1. {#1परमेश्वर उद्धार करील } [QS]अरे विध्वंसका, जो तुझा नाश झाला नाही! [QE][QS]अरे विश्वासघातक्या, जो तुझा त्यांनी विश्वासघात केला नाही, तुला धिक्कार असो! [QE][QS]जेव्हा तू विध्वंस करणे थांबवशील तेव्हा तू नाश पावशील, [QE][QS]जेव्हा तू विश्वासघातकीपणा सोडशील, तेव्हा ते तुझा विश्वासघात करतील. [QE]
2. [QS]हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी वाट पाहतो; [QE][QS]रोज सकाळी तू आमचा भुज हो, आमच्या संकटकाळी आमचा उद्धारक हो. [QE]
3. [QS]मोठा आवाज ऐकताच लोक पळून गेले; जेव्हा तू उठलास, राष्ट्रांची पांगापांग झाली. [QE]
4. [QS]टोळ नाश करतात त्याप्रमाणे तुमची लूट गोळा करतील, जसे टोळ धाड टाकतात तसे मनुष्ये तिजवर धाड टाकतील. [QE]
5. [QS]परमेश्वर उंचावला आहे. तो उच्चस्थानी राहतो. त्याने सियोनेस प्रामाणिकपणा व चांगुलपणा यांनी भरले आहे. [QE]
6. [QS]तुझ्याकाळी तो स्थिरता देईल, तारण, सुज्ञता व ज्ञान, यांची विपुलता देईल, परमेश्वराचे भय त्याचा धनसंग्रह होईल. [QE]
7. [QS]पाहा त्याचे वीर बाहेर रस्त्यात रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे शांतीच्या आशेने स्फुंदून जोराने रडत आहेत. [QE]
8. [QS]राजमार्ग ओसाड पडले आहेत; तेथे कोणीही प्रवासी नाही. [QE][QS]त्याने निर्बंध मोडला आहे, साक्षीदारांसह तुच्छ लेखले, आणि नगरांचा [* साक्षींचा ]अनादर केला. [QE]
9. [QS]भूमी शोक करते आणि ती शुष्क झाली आहे; लबानोन निस्तेज झाला आहे आणि शुष्क झाला आहे; [QE][QS]शारोन सपाट रानाप्रमाणे झाला आहे; आणि बाशान व कर्मेल आपली पाने गाळीत आहेत. [QE]
10. [QS]परमेश्वर म्हणतो आता मी उठेन, आता मी उठून उभा राहिल, आता मी उंचावला जाईन. [QE]
11. [QS]तुम्ही भुसकटाची गर्भधारणा कराल व धसकट प्रसवाल, तुमचा श्वास अग्नी आहे तो तुम्हास खाऊन टाकील. [QE]
12. [QS]लोक भाजलेल्या चुन्याप्रमाणे भस्म होतील, जसे काटेरी झुडपे तोडून व अग्नीत टाकतात. [QE]
13. [QS]जे तुम्ही फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका; आणि जे तुम्ही जवळ आहात, ते तुम्ही माझे सामर्थ्य जाणून घ्या. [QE]
14. [QS]सियोनेतील पापी घाबरले आहेत. अधर्म्यास थरकाप सुटला आहे. [QE][QS]आमच्यातला कोण जाळून टाकणाऱ्या अग्नीत वस्ती करील? [QE]
15. [QS]तो, नीतीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो; [QE][QS]जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही [QE][QS]व दुष्कृत्याकडे पाहत नाही. [QE]
16. [QS]तो आपले घर उच्च स्थळी करील; [QE][QS]त्याचे रक्षणाचे स्थान पाषाणाच्या तटबंदीचे दुर्ग असे होतील; त्यांना अन्न व पाण्याचा मुबलक पुरवठा अखंडीत चालू राहील. [QE]
17. [QS]तुझे नेत्र राजाला त्याच्या शोभेत पाहतील; ते विस्तीर्ण भूमी पाहतील. [QE]
18. [QS]भयप्रद गोष्टींचे स्मरण तुझ्या मनाला होईल; लिखाण करणारा कोठे आहे, पैसे तोलणारा कोठे आहे? मनोऱ्यांची गणती करणारा कोठे आहे? [QE]
19. [QS]उद्धट मनोवृतीचे लोक, अनोळखी भाषा बोलणारे लोक, ज्यांचे तुला पुर्णपणे आकलन झाले नाही अशा लोकांस तू फार काळ पाहणार नाहीस. [QE]
20. [QS]सियोनेकडे पाहा, हे नगर आपल्या मेजवाणीचे आहे; [QE][QS]तुझे डोळे यरूशलेमेकडे शांतीचे वस्तीस्थान म्हणून पाहतील. त्याचा तंबू कधीही काढणार नाहीत, [QE][QS]त्याच्या खुंट्या कधीही उपटणार नाहीत, ज्याच्या दोरखंडातील एकही दोरी तुटणार नाही. [QE]
21. [QS]त्या जागी वैभवी परमेश्वर आपल्या समवेत असेल, ती जागा रूंद नदी व प्रवाहांची अशी होईल. [QE][QS]त्यामध्ये वल्हेकऱ्यांच्या युद्ध नौका आणि मोठे जहाज त्यातून प्रवास करणार नाहीत. [QE]
22. [QS]कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आम्हास न्याय देणारा आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तोच आम्हास तारील. [QE]
23. [QS]तुझे दोर ढिले झाले आहेत; त्यांना आपल्या डोलकाठीस घट्ट धरून ठेवत आधार नाहीत; ते शीड पसरीत नाहीत; [QE][QS]जेव्हा मोठ्या लुटीची लूट वाटण्यात आली, जे पांगळे त्यांनी लूट वाटून घेतली. [QE]
24. [QS]मी रोगी आहे, असे म्हणणारा त्यामध्ये वस्ती करणार नाही. जे लोक त्यामध्ये राहतात त्यांच्या अन्यायांची क्षमा करण्यात येईल. [QE]