1. त्या दिवशी सात स्त्रिया एका पुरुषाला ताब्यात घेऊन
म्हणतील आमचे स्वतःचेच अन्न आम्ही खाऊ, आमचे स्वतःचेच कपडे आम्ही घालू परंतु आमची लज्जा दूर करण्याकरिता आम्हास तुझे नाव घेऊ दे. PS |
2. {यरूशलेमेचे उज्वल भवितव्य} PS त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर व गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट व आनंददायी होईल. PEPS
|
3. यानंतर जो कोणी सियोनात राहील, जो कोणी यरूशलेमेत बाकी राहील, प्रत्येक जण जो कोणी येरुशलेमेत जिवंत असा गणला जाईल त्यास पवित्र असे म्हणतील,
|
4. ज्या वेळेस परमेश्वर सियोनेच्या कन्यांची अशुद्धता दूर करेल, आणि यरूशलेमेच्या गर्भातील रक्ताचे डाग त्याच्या न्यायाच्या आत्म्याने व ज्वलंत अग्नीच्या आत्म्याने स्वच्छ करील तेव्हा हे होईल. PEPS
|
5. नंतर परमेश्वर सियोन पर्वताच्या संपूर्ण जागेवर व तिच्या मेळ्यांच्या जागेवर दिवसा ढग व धूर, आणि रात्री जळत्या अग्नीच्या ज्वालेचा प्रकाश, परमेश्वराच्या वैभवाचे छत, निर्माण करील.
|