1. {इशायाच्या बुंध्याची सात्त्विक कारकीर्द} [PS] इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल, व त्याच्या मुळातून निघालेल्या शाखेला फळ येईल. [QBR]
2. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर येईल, [QBR]
3. परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल; [QBR] त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही. [QBR]
4. याउलट तो दीनांचा न्याय चांगुलपणाने करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील. [QBR] तो आपल्या मुख दंडाने पृथ्वीला तडाखा देईल. आणि फुंकराने दुष्टांना ठार करील. [QBR]
5. धार्मिकता त्याचा कमरबंद असेल, आणि विश्वास त्याचा कमरवेष्टन होईल. [QBR]
6. लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल. [QBR] वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील. [QBR]
7. गाय व अस्वल एकत्र चरतील, आणि त्यांचे बच्चे एकत्र लोळतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. [QBR]
8. तान्हे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल [QBR] आणि दुधपीते बालक सापाच्या बिळात आपला हात घालील. [QBR]
9. माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; [QBR] कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. [QBR]
10. त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल. [QBR] राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल.
11. {अवशेषांचे विजयी परतणे} [PS] त्यादिवशी, असे होईल की प्रभू आपल्या अश्शूर, मिसर, पथ्रोस, [QBR] कूश, एलाम, शिनार, हमाथ व भूसमुद्रातील त्याच्या उर्वरीत लोकांस परत मिळविण्यासाठी आपले हात लांब करील. [QBR]
12. तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील व इस्राएलातून बहिष्कृत केलेल्या [QBR] आणि यहूदातील विखुरलेल्यांस पृथ्वीच्या चारही दिशांकडून एकत्र करील. [QBR]
13. तो एफ्राइमाचे वैर संपवेल, आणि यहूदाचे जे विरोधी त्यांचा बिमोड करेल. [QBR] एफ्राइम यहूदाचा द्वेष करणार नाही, आणि यहूदा एफ्रइमाशी विरोध करणार नाही. [QBR]
14. याउलट ते पश्चिमेकडील पलिष्ट्यांच्या टेकड्यांवर झडप घालतील, आणि एकत्रितपणे पूर्वेकडील लोकांस लुटतील. [QBR] अदोम व मवाब यांच्यावर ते हमला करतील आणि अम्मोनाचे लोक त्यांच्या आज्ञा पाळतील. [QBR]
15. परमेश्वर मिसराच्या समुद्राची खाडी दुभागील. आपल्या उष्ण श्वासाने फरात नदीवर आपला हात चालवील, [QBR] आणि जोडे घालून तिला ओलांडता येईल अशा रीतीने तिला सात फाटयांमध्ये विभागील. [QBR]
16. इस्राएल मिसर देशातून वर आला, [QBR] तेव्हा त्याचप्रमाणे त्याच्या अवशिष्ट लोकांस अश्शूरातून परतण्यास हमरस्ता होईल. [PE]