1. {परमेश्वर हाच एकमेव मुक्तिदाता} [PS] तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो, [QBR] भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस. [QBR]
2. जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत. [QBR] जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही. [QBR]
3. कारण मी तुझा देव परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुझा तारणारा आहे. [QBR] मी तुझ्याकरता मिसर खंडणी म्हणून दिला आहे, तुझ्यासाठी मी कूश व सबा यांची अदलाबदल केली आहे. [QBR]
4. तू माझ्या दृष्टीने मोलवान आणि विशेष आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो; [QBR] म्हणून मी तुझ्याबद्दल लोक आणि तुझ्या जिवाबद्दल दुसरे लोक देईन. [QBR]
5. घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन. [QBR]
6. मी उत्तरेला म्हणेन, त्यांना देऊन टाक; आणि दक्षिणेला म्हणेन, कोणालाही मागे धरून ठेवू नको; [QBR] माझे मुले दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या दूर सीमेपासून आण. [QBR]
7. ज्या प्रत्येकाला माझ्या नावाने बोलावले आहे, ज्याला मी माझ्या गौरवासाठी निर्मिले आहे, ज्याला मी घडविले, होय! ज्याला मी केले आहे. [QBR]
8. जे कोणी डोळे असून आंधळे व कान असून बहिरे त्यांना बाहेर आण. [QBR]
9. सर्व राष्ट्रे एकत्र जमोत आणि लोकांनी एकत्र गोळा होवोत. [QBR] त्यांच्यातील कोण हे जाहीर करेल आणि आम्हास पूर्वीच्या घडलेल्या घटनांचे घोषणा करील? [QBR] त्यांनी आपणास योग्य सिद्ध करण्यास आपले साक्षीदार आणावेत, त्यांनी ऐकून व खात्रीपूर्वक म्हणावे की हे खरे आहे. [QBR]
10. परमेश्वर जाहीर करतो, तुम्ही माझे साक्षीदार आहात आणि माझा सेवक ज्याला मी निवडले आहे, [QBR] अशासाठी की, तुम्ही जाणावे व माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मीच तो आहे हे समजावे. [QBR] माझ्या आधी कोणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही. [QBR]
11. मी, मीच परमेश्वर आहे आणि माझ्यावाचून कोणीही तारणारा नाही. [QBR]
12. मीच तारण जाहीर केले आहे, आणि घोषणा करतो आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही. [QBR] तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे. असे परमेश्वर म्हणतो. [QBR]
13. यादिवसापासून मीच तो आहे, [QBR] आणि माझ्या हातातून कोणीही सोडवू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्याने परत बदलू शकेल? [QBR]
14. परमेश्वर, तुमचा उद्धारक, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, [QBR] कारण मी तुझ्यासाठी बाबेलला निरोप पाठवीन आणि त्या सर्वांना खाली फरार करीन, [QBR] खास्द्यांचे हर्षाचे अविर्भाव विलापगीतात बदलेल. [QBR]
15. मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र प्रभू, इस्राएलाचा निर्माणकर्ता, तुमचा राजा आहे. [QBR]
16. परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो, [QBR]
17. जो रथ व घोडा, सैन्य व वीर यांना बाहेर काढून आणतो. ते एकत्रित खाली पडतात; [QBR] ते पुन्हा कधीच उठत नाहीत; ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत. [QBR]
18. पूर्वीच्या या गोष्टींबद्दल विचार करू नका, किंवा फार पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका. [QBR]
19. पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे; आता ती घडण्याची सुरवात होत आहे; तुम्ही ती पाहणार नाही का? [QBR] मी रानातून रस्ता तयार करीन आणि वाळवंटातून पाण्याचे प्रवाह वाहवीन. [QBR]
20. रानातले वनपशू कोल्हे व शहामृग मला मान देतील, [QBR] कारण मी आपल्या निवडलेल्या लोकांस पिण्यासाठी रानात पाणी आणि वाळवंटात नद्या देईन, [QBR]
21. या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी. [QBR]
22. हे याकोबा, तू मला हाक मारली नाहीस; हे इस्राएला, तू मला कंटाळला आहेस. [QBR]
23. तू मला होमार्पणासाठी आपल्या मेंढरातील एकही माझ्याकडे आणले नाहीस; [QBR] किंवा तुझ्या अर्पणाने माझा मान राखला नाहीस. मी तुझ्यावर अन्नार्पणांचा भार घातला नाही आणि तुला धूपार्पणाकरता त्रास दिला नाही. [QBR]
24. तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस. [QBR] पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे. [QBR]
25. मी, होय! मी आपल्यासाठी तुझी पापे पुसून टाकतो; तो मी, मीच आहे, आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही. [QBR]
26. जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड. [QBR]
27. तुझ्या पहिल्या पित्याने पाप केले आणि तुझ्या शिक्षकांनी माझ्याविरूद्ध अपराध केला आहे. [QBR]
28. म्हणून मी पवित्रस्थानाच्या अधिपतींना अशुद्ध करीन. मी याकोबाला बंदी असलेल्या विध्वंसाच्या हाती देईल आणि इस्राएलास शिवीगाळ करून अपमान करील. [PE]