1. {#1सततच्या बेइमानीमुळे इस्त्राएलाला शिक्षा } [QS]हे इस्राएला, [QE][QS]इतर लोकांसारखा आनंद करु नको, [QE][QS]कारण तू आपल्या देवाला सोडून [QE][QS]अविश्वासू झाला आहेस, [QE][QS]तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते. [QE]
2. [QS]पण खळे आणि द्राक्षांचे कुंड त्यांना खाऊ घालणार नाही, [QE][QS]नवा द्राक्षरस त्यांना निराश करेल. [QE]
3. [QS]ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत, [QE][QS]त्याशिवाय एफ्राईम मिसरात परत जाईल, [QE][QS]आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगळ पदार्थ[* काही खाद्यपदार्थ हे औपचारिकरीत्या अशुद्ध आहेत, म्हणून त्यांना खाऊ नये असे मोशेचे नियमशास्त्र जाहीर करते. ] खातील. [QE]
4. [QS]ते परमेश्वरास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही, [QE][QS]व ते त्यास प्रसन्न करु शकणार नाहीत, [QE][QS]त्यांचे बलीदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल [QE][QS]जे ते खातील ते अशुद्ध होतील, [QE][QS]कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल, [QE][QS]ते परमेश्वराच्या मंदीरात आणता येणार नाही. [QE]
5. [QS]परमेश्वराच्या सणाच्या दिवशी [QE][QS]नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल? [QE]
6. [QS]कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर, [QE][QS]मिसर त्यांना एकत्र करील [QE][QS]आणि मोफ त्यांना मुठमाती देईल, [QE][QS]वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील [QE][QS]आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील. [QE]
7. [QS]शासन करण्याचे दिवस येत आहेत, [QE][QS]प्रतिफळाचे दिवस येत आहेत, [QE][QS]इस्राएल हे जाणणार, [QE][QS]तुझ्या महापातकामुळे, [QE][QS]वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे. [QE]
8. [QS]संदेष्टा जो माझ्या देवासोबत आहे, [QE][QS]तो एफ्राईमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारध्याचा पाश आहे [QE][QS]आणि त्यामध्ये देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे. [QE]
9. [QS]गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले [QE][QS]त्यासारखा त्यांनी अती भ्रष्टाचार केला आहे. [QE][QS]देव त्यांच्या अधर्माची आठवण करून [QE][QS]त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे. [QE]
10. [QS]परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला [QE][QS]तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, [QE][QS]अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले [QE][QS]पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले [QE][QS]ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले. [QE]
11. [QS]एफ्राईमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल [QE][QS]तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही. [QE]
12. [QS]जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन [QE][QS]ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार [QE][QS]यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये. मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय! [QE]
13. [QS]मी एफ्राईमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा, कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला [QE][QS]पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल. [QE]
14. [QS]त्यास दे, परमेश्वरा, त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारे [QE][QS]गर्भाशय व सुकलेले स्तन त्यांना दे. [QE]
15. [QS]कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे, [QE][QS]तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. [QE][QS]त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून [QE][QS]त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार [QE][QS]नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत. [QE]
16. [QS]एफ्राईम रोगी आहे [QE][QS]त्यांचे मूळ सुकून गेले आहे, [QE][QS]त्यास फळ येणार नाही, [QE][QS]त्यांना जरी मुले झाली [QE][QS]तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन. [QE]
17. [QS]माझा देव त्यांना नाकारेल [QE][QS]कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, [QE][QS]ते देशोदेशी भटकणारे होतील. [QE]