मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1. {कोरेशास नेमून दिलेली कामगिरी} [PS] परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो, [QBR] ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे, [QBR] आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील. [QBR]
2. मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन; [QBR] मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन [QBR]
3. आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन. [QBR] अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे. [QBR]
4. कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी, [QBR] मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले. [QBR]
5. मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही. [QBR] जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले. [QBR]
6. अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही. [QBR] मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही. [QBR]
7. मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; [QBR] मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.
8. {परमेश्वर हाच उत्पन्नकर्ता} [PS] हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो. [QBR] पृथ्वी ते शोषून घेवो, त्या तारणास अंकुर फुटोत [QBR] आणि त्याचबरोबर धार्मिकता एकत्रित वाढो. मी परमेश्वराने त्या दोघांना निर्मिले आहे. [QBR]
9. जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय! [QBR] मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो? [QBR]
10. जो आपल्या पित्याला म्हणतो, तू काय जन्म देतोस? किंवा स्त्रीस म्हणतो, तू काय जन्म देतेस? त्यास हायहाय! असो. [QBR]
11. इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे, [QBR] येणाऱ्या गोष्टीविषयी मला कोण विचारणार, तुम्ही माझ्या मुलांविषयी प्रश्न कराल का? तुझ्या हातच्या कामाबद्दल काय करायचे ते मला सांग? [QBR]
12. मी पृथ्वी केली व तिच्यावर माणसे निर्माण केली. [QBR] मी माझ्या हाताने आकाश पसरीले, आणि मी सर्व ताऱ्यांना दिसण्याची आज्ञा दिली. [QBR]
13. मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील. [QBR] तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला न घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. [QBR]
14. परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत, [QBR] ही तुजजवळ आणली जातील. ते तुझे होतील. ते तुझ्यामागे साखळ्यांनी बांधलेले येतील. [QBR] ते तुझ्या पाया पडून तुझ्याजवळ विनंतीकरून म्हणतील, [QBR] खात्रीने देव तुझ्याबरोबर आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही [QBR]
15. हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस. [QBR]
16. ते सर्व एकंदरीत लज्जित व फजित होतील; ज्यांनी ओतीव मूर्ती घडविल्या आहेत ते अपमानीत होऊन चालतील. [QBR]
17. पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल; [QBR] तुम्ही पुन्हा कधीही लज्जित किंवा अपमानीत होणार नाही. [QBR]
18. आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव, [QBR] ज्याने पृथ्वी निर्माण केली व घडवली, तिची स्थापना केली. [QBR] ती त्याने उजाड अशी निर्मिली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो परमेश्वर असे म्हणतो, [QBR] “मीच परमेश्वर आहे व दुसरा कोणी नाही.” [QBR]
19. मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही; [QBR] तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही. [QBR] मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे.
20. {बाबेलच्या मूर्ती आणि परमेश्वर} [PS] जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या. [QBR] जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही. [QBR]
21. त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या. [QBR] पूर्वीपासून तुम्हास हे कोणी दाखवले आहे? ते कोणी जाहीर केले? [QBR] मी, परमेश्वरानेच की नाही? तर जो मी न्यायी देव व तारणारा त्या माझ्यावाचून कोणी दुसरा देव नाही; माझ्यावाचून कोणी नाही. [QBR]
22. अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा; [QBR] कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही. [QBR]
23. मी आपली शपथ वाहीली आहे, [QBR] न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की [QBR] माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील. [QBR]
24. माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे. [QBR] जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील. [QBR]
25. इस्राएलाचा सर्व वंश परमेश्वराच्याठायी नीतिमान ठरेल; ते त्याचा अभिमान बाळगतील. [PE]

Notes

No Verse Added

Total 66 Chapters, Current Chapter 45 of Total Chapters 66
यशया 45:11
1. {कोरेशास नेमून दिलेली कामगिरी} PS परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो,
ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे,
आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील.
2. मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन;
मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन
3. आणि मी तुला अंधारातील संपत्ती दूर लपविलेली धन देईन.
अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे.
4. कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी,
मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले.
5. मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही.
जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले.
6. अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही.
मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही.
7. मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले;
मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.
8. {परमेश्वर हाच उत्पन्नकर्ता} PS हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो.
पृथ्वी ते शोषून घेवो, त्या तारणास अंकुर फुटोत
आणि त्याचबरोबर धार्मिकता एकत्रित वाढो. मी परमेश्वराने त्या दोघांना निर्मिले आहे.
9. जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय!
मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो?
10. जो आपल्या पित्याला म्हणतो, तू काय जन्म देतोस? किंवा स्त्रीस म्हणतो, तू काय जन्म देतेस? त्यास हायहाय! असो.
11. इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे,
येणाऱ्या गोष्टीविषयी मला कोण विचारणार, तुम्ही माझ्या मुलांविषयी प्रश्न कराल का? तुझ्या हातच्या कामाबद्दल काय करायचे ते मला सांग?
12. मी पृथ्वी केली तिच्यावर माणसे निर्माण केली.
मी माझ्या हाताने आकाश पसरीले, आणि मी सर्व ताऱ्यांना दिसण्याची आज्ञा दिली.
13. मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील.
तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
14. परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत,
ही तुजजवळ आणली जातील. ते तुझे होतील. ते तुझ्यामागे साखळ्यांनी बांधलेले येतील.
ते तुझ्या पाया पडून तुझ्याजवळ विनंतीकरून म्हणतील,
खात्रीने देव तुझ्याबरोबर आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही
15. हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस.
16. ते सर्व एकंदरीत लज्जित फजित होतील; ज्यांनी ओतीव मूर्ती घडविल्या आहेत ते अपमानीत होऊन चालतील.
17. पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल;
तुम्ही पुन्हा कधीही लज्जित किंवा अपमानीत होणार नाही.
18. आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव,
ज्याने पृथ्वी निर्माण केली घडवली, तिची स्थापना केली.
ती त्याने उजाड अशी निर्मिली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो परमेश्वर असे म्हणतो,
“मीच परमेश्वर आहे दुसरा कोणी नाही.”
19. मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही;
तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही.
मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे.
20. {बाबेलच्या मूर्ती आणि परमेश्वर} PS जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा या.
जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही.
21. त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या.
पूर्वीपासून तुम्हास हे कोणी दाखवले आहे? ते कोणी जाहीर केले?
मी, परमेश्वरानेच की नाही? तर जो मी न्यायी देव तारणारा त्या माझ्यावाचून कोणी दुसरा देव नाही; माझ्यावाचून कोणी नाही.
22. अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा;
कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही.
23. मी आपली शपथ वाहीली आहे,
न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की
माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील.
24. माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण सामर्थ्य आहे.
जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील.
25. इस्राएलाचा सर्व वंश परमेश्वराच्याठायी नीतिमान ठरेल; ते त्याचा अभिमान बाळगतील. PE
Total 66 Chapters, Current Chapter 45 of Total Chapters 66
×

Alert

×

marathi Letters Keypad References