लोकांवरील प्रेम } [QS]“आपल्या भावांना म्हणा, अम्मी, [* अर्थ-माझे लोक ] [QE][QS]आपल्या बहिणींना म्हणा, रुहाम ‘तुमच्यावर दया करण्यात आली आहे.’ ” [QE]
2. [QS]तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला, [QE][QS2]कारण ती माझी पत्नी नाही, [QE][QS2]आणि मी तीचा पती नाही. [QE][QS]ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत:पासून सोडून देवो [QE][QS]आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो. [QE]
3. [QS]जर नाही, तर मी [QE][QS]तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती [QE][QS]तशी नग्न करीन, [QE][QS]मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन [QE][QS]आणि मी तिला तहानेने मारीन. [QE]
4. [QS]तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने [QE][QS]मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही. [QE]
5. [QS]त्यांची आई वेश्या राहिलेली आहे, [QE][QS]व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, [QE][QS]ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, [QE][QS]कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, [QE][QS]माझी लोकर आणि ताग, [QE][QS]माझे तेल आणि मद्य देतात. [QE]
6. [QS]म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन, [QE][QS]मी तिच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे [QE][QS]तिला वाट सापडणार नाही. [QE]
7. [QS]ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल [QE][QS]पण ती त्यांना गाठू शकणार नाही, [QE][QS]ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही. [QE][QS]मग ती म्हणेल, [QE][QS]मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, [QE][QS]कारण माझी दशा आतापेक्षा [QE][QS]तेव्हा चांगली होती. [QE]
8. [QS]कारण तिला हे ठाऊक नाही की, [QE][QS]तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षरस, [QE][QS]तेल पुरवली व सोने आणि चांदी सढळपणे दिली, [QE][QS]नंतर जी तिने बआल मुर्तीस दिली. [QE]
9. [QS]म्हणून मी हंगामाच्या वेळी [QE][QS]तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षरस परत घेईन. [QE][QS]तिची लाज झाकण्यासाठी दिलेली [QE][QS]माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन. [QE]
10. [QS]नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन [QE][QS]व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही. [QE]
11. [QS]मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन, [QE][QS]शब्बाथ आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन. [QE]
12. [QS]मी तिच्या द्राक्षवेली [QE][QS]आणि अंजिराची झाडे नष्ट करीन, [QE][QS]ज्या विषयी ती म्हणाली होती, [QE][QS]माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. [QE][QS]मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील. [QE]
13. [QS]तिने बआलास धूप दिला, [QE][QS]आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली. [QE][QS]मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली [QE][QS]म्हणून मी तिला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो. [QE]
14. [QS]यास्तव, मी तिला परत मिळविन मी तिला जंगलात घेऊन जाईन, [QE][QS]आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन. [QE]
15. [QS]मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, [QE][QS]आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन. [QE][QS]तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणी दिले होते, [QE][QS]जेव्हा ती मिसर देशातून आली होती. [QE]
16. [QS]हे परमेश्वर घोषित करतो की, [QE][QS]त्या दिवसात असे होईल की तू मला माझा पती[† अर्थ-इशी ] म्हणशील, [QE][QS]आणि पुन्हा मला बाली [‡ अर्थ-धनी ]म्हणणार नाहीस. [QE]
17. [QS]कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन, [QE][QS]व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही. [QE]
18. [QS]त्या दिवशी मी इस्राएलासाठी [QE][QS]वनपशु, आकाशातील पाखरे, [QE][QS]भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन. [QE][QS]मी देशातून धनुष्य तलवार [QE][QS]आणि लढाई नाहीशी करीन, [QE][QS]व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील. [QE]
19. [QS]मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईन. [QE][QS]मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया ह्यात तुझा वाग्दत्त पती होईन. [QE]
20. [QS]मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन, [QE][QS]व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे. [QE]
21. [QS]आणि त्या दिवशी, [QE][QS]मी उत्तर देईन, असे परमेश्वर घोषीत करतो, [QE][QS]मी आकाशाला उत्तर देईल [QE][QS]आणि आकाश भूमीला उत्तर देईन. [QE]
22. [QS]आणि भूमी धान्य, नवा द्राक्षरस [QE][QS]आणि तेल देईल आणि ते इज्रेलास उत्तर देतील. [QE]
23. [QS]मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन, [QE][QS]आणि लो रुहामावर दया करीन. [QE][QS]जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन [QE][QS]आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील. [QE]