1. {स्तुतिगीत} PS त्या दिवशी तू म्हणशील,
“हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे. |
2. पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही,
कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.” |
4. त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा;
लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा. |
6. अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.” PE
|