1. {#1अदोम व इतर राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा कोप } [QS]तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत. [QE]
2. [QS]कारण सर्व राष्ट्रावर परमेश्वर रागावला आहे आणि त्यांच्या सैन्यांविरूद्ध संताप झाला आहे; [QE][QS]त्याने त्यांचा समूळ नाश केला आहे. त्याने त्यांचा संहार करण्यासाठी त्यांच्या हवाली केले आहे. [QE]
3. [QS]त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल, [QE][QS]आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल. [QE]
4. [QS]आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील, [QE][QS]आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल; आणि सर्व तारे लुप्त होतील, [QE][QS]जसे द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, जसा अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो. [QE]
5. [QS]ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, [QE][QS]पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल. [QE]
6. [QS]परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे, [QE][QS]ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे. [QE][QS]कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे. [QE]
7. [QS]रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल. [QE][QS]त्यांची भूमी रक्त पिईल व तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल. [QE]
8. [QS]कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे. [QE]
9. [QS]अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल, [QE][QS]आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल. [QE]
10. [QS]तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल. [QE][QS]ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही. [QE]
11. [QS]पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील. [QE][QS]तो तिच्यावर अस्ताव्यस्ततेची दोरी ताणील आणि ओसाडीचा ओळंबा लावील. [QE]
12. [QS]तिच्या सरदारांना [QE][QS]राज्यावर बोलावतील पण तेथे त्यातले कोण असणार नाहीत, आणि तिचे सर्व अधिपती नाहीसे होतील. [QE]
13. [QS]तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील. [QE][QS]ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल. [QE]
14. [QS]हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील. [QE][QS]निशाचर प्राणीही तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल. [QE]
15. [QS]तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील. [QE][QS]होय, घार आपआपल्या जोडीदारांसोबत जमा होतील. [QE]
16. [QS]परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही. [QE][QS]कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे. [QE]
17. [QS]त्यांच्या जागेसाठी त्यांनी चिठ्ठी टाकली आहे, आणि त्याने आपल्या हाताने ती भूमी दोरीने मापून त्यांना वाटून दिली आहे. [QE][QS]ते त्यांचे सर्वकाळचे वतनदार होतील; ते पिढ्यानपिढ्या त्यामध्ये राहतील. [QE]