1. {नव्या गोष्टींसंबंधी भाकीत} [PS] जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. [QBR] जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, [QBR] पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही. [QBR]
2. कारण ते स्वत:ला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्राएलाच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर [QBR]
3. “मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या. [QBR] मी त्या अचानक करु लागलो, आणि त्या घडून आल्या. [QBR]
4. कारण मला माहित होते की तुम्ही हट्टी आहात, तुमच्या मानेचे स्नायु लोखंडाप्रमाणे ताठ आणि तुझे कपाळ कांस्याचे आहे. [QBR]
5. यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषीत केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले, [QBR] जेणेकरून तू असे म्हणू नये की, माझ्या मूर्तीने ती कृत्ये केली, आणि माझ्या कोरीव मूर्तीने व माझ्या ओतीव मूर्तीने ती आज्ञापिले.” [QBR]
6. तू या गोष्टी बद्दल ऐकले; हे सर्व पुरावे पहा; आणि तू, मी जे काही बोललो ते खरे आहे का ते मान्य नाही करणार? आतापासून मी तुला नव्या गोष्टी, माहीत नसलेल्या गोष्टी दाखवील्या आहेत. [QBR]
7. या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत, त्या आत्ताच अस्तित्वांत आणल्या या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत, आणि आधी तू त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाहीस. [QBR] त्यामुळे आम्हांला हे अगोदरच माहीत होते असे तू म्हणू शकणार नाही. [QBR]
8. त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही, या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहित नव्हत्या, [QBR] कारण मला माहित होते के तू फार कपट करणारा आहेस, आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस. [QBR]
9. पण माझ्या नावा करिता, आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही. [QBR]
10. पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे. [QBR]
11. माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ? [QBR] मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.
12. {परमेश्वर इस्राएलास मुक्त करील} [PS] याकोबा, माझे ऐक, आणि इस्राएला, ज्याला मी बोलाविले आहे, माझे ऐक. [QBR] मी तोच आहे, मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे. [QBR]
13. होय, माझ्याच हाताने पृथ्वीचे पाये घातले, आणि माझ्या उजव्या हाताने स्वर्गे पसरली, जेव्हा मी त्यांना हाक मारतो तेव्हा ते एकत्र उभे राहतात [QBR]
14. तुम्ही सर्व एकत्र या आणि माझे ऐका. ज्या कोणी तुमच्या मध्ये कोणी या गोष्टी सांगितल्या? [QBR] परमेश्वराची सहमती, त्याचा बाबेलविरूद्ध असणारा हेतू साध्य करीन. तो खास्द्यांविरूद्ध परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीन. [QBR]
15. मी, मी बोललो आहे, होय, मी त्यास बोलाविले आहे, मी त्यास आणले आहे आणि तो यशस्वी होईल. [QBR]
16. माझ्या जवळ या आणि हे ऐका; [QBR] प्रारंभापासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले, तेव्हा मी तीथे आहे. [QBR] आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्या ने मला पाठवले आहे. [QBR]
17. जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो, [QBR] मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो, [QBR] ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो. [QBR]
18. जर तू फक्त माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर किती बरे झाले असते! [QBR] तेव्हा भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुझी शांती असती आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे तुझे तारण असते. [QBR]
19. तुझे वंशज वाळूच्या प्रमाणे आणि तुझ्या पोटची मुले तिच्या कणांप्रमाणे झाले असते. [QBR] आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते. [QBR]
20. माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, [QBR] गायनाच्या शब्दाने तुम्ही हे कळवा, तुम्ही हे सांगा, पृथ्वीच्या अंता पर्यंत गाजवून बोला. [QBR] सांगा, परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याला खंडूण घेतले आहे. [QBR]
21. तो त्यांचे वाळवंटांतून मार्गदर्शन करत असता, त्यांना तहान लागली नाही, [QBR] त्याने खडकातून त्यांच्यासाठी पाणी वाहायला लावले, [QBR] आणि त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले. [QBR]
22. पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांस शांती नाही.” [PE]