1. {#1एफ्राइमाला इशारा } [QS]एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला [* फुलांचा हार ]हायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय! [QE]
2. [QS]पाहा! परमेश्वराकडे पराक्रमी आणि बलवान असा एक आहे. तो गारपिटीप्रमाणे आहे. [QE][QS]नष्ट करणाऱ्या वादळाप्रमाणे, आणि प्रचंड ढगफूटी प्रमाणे, तो पृथ्वीला आपल्या हाताने ताडना करेल. [QE]
3. [QS]एफ्राइममधील मद्याप्यांचा अभिमानी मुकुट पायाखाली तुडवला जाईल. [QE]
4. [QS]त्याच्या वैभवशाली सौंदर्याचे कोमेजणारे फूल, जे खोऱ्याच्या माथ्यावर आहे, [QE][QS]उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे त्याची स्थिती होईल, त्याकडे पाहणारा पाहतो तेव्हा तो त्याच्या हातांत असतानांच तो खाऊन टाकतो. [QE]
5. [QS]त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांच्या उरलेल्यांना सुंदर मुकुट असा होईल. [QE]
6. [QS]आणि जो न्याय करत बसतो त्यास तो न्यायाचा आत्मा आणि जे वेशीजवळ लढाई मागे हटवतात त्यांना तो पराक्रम असा होईल. [QE]
7. {#1यरूशलेमेस इशारा व अभिवचन } [QS]पण हे सुद्धा द्राक्षरसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत. [QE][QS]याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत आणि मद्याने त्यांना गिळून घेतले आहे. [QE][QS]ते मद्याने अडखळून पडत आहेत आणि ते दृष्टांतात भ्रमतात, ते न्याय करण्यात अडखळतात. [QE]
8. [QS]खरोखर सर्व मेजे ओकारीने भरलेली आहेत, कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही. [QE]
9. [QS]तो कोणाला ज्ञान शिकवील? आणि तो कोणाला निरोप समजावेल? [QE][QS]दुग्धापासून दूर केलेल्यांना किंवा स्तनपानापासून दूर केलेल्यांना काय? [QE]
10. [QS]कारण नियमा वर नियम, नियमावर नियम, ओळीवर ओळ, ओळीवर ओळ, इथे थोडे, तिथे थोडे, असे आहे. [QE]
11. [QS]खरच, तोतऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेने तो या लोकांशी बोलेल. [QE]
12. [QS]पूर्वी तो त्यांना म्हणाला, “येथे विश्रांती आहे, थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या, आणि हे उत्साहवर्धक आहे.” पण ते काही ऐकेनात. [QE]
13. [QS]लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. [QE][QS]हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. [QE][QS]म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले. [QE]
14. [QS]याकरिता, जे तुम्ही थट्टा करता, आणि जे तुम्ही यरूशलेमेवर राज्य करता, [QE][QS]ते तुम्ही परमेश्वराचे वचन काय म्हणते ते ऐका. [QE]
15. [QS]तुम्ही म्हटले, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. [QE][QS]अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही, जेव्हा बुडवणारी शिक्षा पार केली जाईल तेव्हा ती आमच्यापर्यंत येऊ शकणार नाही; [QE][QS]कारण आम्ही कपटाच्या मागे लपलो आहोत व असत्याला आपले आश्रय केले आहे.” [QE]
16. [QS]यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, [QE][QS]“पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा, [QE][QS]कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो. [QE][QS]जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही. [QE]
17. [QS]मी न्याय मोजमापाची काठी, [QE][QS]आणि नितीमत्ता हा ओळंबा असे करीन, [QE][QS]तेव्हा गारपीट खोट्यांचे आश्रय झाडून टाकील, [QE][QS]आणि पूराचे पाणी लपण्याच्या जागा झाकून टाकील.” [QE]
18. [QS]तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल [QE][QS]आणि अधोलोकाशी तुमचा झालेला करार रद्द केला जाईल. [QE][QS]जेव्हा प्रकोपाचा पूर पार केला जाईल, [QE][QS]त्या द्वारे तुम्ही झाकले जाल. [QE]
19. [QS]जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल. [QE][QS]आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल. [QE][QS]आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल. [QE]
20. [QS]कारण अंथरूण पाय पसरावयास खूप लहान आहे, [QE][QS]आणि पांघरुण पांघरायला पुरत नाही एवढे ते अरुंद आहे. [QE]
21. [QS]जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता, [QE][QS]जसा तो गिबोन दरीत रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल. [QE][QS]अशासाठी की त्याने आपले कार्य, [QE][QS]त्याचे अद्भूत कृत्य आणि त्याचे विस्मयकारी कृत्य करावे. [QE]
22. [QS]तर आता तुम्ही थट्टा करू नका, [QE][QS]नाहीतर तुमची बंधणे घट्ट करण्यात येतील. [QE][QS]कारण पृथ्वीवर नाश होण्याचा ठराव, [QE][QS]मी सेनाधीश परमेश्वरापासून ऐकला आहे. [QE]
23. [QS]मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका, [QE][QS]सावध असा, माझे शब्द ऐका. [QE]
24. [QS]पेरणी करण्यासाठी शेतकरी सतत शेत नांगरतो का? [QE][QS]तो सतत मशागत करतो का? [QE]
25. [QS]त्याने जमीन तयार केल्यावरच तो काळे जिरे टाकतो व जिरे विखरतो, [QE][QS]तो गहू रांगेत आणि जव नेमलेल्या ठिकाणी आणि त्याच्या काठाला काठ्या गहू पेरीत नाही काय? [QE]
26. [QS]कारण त्याचा देव त्यास सूचना देतो, [QE][QS]तो त्यास सुज्ञपणे शिकवतो. [QE]
27. [QS]शिवाय, काळे जिरे घणाने मळत नाही, किंवा तिच्यावर गाडीचे चाक फिरवले जात नाही, [QE][QS]पण काळे जिरे काठीने आणि जिरे दंडाने झोडतात. [QE]
28. [QS]भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही. [QE][QS]आणि जरी त्याच्या गाडीचे चाक व त्याचे घोडे ते विखरतात तरी तो ते दळीत नाही. [QE]
29. [QS]सेनाधीश परमेश्वर, जो संकल्पात सुंदर आहे आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहे. त्याच्याकडून हे आहे. [QE]