मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
यशया
1. {#1परमेश्वर हाच एकमेव मुक्तिदाता } [QS]तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो, [QE][QS]भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस. [QE]
2. [QS]जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत. [QE][QS]जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही. [QE]
3. [QS]कारण मी तुझा देव परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुझा तारणारा आहे. [QE][QS]मी तुझ्याकरता मिसर खंडणी म्हणून दिला आहे, तुझ्यासाठी मी कूश व सबा यांची अदलाबदल केली आहे. [QE]
4. [QS]तू माझ्या दृष्टीने मोलवान आणि विशेष आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो; [QE][QS]म्हणून मी तुझ्याबद्दल लोक आणि तुझ्या जिवाबद्दल दुसरे लोक देईन. [QE]
5. [QS]घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन. [QE]
6. [QS]मी उत्तरेला म्हणेन, त्यांना देऊन टाक; आणि दक्षिणेला म्हणेन, कोणालाही मागे धरून ठेवू नको; [QE][QS]माझे मुले दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या दूर सीमेपासून आण. [QE]
7. [QS]ज्या प्रत्येकाला माझ्या नावाने बोलावले आहे, ज्याला मी माझ्या गौरवासाठी निर्मिले आहे, ज्याला मी घडविले, होय! ज्याला मी केले आहे. [QE]
8. [QS]जे कोणी डोळे असून आंधळे व कान असून बहिरे त्यांना बाहेर आण. [QE]
9. [QS]सर्व राष्ट्रे एकत्र जमोत आणि लोकांनी एकत्र गोळा होवोत. [QE][QS]त्यांच्यातील कोण हे जाहीर करेल आणि आम्हास पूर्वीच्या घडलेल्या घटनांचे घोषणा करील? [QE][QS]त्यांनी आपणास योग्य सिद्ध करण्यास आपले साक्षीदार आणावेत, त्यांनी ऐकून व खात्रीपूर्वक म्हणावे की हे खरे आहे. [QE]
10. [QS]परमेश्वर जाहीर करतो, तुम्ही माझे साक्षीदार आहात आणि माझा सेवक ज्याला मी निवडले आहे, [QE][QS]अशासाठी की, तुम्ही जाणावे व माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मीच तो आहे हे समजावे. [QE][QS]माझ्या आधी कोणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही. [QE]
11. [QS]मी, मीच परमेश्वर आहे आणि माझ्यावाचून कोणीही तारणारा नाही. [QE]
12. [QS]मीच तारण जाहीर केले आहे, आणि घोषणा करतो आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही. [QE][QS]तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे. असे परमेश्वर म्हणतो. [QE]
13. [QS]यादिवसापासून मीच तो आहे, [QE][QS]आणि माझ्या हातातून कोणीही सोडवू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्याने परत बदलू शकेल? [QE]
14. [QS]परमेश्वर, तुमचा उद्धारक, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, [QE][QS]कारण मी तुझ्यासाठी बाबेलला निरोप पाठवीन आणि त्या सर्वांना खाली फरार करीन, [QE][QS]खास्द्यांचे हर्षाचे अविर्भाव विलापगीतात बदलेल. [QE]
15. [QS]मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र प्रभू, इस्राएलाचा निर्माणकर्ता, तुमचा राजा आहे. [QE]
16. [QS]परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो, [QE]
17. [QS]जो रथ व घोडा, सैन्य व वीर यांना बाहेर काढून आणतो. ते एकत्रित खाली पडतात; [QE][QS]ते पुन्हा कधीच उठत नाहीत; ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत. [QE]
18. [QS]पूर्वीच्या या गोष्टींबद्दल विचार करू नका, किंवा फार पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका. [QE]
19. [QS]पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे; आता ती घडण्याची सुरवात होत आहे; तुम्ही ती पाहणार नाही का? [QE][QS]मी रानातून रस्ता तयार करीन आणि वाळवंटातून पाण्याचे प्रवाह वाहवीन. [QE]
20. [QS]रानातले वनपशू कोल्हे व शहामृग मला मान देतील, [QE][QS]कारण मी आपल्या निवडलेल्या लोकांस पिण्यासाठी रानात पाणी आणि वाळवंटात नद्या देईन, [QE]
21. [QS]या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी. [QE]
22. [QS]हे याकोबा, तू मला हाक मारली नाहीस; हे इस्राएला, तू मला कंटाळला आहेस. [QE]
23. [QS]तू मला होमार्पणासाठी आपल्या मेंढरातील एकही माझ्याकडे आणले नाहीस; [QE][QS]किंवा तुझ्या अर्पणाने माझा मान राखला नाहीस. मी तुझ्यावर अन्नार्पणांचा भार घातला नाही आणि तुला धूपार्पणाकरता त्रास दिला नाही. [QE]
24. [QS]तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस. [QE][QS]पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे. [QE]
25. [QS]मी, होय! मी आपल्यासाठी तुझी पापे पुसून टाकतो; तो मी, मीच आहे, आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही. [QE]
26. [QS]जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड. [QE]
