1. {#1बाबेलसंबंधी न्याय } [QS]बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस; [QE][QS]खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस. [QE][QS]तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत. [QE]
2. [QS]जाते घे आणि पीठ दळ; तुझा बुरखा काढ, [QE][QS]तुझ्या झग्याचा घोळ काढून टाक, तुझे पाय उघडे कर, नद्या ओलांडून जा. [QE]
3. [QS]तुझी नग्नता उघडी होईल, होय, तुझी लज्जा दिसेल. [QE][QS]मी सूड घेईल आणि कोणा मनुष्यास सोडणार नाही. [QE]
4. [QS]“आमचा उद्धारक, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे.” [QE]
5. [QS]खास्द्यांच्या कन्ये शांत बस आणि अंधकारात जा; [QE][QS]तुला यापुढे राज्याची राणी म्हणणार नाहीत. [QE]
6. [QS]मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे [QE][QS]आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही; [QE][QS]तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे. [QE]
7. [QS]तू म्हटले, मी त्यांच्यावर सर्वोच्च राणीप्रमाणे चिरकाल राज्य करीन. [QE][QS]म्हणून तू यागोष्टी मनात घेतल्या नाहीत, किंवा यांचा परिणाम लक्षात घेतला नाही. [QE]
8. [QS]तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस, [QE][QS]जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणीच नाही; [QE][QS]मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमवल्याचा अनुभव कधी येणार नाही. [QE]
9. [QS]परंतु अपत्यहीनता व विधवापण [QE][QS]या दोन्ही गोष्टी एका दिवशी एका क्षणात तुझ्यावर येतील; [QE][QS]तुझे जादूटोणा आणि पुष्कळ मंत्रतंत्र व ताईत यांना न जुमानता तुजवर जोराने येतील. [QE]
10. [QS]तू आपल्या दुष्कृत्यांवर विश्वास ठेवलीस; तू म्हणालास, मला कोणी पाहणार नाही; [QE][QS]तुझे शहाणपण आणि ज्ञान यांनी तुला बहकावले, [QE][QS]पण तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणी नाही. [QE]
11. [QS]तुझ्यावर संकटे येतील; तुझ्या आपल्या मंत्रातंत्राने ते घालवून देण्यास तू समर्थ नाहीस. [QE][QS]तुझ्यावर विपत्ती येईल; ती तू निवारण करू शकणार नाहीस. [QE][QS]तुला समजण्या पूर्वीच अचानक तुझ्यावर संकटे येतील. [QE]
12. [QS]ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोणात [QE][QS]आपल्या लहानपणापासून विश्वासाने त्याचे पठन करून त्यामध्ये टिकून राहीला; [QE][QS]कदाचित त्यामध्ये तू यशस्वी होशील, कदाचित तू विपत्तीला घाबरून दूर होशील. [QE]
13. [QS]तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस; [QE][QS]आणि तुला जे काय घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करो. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून [QE][QS]नव चंद्रदर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत. [QE]
14. [QS]पाहा, ते धसकटाप्रमाणे होतील; अग्नी त्यांना जाळील; [QE][QS]त्यांना स्वतःला ज्वालेच्या हातातून वाचवता येणार नाही; [QE][QS]तेथे ती ज्वाला तिच्यासमोर बसण्यास किंवा हा कोळसा त्यांना शेकण्यासाठी योग्य नाही. [QE]
15. [QS]ज्यांच्यासाठी तू मेहनत केली, तुझ्या तरुणपणापासून तू त्यांच्याबरोबर व्यापार केलास; ते सर्व तुला सोडून जातील. [QE][QS]ते प्रत्येकजण आपापल्या मार्गाने भरकटले; तुला वाचवायला कोणीही नाही. [QE]