मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यशया
1. {देवाच्या लोकांचे पुनर्वसन} [PS] निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि [QBR] कमळाप्रमाने बहरेल. [QBR]
2. ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; [QBR] त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; [QBR] ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील. [QBR]
3. दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा. [QBR]
4. जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” [QBR] पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, [QBR] देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील. [QBR]
5. मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील. [QBR]
6. नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल. [QBR] अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील. [QBR]
7. मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; [QBR] कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल. [QBR]
8. तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील. [QBR] अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही. [QBR]
9. तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, [QBR] परंतु तेथे उद्धारलेले चालतील. [QBR]
10. परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत [QBR] आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; [QBR] आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील. [PE]

Notes

No Verse Added

Total 66 अध्याय, Selected धडा 35 / 66
यशया 35:31
देवाच्या लोकांचे पुनर्वसन 1 निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि कमळाप्रमाने बहरेल. 2 ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील. 3 दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा. 4 जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील. 5 मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील. 6 नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल. अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील. 7 मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल. 8 तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील. अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही. 9 तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, परंतु तेथे उद्धारलेले चालतील. 10 परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील.
Total 66 अध्याय, Selected धडा 35 / 66
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References