1. {#1इस्राएलाची मुक्तता व एकत्रीकरण }
2. [PS]त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील. [PE][QS]तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील. [QE]
3. [QS]“मी परमेश्वर, तिची नीगा राखणारा, मी प्रत्येक क्षणी तिला पाणी घातले; [QE][QS]त्यामुळे कोणीही तिला दुखावणार नाही, म्हणून मी रात्र दिवस तिचे राखण करतो. [QE]
4. [QS]मी रागवलेलो नाही, लढाईत माझ्यापुढे काट्यांची झाडे व काटेरी झाडे कोण ठेवील! [QE][QS]पण युध्दात मी त्याच्या विरूद्ध चाल करून जाईल आणि मी त्यास जाळून नष्ट करून टाकीन. [QE]
5. [QS]अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे, त्याने माझ्याशी शांती प्रस्थापीत करावी. [QE]
6. [QS]येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्राएल उमलेले व त्यास नवीन पालवी फुटेल, [QE][QS]आणि ते जगाची पाठ फळांनी भरतील.” [QE]
7. [QS]काय परमेश्वराने याकोबावर आणि इस्राएलावर हल्ला केला, जसा त्याने त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर हल्ला केला? अथवा यांनी ज्यांचा वध केला आहे त्यांच्या वधाप्रमाणे यांचा वध करण्यात आला आहे काय? [QE]
8. [QS]याचप्रकारे तुम्ही याकोब आणि इस्राएलाला दूर [* बंदिवासात ]पाठवून अचूक मापदंडांनी [† अचूक मापदंडांनी ] त्यांचा विरोध केला आहे. पुर्वेच्या वाऱ्याच्या दिवशी त्यांना तो प्रचंड वाऱ्याने दूर करतो. [QE]
9. [QS]याकरीता याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल, आणि त्याचे पाप दूर करण्याचे फळ हेच आहे. [QE][QS]तो वेदीचे सर्व दगड खडूच्या चूर्ण केलेल्या चुनखड्यासारखे करेल, [QE][QS]आणि तसेच अशेरा देवीचे खांब किंवा धूप वेदीही उभ्या राहणार नाहीत. [QE]
10. [QS]कारण तटबंदी असलेले शहर नाश झाले आहे आणि वस्ती असलेले राणासारखी सोडून दिलेली आहे. [QE][QS]वासरू तेथे चरेल आणि तेथे बसेल आणि त्याच्या फांद्या खाऊन टाकेल. [QE]
11. [QS]त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील. [QE][QS]कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव [QE][QS]ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही. [QE]
12. [QS]त्या दिवशी असे होईल की, [QE][QS]परमेश्वर फरात नदीपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या आपल्या पिकाची मळणी करील, [QE][QS]आणि तुम्ही इस्राएलच्या लोकांनो एकत्र गोळा केले जाणार. [QE]
13. [QS]त्या दिवशी मोठा कर्णा वाजेल, [QE][QS]आणि तेव्हा अश्शूर देशामध्ये नाश होणारे आणि मिसर देशात जे घालवले आहेत ते येतील. [QE][QS]आणि यरूशलेमेस पवित्र पर्वतावर परमेश्वरास पुजतील. [QE]