मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
होशेय
1. {#1इस्त्राएलास बेइमानीबद्दल शिक्षा } [QS]याजकांनो! [QE][QS]हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे, [QE][QS]हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे [QE][QS]तुम्ही मिस्पावर पाश [QE][QS]आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात. [QE]
2. [QS]बंडखोर खोल कत्तलीत राहतात [QE][QS]पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन. [QE]
3. [QS]एफ्राईम मला माहित आहे [QE][QS]आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही. [QE][QS]एफ्राईम तू एका वेश्येसारखा झाला आहेस, [QE][QS]इस्राएल अशुद्ध झाला आहे. [QE]
4. [QS]त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, [QE][QS]कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो; [QE][QS]आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत. [QE]
5. [QS]इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो, [QE][QS]इस्राएल व एफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार, [QE][QS]आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल. [QE]
6. [QS]ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील, [QE][QS]परंतू तो त्यांना सापडणार नाही, [QE][QS]कारण त्याने त्यांचा त्याग केला आहे. [QE]
7. [QS]ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले; [QE][QS]कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले [QE][QS]आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन. [QE]
8. [QS]गिबात शिंग [QE][QS]आणि रामात तुतारी फुंका; [QE][QS]तुझ्यामागे, हे बन्यामिना! [QE][QS]असा रणशब्द बेथ अविन येथे करा. [QE]
9. [QS]शासनाच्या दिवशी एफ्राईम नाश पावेल, [QE][QS]इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे. [QE]
10. [QS]यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत, [QE][QS]मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार. [QE]
11. [QS]एफ्राईमाचा चुराडा झाला आहे, [QE][QS]न्यायामध्ये त्याचा चुराडा झाला आहे, [QE][QS]कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरवले आहे. [QE]
12. [QS]ह्यास्तव मी एफ्राईमाला कसर [QE][QS]आणि यहूदाच्या घराण्यास किडीसारखा होईन. [QE]
13. [QS]जेव्हा एफ्राईमाने आपला रोग [QE][QS]आणि यहूदाने आपली जखम पाहिली [QE][QS]तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला, [QE][QS]आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला; [QE][QS]पण तो त्यास आरोग्य देऊन [QE][QS]त्यांची जखम बरी करू शकला नाही. [QE]
14. [QS]हयास्तव मी एफ्राईमास सिंह [QE][QS]आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; [QE][QS]मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन [QE][QS]व घेऊन जाईन, [QE][QS]आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल. [QE]
15. [QS]मी आपल्या स्थानी परत जाईन, [QE][QS]जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत; [QE][QS]जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत. [QE]
Total 14 अध्याय, Selected धडा 5 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
इस्त्राएलास बेइमानीबद्दल शिक्षा 1 याजकांनो! हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे तुम्ही मिस्पावर पाश आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात. 2 बंडखोर खोल कत्तलीत राहतात पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन. 3 एफ्राईम मला माहित आहे आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही. एफ्राईम तू एका वेश्येसारखा झाला आहेस, इस्राएल अशुद्ध झाला आहे. 4 त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो; आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत. 5 इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो, इस्राएल व एफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार, आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल. 6 ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील, परंतू तो त्यांना सापडणार नाही, कारण त्याने त्यांचा त्याग केला आहे. 7 ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले; कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन. 8 गिबात शिंग आणि रामात तुतारी फुंका; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ अविन येथे करा. 9 शासनाच्या दिवशी एफ्राईम नाश पावेल, इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे. 10 यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत, मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार. 11 एफ्राईमाचा चुराडा झाला आहे, न्यायामध्ये त्याचा चुराडा झाला आहे, कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरवले आहे. 12 ह्यास्तव मी एफ्राईमाला कसर आणि यहूदाच्या घराण्यास किडीसारखा होईन. 13 जेव्हा एफ्राईमाने आपला रोग आणि यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला, आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला; पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करू शकला नाही. 14 हयास्तव मी एफ्राईमास सिंह आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईन, आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल. 15 मी आपल्या स्थानी परत जाईन, जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत; जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.
Total 14 अध्याय, Selected धडा 5 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
×

Alert

×

Marathi Letters Keypad References