मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1. {इस्राएलाला देवाचे आश्वासन} [PS] अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत; [QBR] ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ. [QBR]
2. पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे? [QBR] त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले; [QBR] त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले. [QBR]
3. तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात. [QBR]
4. ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? [QBR] मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे. [QBR]
5. द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात; त्या जवळ येतात. [QBR]
6. प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर. [QBR]
7. तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो, [QBR] त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.” [QBR]
8. परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या, अब्राहाम याच्या संताना, [QBR]
9. मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले, [QBR] आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही. [PE][PS]
10. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन. [QBR]
11. पाहा, जे सर्व तुझ्यावर रागावले आहेत ते लज्जित व फज्जित होतील; जे तुला विरोध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील. [QBR]
12. जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत. [QBR] जे तुझ्याविरूद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील. [QBR]
13. कारण मी, परमेश्वर तुझा देव, तुझा उजवा हात धरतो, मी तुला सांगतो: घाबरू नकोस; मी तुला मदत करीन. [QBR]
14. हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको. [QBR] मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे. [QBR]
15. पाहा, मी तुला नवीन व दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे; [QBR] तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील. [QBR]
16. तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. [QBR] आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील. [QBR]
17. खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; [QBR] मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही. [QBR]
18. मी उतरणीवरून खाली प्रवाह आणि दऱ्यांमधून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन; [QBR] मी वाळवंटात पाण्याचे तळे आणि शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील. [QBR]
19. मी रानात गंधसरू, बाभूळ, व मेंदीचे, जैतून वृक्ष वाढतील. [QBR] मी वाळवंटात देवदारू, भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील. [QBR]
20. मी हे यासाठी करीन की, लोकांनी पाहावे, ओळखावे आणि एकत्रित समजावे, [QBR] परमेश्वराच्या हाताने हे केले आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू ज्याने हे उत्पन्न केले आहे.
21. {खोट्या दैवतांना परमेश्वराचे आव्हान} [PS] परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; [QBR] याकोबाचा राजा म्हणतो, आपल्या मूर्तींसाठी आपले उत्तम वादविवाद पुढे आणा. [QBR]
22. त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे, [QBR] पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हास सांगा, [QBR] म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याची परिपूर्तता कशी होईल ते जाणू. [QBR] म्हणजे ह्यागोष्टी आम्हास चांगल्या कळतील. [QBR]
23. भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा, म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हास समजेल; [QBR] काही तरी चांगले किंवा वाईट करा, म्हणजे आम्ही विस्मीत आणि प्रभावीत होऊ. [QBR]
24. पाहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्ये काहीच नाहीत; जो कोणी तुम्हास निवडतो तो तिरस्करणीय आहे. [QBR]
25. “मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे; तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो, [QBR] आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.” [QBR]
26. आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे? [QBR] खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही, होय! तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही. [QBR]
27. मी सियोनेला प्रथम म्हणालो, पाहा, ते येथे आहेत; मी यरूशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे. [QBR]
28. जेव्हा मी पाहिले, तेथे कोणी नाही, मी त्यांना विचारले असता, एका शब्दाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कोणीही नाही, [QBR] एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कोणी नाही. [QBR]
29. पाहा, त्यातले सर्व काहीच नाहीत, [QBR] आणि त्यांची कृत्ये काहीच नाहीत; त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यवतच आहेत. [PE]

Notes

No Verse Added

Total 66 Chapters, Current Chapter 41 of Total Chapters 66
यशया 41:29
1. {इस्राएलाला देवाचे आश्वासन} PS अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत;
ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ.
2. पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे?
त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले;
त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले.
3. तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात.
4. ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले?
मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे.
5. द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात; त्या जवळ येतात.
6. प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर.
7. तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो,
त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.”
8. परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या, अब्राहाम याच्या संताना,
9. मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले,
आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही. PEPS
10. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.
11. पाहा, जे सर्व तुझ्यावर रागावले आहेत ते लज्जित फज्जित होतील; जे तुला विरोध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील.
12. जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत.
जे तुझ्याविरूद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील.
13. कारण मी, परमेश्वर तुझा देव, तुझा उजवा हात धरतो, मी तुला सांगतो: घाबरू नकोस; मी तुला मदत करीन.
14. हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको.
मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे.
15. पाहा, मी तुला नवीन दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे;
तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील.
16. तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील.
आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.
17. खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे;
मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही.
18. मी उतरणीवरून खाली प्रवाह आणि दऱ्यांमधून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन;
मी वाळवंटात पाण्याचे तळे आणि शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
19. मी रानात गंधसरू, बाभूळ, मेंदीचे, जैतून वृक्ष वाढतील.
मी वाळवंटात देवदारू, भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील.
20. मी हे यासाठी करीन की, लोकांनी पाहावे, ओळखावे आणि एकत्रित समजावे,
परमेश्वराच्या हाताने हे केले आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू ज्याने हे उत्पन्न केले आहे.
21. {खोट्या दैवतांना परमेश्वराचे आव्हान} PS परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा;
याकोबाचा राजा म्हणतो, आपल्या मूर्तींसाठी आपले उत्तम वादविवाद पुढे आणा.
22. त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे,
पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हास सांगा,
म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याची परिपूर्तता कशी होईल ते जाणू.
म्हणजे ह्यागोष्टी आम्हास चांगल्या कळतील.
23. भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा, म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हास समजेल;
काही तरी चांगले किंवा वाईट करा, म्हणजे आम्ही विस्मीत आणि प्रभावीत होऊ.
24. पाहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्ये काहीच नाहीत; जो कोणी तुम्हास निवडतो तो तिरस्करणीय आहे.
25. “मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे; तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो,
आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.”
26. आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे?
खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही, होय! तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही.
27. मी सियोनेला प्रथम म्हणालो, पाहा, ते येथे आहेत; मी यरूशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे.
28. जेव्हा मी पाहिले, तेथे कोणी नाही, मी त्यांना विचारले असता, एका शब्दाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कोणीही नाही,
एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कोणी नाही.
29. पाहा, त्यातले सर्व काहीच नाहीत,
आणि त्यांची कृत्ये काहीच नाहीत; त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यवतच आहेत. PE
Total 66 Chapters, Current Chapter 41 of Total Chapters 66
×

Alert

×

marathi Letters Keypad References