मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यशया
1. {दृष्टांताच्या खोऱ्याविषयी देववाणी} [PS] दृष्टांताच्या खोऱ्याविषयी [* यरूशलेम] ही देववाणी; [QBR] तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे? [QBR]
2. एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी, [QBR] तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत. [QBR]
3. तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे, [QBR] तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत. [QBR]
4. यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन, [QBR] माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करु नका. [QBR]
5. कारण हा गोंगाटाचा, पायाखाली तुडवण्याचा आणि गडबडीचा दिवस सेनाधीश परमेश्वर, प्रभू [QBR] याजकडून दृष्टांताच्या खोऱ्यात आला आहे. त्या दिवशी लोक भिंती फोडतील आणि डोंगराकडे ओरडतील. [QBR]
6. एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडेस्वार घेऊन बाणांचा भाता वाहिला, [QBR] आणि कीराने ढाल उघडी केली. [QBR]
7. आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे [QBR] रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील. [QBR]
8. त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे, [QBR] आणि त्या दिवशी तू वनांतील घरांत शस्त्रांवर दृष्टी लावली. [QBR]
9. दाविदाच्या नगराला पुष्कळ भगदाडे पडलेली तुम्ही पाहिले आहे, [QBR] आणि तुम्ही खालच्या तळ्यातील पाणी जमा केले. [QBR]
10. तू यरूशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली [† भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोड शहराच्या आतील आणि बाहेरील भिंतीच्या मधील दुरुस्ती करण्याच्या पलीकडे असलेली घरे त्यांनी पाडून टाकली. त्या घराच्या पुढील आणि मागील भिंतींनी मिळून त्या भींतीचा भाग बनला, आणि त्या पडलेल्या घरांच्या आतील भिंतींच्या दगडांचा उपयोग शहराची बाहेरील भिंत दुरुस्त करण्यासाठी केला.] . [QBR]
11. दोन भिंतीच्या मध्ये हौद बांधून जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी सोय केली. [QBR] पण तू शहर बांधनाऱ्याचा विचार केला नाही, ज्याने त्या बद्दल पूर्वीच योजिले होते. [QBR]
12. त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, [QBR] रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे. [QBR]
13. परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. [QBR] आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे. [QBR]
14. आणि सैन्याच्या परमेश्वराने माझ्या कानात हे सांगितले की, [QBR] जरी तू मेलास, तरी या तुझ्या पापांची क्षमा केली जाणार नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
15. {शेबनाच्या जागी एल्याकीम येणार} [PS] सेनाधीश परमेश्वर, प्रभू असे म्हणतो, हा कारभारी शेबना, जो राजाच्या घरावर नेमला आहे, त्याकडे जा व त्यास बोल; [QBR]
16. तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस? [QBR] जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणांत खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो तशी तू आपणासाठी कबर खोदीत आहेस. [QBR]
17. पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील. [QBR]
18. तो तुला गुंडाळून चेंडुसारखा मोठ्या देशात फेकून देईन, [QBR] तू आपल्या धन्याच्या घरात अप्रतिष्ठा असा आहेस तो तू मरशील, आणि तुझ्या गौरवाचे रथ तेथेच राहतील. [QBR]
19. प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील. [QBR]
20. आणि त्या दिवशी असे होईल हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम यास मी बोलावीन. [QBR]
21. तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंध त्यास देईन व तुझे अधिकर मी त्याच्या हाती देईन. [QBR] यरूशलेमेच्या राहणाऱ्यांना व यहूदाच्या घराण्याला पिता असा होईल. [QBR]
22. दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन, [QBR] तो उघडील आणि कोणीच ते बंद करणार नाही, आणि जे काही बंद करील ते कोणीच उघडू शकणार नाही. [QBR]
23. त्यास मी सुरक्षीत ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन, [QBR] आणि तो आपल्या पित्याच्या घराला वैभवशाली राजासन असे होईल. [QBR]
24. त्याच्या पित्याच्या घराण्यातील सर्व गौरव, मुले व संतती, सर्व लहान पात्रे, [QBR] पेल्यापासून सुरईपर्यंत सर्व भांडी तिच्यावर टांगून ठेवतील. [PE][PS]
25. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मग असे घडेल की, भिंतीत पक्का केलेला खिळा असतो तो शिळ्या जवळ ढिला होउन पडेल व जो भार तिच्यावर होता तो छेदला जाईल, कारण परमेश्वर हे बोलला आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 66 अध्याय, Selected धडा 22 / 66
यशया 22:31
दृष्टांताच्या खोऱ्याविषयी देववाणी 1 दृष्टांताच्या खोऱ्याविषयी * यरूशलेम ही देववाणी; तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे? 2 एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी, तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत. 3 तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे, तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत. 4 यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन, माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करु नका. 5 कारण हा गोंगाटाचा, पायाखाली तुडवण्याचा आणि गडबडीचा दिवस सेनाधीश परमेश्वर, प्रभू याजकडून दृष्टांताच्या खोऱ्यात आला आहे. त्या दिवशी लोक भिंती फोडतील आणि डोंगराकडे ओरडतील. 6 एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडेस्वार घेऊन बाणांचा भाता वाहिला, आणि कीराने ढाल उघडी केली. 7 आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील. 8 त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे, आणि त्या दिवशी तू वनांतील घरांत शस्त्रांवर दृष्टी लावली. 9 दाविदाच्या नगराला पुष्कळ भगदाडे पडलेली तुम्ही पाहिले आहे, आणि तुम्ही खालच्या तळ्यातील पाणी जमा केले. 10 तू यरूशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोड शहराच्या आतील आणि बाहेरील भिंतीच्या मधील दुरुस्ती करण्याच्या पलीकडे असलेली घरे त्यांनी पाडून टाकली. त्या घराच्या पुढील आणि मागील भिंतींनी मिळून त्या भींतीचा भाग बनला, आणि त्या पडलेल्या घरांच्या आतील भिंतींच्या दगडांचा उपयोग शहराची बाहेरील भिंत दुरुस्त करण्यासाठी केला. . 11 दोन भिंतीच्या मध्ये हौद बांधून जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी सोय केली. पण तू शहर बांधनाऱ्याचा विचार केला नाही, ज्याने त्या बद्दल पूर्वीच योजिले होते. 12 त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे. 13 परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे. 14 आणि सैन्याच्या परमेश्वराने माझ्या कानात हे सांगितले की, जरी तू मेलास, तरी या तुझ्या पापांची क्षमा केली जाणार नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. शेबनाच्या जागी एल्याकीम येणार 15 सेनाधीश परमेश्वर, प्रभू असे म्हणतो, हा कारभारी शेबना, जो राजाच्या घरावर नेमला आहे, त्याकडे जा व त्यास बोल; 16 तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस? जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणांत खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो तशी तू आपणासाठी कबर खोदीत आहेस. 17 पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील. 18 तो तुला गुंडाळून चेंडुसारखा मोठ्या देशात फेकून देईन, तू आपल्या धन्याच्या घरात अप्रतिष्ठा असा आहेस तो तू मरशील, आणि तुझ्या गौरवाचे रथ तेथेच राहतील. 19 प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील. 20 आणि त्या दिवशी असे होईल हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम यास मी बोलावीन. 21 तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंध त्यास देईन व तुझे अधिकर मी त्याच्या हाती देईन. यरूशलेमेच्या राहणाऱ्यांना व यहूदाच्या घराण्याला पिता असा होईल. 22 दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन, तो उघडील आणि कोणीच ते बंद करणार नाही, आणि जे काही बंद करील ते कोणीच उघडू शकणार नाही. 23 त्यास मी सुरक्षीत ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन, आणि तो आपल्या पित्याच्या घराला वैभवशाली राजासन असे होईल. 24 त्याच्या पित्याच्या घराण्यातील सर्व गौरव, मुले व संतती, सर्व लहान पात्रे, पेल्यापासून सुरईपर्यंत सर्व भांडी तिच्यावर टांगून ठेवतील. 25 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मग असे घडेल की, भिंतीत पक्का केलेला खिळा असतो तो शिळ्या जवळ ढिला होउन पडेल व जो भार तिच्यावर होता तो छेदला जाईल, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
Total 66 अध्याय, Selected धडा 22 / 66
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References