1. {#1मिसरावरील अवलंबून राहणे व्यर्थ } [QS]परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे. [QE][QS]ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात, [QE][QS]पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही, [QE][QS]अशी ती पापाने पापाची भर घालतात. [QE]
2. [QS]ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता [QE][QS]आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिसरकडे खाली उतरून जातात. [QE]
3. [QS]यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज [QE][QS]आणि मिसरमधील आश्रय हे तुमच्या साठी मानखंडणा असे होईल. [QE]
4. [QS]तुमचे अधिकारी सोअनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत. [QE]
5. [QS]कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत [QE][QS]तर लाज व निंदा असे आहेत त्यांच्यामुळे ते सर्व लाजवले जातील.” [QE]
6. [QS]नेगेबमधल्या[* इज्राएलाच्या दक्षिणेच्या भागाच्या ] प्राण्यांविषयी घोषणा संदेश: [QE][QS]आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे, [QE][QS]संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, [QE][QS]ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात. [QE]
7. [QS]मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला स्वस्थ बसणारा रहाब असे नाव दिले. [QE]
8. [QS]आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव, [QE][QS]अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील. [QE]
9. [QS]कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले, [QE][QS]मुले जी परमेश्वराची शिकवणूक ऐकण्यास नकार देतात. [QE]
10. [QS]ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” [QE][QS]आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; [QE][QS]आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग. [QE]
11. [QS]मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर, [QE][QS]इस्राएलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा.” [QE]
12. [QS]यामुळे इस्राएलचा पवित्र असे म्हणतो, [QE][QS]“कारण तुम्ही हा संदेश नाकारता [QE][QS]आणि जुलूम व कपट यांवर विसंबून राहता. [QE]
13. [QS]म्हणून हा अन्याय तुम्हास, [QE][QS]जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो, [QE][QS]ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल. [QE]
14. [QS]कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही. [QE][QS]आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही.” [QE]
15. [QS]कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो, [QE][QS]“तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.” [QE][QS]पण तुम्ही इच्छुक नव्हते. [QE]
16. [QS]तुम्ही म्हणता, नाही! [QE][QS]कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल. [QE][QS]आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील. [QE]
17. [QS]एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. [QE][QS]पाच जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल. [QE][QS]पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल तोपर्यंत असे होईल. [QE]
18. {#1देवाच्या लोकांस त्याच्या कृपेचे अभिवचन } [QS]तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहील. तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल, [QE][QS]कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे, जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादीत आहेत. [QE]
19. [QS]कारण यरूशलेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधीही रडणार नाहीस. [QE][QS]खचित तो तुझ्या रडण्याचा आवाज होताच तुझ्यावर दया करील, जेव्हा ते ऐकल, तो तुला उत्तर देईल. [QE]
20. [QS]जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु:खाचे पाणी देईल, [QE][QS]तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील. [QE]
21. [QS]जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल तर तुझे कान तुझ्यामागून वाणी ऐकतील, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही या मार्गात चालावे.” [QE]
22. [QS]तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल. [QE][QS]तुम्ही त्या देवांना मासिकपाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल. तुम्ही त्यांना म्हणाल, “येथून निघून जा.” [QE]
23. [QS]तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल [QE][QS]आणि भूमीतून मुबलक अशी भाकर देईल. [QE][QS]आणि पिके विपुल होईल. [QE][QS]त्या दिवसात तुझी गुरे मोठ्या कुरणांमध्ये चरतील. [QE]
24. [QS]आणि बैल व गाढव जे नांगरतात [QE][QS]ते सुपाने व दांताळ्याने उफणलेल्या धान्याचे आंबवण खातील. [QE]
25. [QS]आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील. [QE]
26. [QS]त्यावेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश जसा सात दिवसाचा प्रकाश तसा सात पट होईल. [QE][QS]परमेश्वर त्याच्या जखमी लोकांस मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल. [QE]
27. {#1अश्शूराबाबत परमेश्वराचा न्याय } [QS]पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे, [QE][QS]त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. [QE]
28. [QS]त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे, [QE][QS]अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे, आणि त्याचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील. [QE]
29. [QS]जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रामाणे तुमचे गीत होते. [QE][QS]आणि जसा कोणी परमेश्वराच्या डोंगरावर इस्राएलाच्या खडकाकडे जाताना पावा वाजवत जातो तसा तुम्हास आनंद होईल. [QE]
30. [QS]परमेश्वर आपला वैभवी आवाज लोकांस ऐकू जाऊ देईल आणि वारा, पाऊस व गारपीट सह क्रोधाविष्ट व अग्नी यांनी तो आपला भुज चालवील. [QE]
31. [QS]परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर विखुरला जाईल. तो त्यास आपल्या काठीने मारील. [QE]
32. [QS]आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो, [QE][QS]डफ व वीणा वाजत असताना होईल, आणि हात खाली वर करीत युद्धांमध्ये तो त्यांच्याशी लढेल. [QE]
33. [QS]पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे, ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. [QE][QS]त्याच्या चीतेसाठी विस्तव आणि खूप लाकडे असे आहे. परमेश्वराचा श्वास जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे त्यास पेटवतो. [QE]