27. [QS]तुझ्या पहिल्या पित्याने पाप केले आणि तुझ्या शिक्षकांनी माझ्याविरूद्ध अपराध केला आहे. [QE]
28. [QS]म्हणून मी पवित्रस्थानाच्या अधिपतींना अशुद्ध करीन. मी याकोबाला बंदी असलेल्या विध्वंसाच्या हाती देईल आणि इस्राएलास शिवीगाळ करून अपमान करील. [QE]
Total 66 अध्याय, Selected धडा 43 / 66
परमेश्वर हाच एकमेव मुक्तिदाता 1 तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस. 2 जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही. 3 कारण मी तुझा देव परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुझा तारणारा आहे. मी तुझ्याकरता मिसर खंडणी म्हणून दिला आहे, तुझ्यासाठी मी कूश व सबा यांची अदलाबदल केली आहे. 4 तू माझ्या दृष्टीने मोलवान आणि विशेष आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो; म्हणून मी तुझ्याबद्दल लोक आणि तुझ्या जिवाबद्दल दुसरे लोक देईन. 5 घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन. 6 मी उत्तरेला म्हणेन, त्यांना देऊन टाक; आणि दक्षिणेला म्हणेन, कोणालाही मागे धरून ठेवू नको; माझे मुले दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या दूर सीमेपासून आण. 7 ज्या प्रत्येकाला माझ्या नावाने बोलावले आहे, ज्याला मी माझ्या गौरवासाठी निर्मिले आहे, ज्याला मी घडविले, होय! ज्याला मी केले आहे. 8 जे कोणी डोळे असून आंधळे व कान असून बहिरे त्यांना बाहेर आण. 9 सर्व राष्ट्रे एकत्र जमोत आणि लोकांनी एकत्र गोळा होवोत. त्यांच्यातील कोण हे जाहीर करेल आणि आम्हास पूर्वीच्या घडलेल्या घटनांचे घोषणा करील? त्यांनी आपणास योग्य सिद्ध करण्यास आपले साक्षीदार आणावेत, त्यांनी ऐकून व खात्रीपूर्वक म्हणावे की हे खरे आहे. 10 परमेश्वर जाहीर करतो, तुम्ही माझे साक्षीदार आहात आणि माझा सेवक ज्याला मी निवडले आहे, अशासाठी की, तुम्ही जाणावे व माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मीच तो आहे हे समजावे. माझ्या आधी कोणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही. 11 मी, मीच परमेश्वर आहे आणि माझ्यावाचून कोणीही तारणारा नाही. 12 मीच तारण जाहीर केले आहे, आणि घोषणा करतो आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही. तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे. असे परमेश्वर म्हणतो. 13 यादिवसापासून मीच तो आहे, आणि माझ्या हातातून कोणीही सोडवू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्याने परत बदलू शकेल? 14 परमेश्वर, तुमचा उद्धारक, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, कारण मी तुझ्यासाठी बाबेलला निरोप पाठवीन आणि त्या सर्वांना खाली फरार करीन, खास्द्यांचे हर्षाचे अविर्भाव विलापगीतात बदलेल. 15 मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र प्रभू, इस्राएलाचा निर्माणकर्ता, तुमचा राजा आहे. 16 परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो, 17 जो रथ व घोडा, सैन्य व वीर यांना बाहेर काढून आणतो. ते एकत्रित खाली पडतात; ते पुन्हा कधीच उठत नाहीत; ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत. 18 पूर्वीच्या या गोष्टींबद्दल विचार करू नका, किंवा फार पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका. 19 पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे; आता ती घडण्याची सुरवात होत आहे; तुम्ही ती पाहणार नाही का? मी रानातून रस्ता तयार करीन आणि वाळवंटातून पाण्याचे प्रवाह वाहवीन. 20 रानातले वनपशू कोल्हे व शहामृग मला मान देतील, कारण मी आपल्या निवडलेल्या लोकांस पिण्यासाठी रानात पाणी आणि वाळवंटात नद्या देईन, 21 या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी. 22 हे याकोबा, तू मला हाक मारली नाहीस; हे इस्राएला, तू मला कंटाळला आहेस. 23 तू मला होमार्पणासाठी आपल्या मेंढरातील एकही माझ्याकडे आणले नाहीस; किंवा तुझ्या अर्पणाने माझा मान राखला नाहीस. मी तुझ्यावर अन्नार्पणांचा भार घातला नाही आणि तुला धूपार्पणाकरता त्रास दिला नाही. 24 तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस. पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे. 25 मी, होय! मी आपल्यासाठी तुझी पापे पुसून टाकतो; तो मी, मीच आहे, आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही. 26 जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड. 27 तुझ्या पहिल्या पित्याने पाप केले आणि तुझ्या शिक्षकांनी माझ्याविरूद्ध अपराध केला आहे. 28 म्हणून मी पवित्रस्थानाच्या अधिपतींना अशुद्ध करीन. मी याकोबाला बंदी असलेल्या विध्वंसाच्या हाती देईल आणि इस्राएलास शिवीगाळ करून अपमान करील.
Total 66 अध्याय, Selected धडा 43 / 66
×

Alert

×

Marathi Letters Keypad References