1. {#1मूर्तीपूजेबद्दल इस्त्राएलाचा निषेध } [QS]“मुखाला तुतारी लाव, [QE][QS]परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे, [QE][QS]हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून [QE][QS]माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे. [QE]
2. [QS]ते माझा धावा करतात, [QE][QS]माझ्या देवा, आम्ही इस्राएली तुला जाणतो” [QE]
3. [QS]पण इस्राएलाने जे चांगले ते नाकारले आहे, [QE][QS]आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल. [QE]
4. [QS]त्यांनी राजे नेमले, [QE][QS]पण माझ्या द्वारे नाही; [QE][QS]त्यांनी राजपुत्र स्थापले आहे, [QE][QS]पण माझे ज्ञान न घेता त्यांनी, [QE][QS]आपले सोने व चांदी घेऊन, [QE][QS]स्वत:साठी मूर्ती बनविल्या आहेत. [QE][QS]त्यानेच ते नाश पावतील. [QE]
5. [QS]संदेष्टा म्हणतो, हे शोमरोना तुझे वासरू त्याने नाकारले आहे, [QE][QS]परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुध्द माझा राग पेटेल, [QE][QS]किती वेळ ते अशुद्ध राहणार? [QE]
6. [QS]कारण ही मूर्ती इस्राएलातून आली, [QE][QS]कारागिराने बनवली, [QE][QS]ती देव नाही शोमरोनाच्या [QE][QS]वासराचे तुकडे होतील. [QE]
7. [QS]कारण लोक वारा पेरतात [QE][QS]आणि वावटळीची कापणी करतात, [QE][QS]उभ्या पिकाला कणीस नाही, [QE][QS]ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही, [QE][QS]आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली [QE][QS]तरी परके त्यास गिळून टाकतील. [QE]
8. [QS]इस्राएलास गिळले आहे, [QE][QS]आता ते देशामध्ये बिन कामाची लबाडी करतात. [QE]
9. [QS]कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले, [QE][QS]एफ्राईमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत. [QE]
10. [QS]जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले, [QE][QS]तरी मी त्यांना आता एकत्र करीन. [QE][QS]राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील. [QE]
11. [QS]कारण एफ्राईमाने पापबलींसाठी आपल्या वेद्या वाढवल्या आहेत, [QE][QS]पण त्या वेद्या पाप करण्याचे कारण ठरल्या आहेत. [QE]
12. [QS]मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहीले, [QE][QS]पण ते त्याकडे अनोळख्या सारखे पाहतात. [QE]
13. [QS]मला अर्पणे करावी म्हणून [QE][QS]ते मांस देतात व खातात, [QE][QS]पण मी परमेश्वर, [QE][QS]ते स्वीकारत नाही. [QE][QS]आता मी त्यांचे पाप स्मरण करून [QE][QS]त्यांना शासन करणार, ते मिसर देशात परत जातील. [QE]
14. [QS]इस्राएलाला आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा विसर पडला आहे [QE][QS]आणि त्याने महाल बांधले आहेत, [QE][QS]यहूदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत, [QE][QS]पण मी त्याच्या शहरावर अग्नी पाठवीन, [QE][QS]तो त्याची तटबंदी नष्ट करून टाकेल. [QE]