1. {द्राक्षमळ्याचा दृष्टांत} [PS] मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे. [QBR] माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे. [QBR]
2. माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली. तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली. [QBR] त्याने मळ्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्यामध्ये द्राक्षकुंडहि खणले, [QBR] मग त्याने द्राक्षे द्यावी या अपेक्षेत होता पण त्यातून रानद्राक्षे निघाली. [QBR]
3. म्हणून आता, “यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांनो व यहूदातल्या पुरुषांनो, [QBR] माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा. [QBR]
4. मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी जे केले आहे, त्यापेक्षा मी आणखी करायला पाहीजे असते? [QBR] चांगले द्राक्ष यावे म्हणून मी त्याकडे पाहिले असता, त्याने का रानद्राक्षे उत्पन्न केले? [QBR]
5. आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन. [QBR] मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल. [QBR]
6. मी तो उजाड करीन, त्यास खच्ची करणार नाहीत व कुदळणार नाहीत, पण तण व काटेकुटे फुटतील, [QBR] तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.” [QBR]
7. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल घराणे होय. [QBR] आणि यहूदाचे पुरुष हे त्यातील आनंददायी लागवड होय. [QBR] त्याने न्यायाची वाट पाहिली, परंतु त्याऐवजी, तेथे मारणे; न्यायीपणाची वाट पाहिली, परंतू त्याऐवजी, मदतीचा आक्रोश आढळून आला.
8. {दुष्टावर येणाऱ्या आपत्ती} [PS] जे घराला घर आणि [QBR] आपण देशामध्ये रहावे म्हणून जागा न उरेपर्यंत शेताला शेत लावतात, त्यांना हाय हाय! [QBR]
9. सेनाधीश परमेश्वर माझ्याशी बोलला, [QBR] “तेथे खूप घरे रिकामी होतील, मोठी व सुंदर घरे राहणाऱ्यांशिवाय ओसाड पडतील. [QBR]
10. दहा एकर [* हे जमीन मोजण्याचे आधुनिक माप नसून एका बैलाच्या जोडीने एका दिवसात नांगरले जाऊ शकते एवढी जमीन आहे.] द्राक्षमळा एक बाथ [† साधारण 22 लिटर ] रस देईल, आणि एक होमर [‡ साधारण 160 किलोग्राम ] बी केवळ एक एफा [§ साधारण 16 किलोग्राम ] उपज देईल. [QBR]
11. सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय! [QBR] जे तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता. [QBR]
12. मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता [QBR] पण त्यांना परमेश्वराची कार्ये त्यांना दिसत नाहीत, किंवा त्याच्या हातची कामे ते विचारात घेत नाहीत. [QBR]
13. यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत, [QBR] त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही. [QBR]
14. यास्तव मृत्यूने आपली भुक वाढवली आहे आणि आपले तोंड मोठे उघडले आहे. [QBR] आणि त्यांचे उत्तम लोक, त्यांचा समुदाय, त्यांचे अधिकारी, आणि त्यांच्यातील मौजमजा करणारे आणि आनंदी, हे अधोलोकात जातील.” [QBR]
15. मनुष्यास खाली आणले आहे, महान मनुष्य नम्र केला गेला आहे, आणि गर्वीष्ठांचे डोळे खालावले आहेत. [QBR]
16. सेनाधीश परमेश्वर आपल्या न्यायात उंचावला जातो, आणि देव जो पवित्र आहे आपल्या न्यायीपणा द्वारे आपणाला पवित्र प्रकट करतो. [QBR]
17. मग मेंढ्या त्यांच्या कुरणात असल्यासारखे चरतील, आणि श्रीमंतांच्या ओसाड भूमीवर कोकरे चरतील. [QBR]
18. जे रितेपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय! [QBR]
19. जे असे म्हणतात, “देव घाई करो, तो त्वरीत कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू, [QBR] आणि इस्राएलाच्या पवित्र्याच्या योजना आकार घेऊन येवोत, म्हणजे त्या आम्ही जाणावे. त्यांना हायहाय!” [QBR]
20. जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात. [QBR] ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात, [QBR] जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय! [QBR]
21. जे स्वत:च्या नजरेत आपणास शहाणे समजतात आणि आपल्या मताने विचारवंत आहेत त्यांना हायहाय! [QBR]
22. जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मद्याचे मिश्रण करण्यात जे प्रवीण आहेत, त्यांना हायहाय! [QBR]
23. जे पैशासाठी दुष्टाला न्यायी ठरवितात, आणि निर्दोषाला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात, त्यांना हायहाय! [QBR]
24. यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते, [QBR] त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धूळीसारखा उडला जाईल. [QBR] कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला आणि इस्राएलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला. [QBR]
25. म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे, आणि त्याने आपला हात, त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे. [QBR] डोंगरसुध्दा भीतीने कापले आहेत आणि त्यांची मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडली आहेत. [QBR] हे सर्व असूनही देवाचा राग शांत झाला नाही, पण त्याचा हात लोकांस शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील. [QBR]
26. तो दूरच्या राष्ट्रांना खूण म्हणून झेंडा उंच करील आणि पृथ्वीवरच्यांसाठी तो शीळ वाजवील, [QBR] पाहा ते त्वरेने आणि तातडीने येत आहेत. [QBR]
27. त्यांच्या मध्ये कोणीच थकलेला व ठेच लागलेला असणार नाही, [QBR] त्यांचा कमरबंद कधीच सैल पडणार नाही, आणि त्यांच्या पादत्राणांचे बंद कधीच तुटणार नाहीत. [QBR]
28. त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत आणि त्यांचे धनुष्ये वाकलेली आहेत. [QBR] त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे आहेत आणि त्यांच्या रथाचे चाक वादळा प्रमाणे आहेत. [QBR]
29. त्यांची गर्जना जणूकाय सिंहाच्या गर्जनेसारखी असणार, तरूण सिंहासारखे ते गर्जना करतील. [QBR] ते गर्जतील आणि आपल्या भक्ष्याला पकडून खेचत नेतील, वाचवणारा कोणीच नसेल. [QBR]
30. त्या दिवशी जसा समुद्रगर्जना करतो त्या प्रमाणे ते आपल्या भक्ष्याविरूद्ध गर्जना करतील. [QBR] जर कोणी भूमीकडे दृष्टी लावली तर पाहा अंधार व संकट आणि तिच्यावरील अभ्रांनी प्रकाश जाऊन अंधार झालेला आहे. [PE]