1. {#1पृथ्वीविषयी परमेश्वराचा न्याय } [QS]पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे. [QE]
2. [QS]आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनिणीशी, [QE][QS]जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसणे देणाऱ्याची तशी उसणे घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल. [QE]
3. [PS]पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, [PE][QS]कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे. [QE]
4. [QS]मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे. [QE]
5. [QS]पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले, [QE][QS]आणि सार्वकालीक करार मोडला आहे. [QE]
6. [QS]त्यामुळे सार्वकालिक करार शापित झाला आहे व तेथे राहणारे दोषी आढळले आहेत. त्यांना त्याचे फळ भोगावे लागत आहे; शापाचा परिणाम म्हणून पुष्कळ लोक भस्म होतील व फार थोडे उरतील. [QE]
7. [QS]नवीन द्राक्षरस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंदोत्सव करणारे कण्हत आहेत. [QE]
8. [QS]डफांचा आनंदी आवाज आणि हर्षाने जे मौजमजा करीत ते थांबले आहेत, [QE][QS]वीणेचा आनंद बंद केला आहे. [QE]
9. [QS]ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल. [QE]
10. [QS]अंदाधूंदी असलेली नगरी मोडून पडली आहे, प्रत्येक घर बंद आणि रिकामे आहे. [QE]
11. [QS]द्राक्षरसामुळे चौका चौकात रडणे आहे. [QE][QS]सर्व हर्ष अंधकारमय आहे, भूमीचा आनंद नाहीसा झाला आहे. [QE]
12. [QS]नगरात ओसाडी उरली आहे, आणि दरवाज्याचा नाश झाला आहे. [QE]
13. [QS]द्राक्षांचा हंगाम सपंल्यावर व जैतून वृक्ष हलविल्यावर, झाडावर जशी थोडीशी फळे उरतात [QE][QS]तशी या देशाची अवस्था झालेली असणार तसे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे होईल. [QE]
14. [QS]ते आपला आवाज उंचावतील आणि परमेश्वराचे ऐश्वर्य ओरडतील, [QE][QS]आणि समुद्रावरून मोठ्याने आरोळी मारतील. [QE]
15. [QS]यास्तव पूर्वेत परमेश्वराचे गौरव करा, [QE][QS]आणि सागरातील द्वीपांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर, याच्या नावाला गौरव द्या. [QE]
16. [QS]पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की, “धार्मिकास वैभव असो.” [QE][QS]पण मी म्हणालो, मी वाया गेलो आहे, मी दूर वाया गेलो आहे, मला हाय हाय! कारण विश्वास घातकीने विश्वासघात केला आहे, [QE][QS]होय, विश्वास घातक्याने विश्वास घात केला आहे. [QE]
17. [QS]पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत. [QE]
18. [QS]जो भीतीच्या आवाजापासून पळेल तो खांचेत पडेल, आणि जो खांचेमधून वर निघेल तो पाशात पडेल. [QE][QS]स्वर्गाच्या खिडक्या उघडल्या आहेत, आणि पृथ्वीचे पाये हालत आहेत. [QE]
19. [QS]पृथ्वी अगदी मोडून गेली आहे, पृथ्वी फाटली आहे. [QE][QS]पृथ्वी फार हिंसकरीतीने हलवली आहे. [QE]
20. [QS]पृथ्वी एखाद्या मद्यप्यासारखी झोकांड्या खाईल, आणि एखाद्या टांगत्या बिछान्याप्रमाने झोके खाईल, [QE][QS]तिचा अपराध तिच्यावर भारी होईल तेव्हा ती पडेल आणि पुन्हा उठणार नाही. [QE]
21. [QS]त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल. [QE]
22. [QS]त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील, [QE][QS]नंतर त्यांचा न्याय केला जाईल. [QE]
23. [QS]नंतर सेनाधीश परमेश्वर सीयोनातील आपला राजासनावर आरूढ होईल तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिका पडेल, [QE][QS]तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने यरूशलेमेत राज्य करील. [QE]