1. {#1कूशाविषयीचे भाकित } [QS]कूशातील नद्यांच्या पलीकडील सळसळणाऱ्या पंखाच्या देशा हायहाय; [QE]
2. [QS]जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो. [QE][QS]शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे, [QE][QS]जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र, [QE][QS]ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा, [QE]
3. [QS]अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो, [QE][QS]जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका. [QE]
4. [QS]परमेश्वराने मला हे सांगितले आहे की, [QE][QS]जसे सूर्याच्या प्रकाशात उकळणारी उष्णता असते अथवा जसे कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र येते, तसे मी आपल्या निवासस्थानातून शांतपणे निरीक्षण करीन. [QE]
5. [QS]कापणीच्यापूर्वी, जेव्हा बहार संपल्यावर फुले द्राक्षात पिकू लागतात, [QE][QS]तेव्हा तो कोयत्याने डहाळ्या कापील व खाली काढून टाकेल आणि पसरलेल्या फांद्या काढून टाकेल. [QE]
6. [QS]पर्वतावरील पक्ष्यांसाठी आणि पृथ्वीवरील जनावरांसाठी त्या एकत्र टाकून ठेवल्या जातील. [QE][QS]उन्हाळ्यात पक्षी त्यामध्ये राहतील आणि थंडीत पृथ्वीवरील जनावरे त्यावर हिवाळा घालवतील.”
7. त्या वेळेला, उंच आणि मनमिळावू लोक, भीतीपासून दूर व जवळ असे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे ते, सेनाधीश परमेश्वराचे नाव दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश पमेश्वराला स्वतःचा नजराणा म्हणून अर्पण करण्यास येतील. [QE]