1. [QS]परमेश्वर असे म्हणत आहे, [QE][QS]ज्यावरून मी तुझ्या आईबरोबर घटस्फोट घेतला त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र कोठे आहे? [QE][QS]आणि ज्याच्याकडे मी तुम्हास विकले तो सावकार कोठे आहे? [QE][QS]पाहा, तुम्हास विकले कारण तुमच्या पापामुळे आणि तुमच्या बंडखोरीमुळे, तुमच्या आईला दूर पाठविण्यात आले. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हास देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले, [QE]
2. [QS]मी आलो पण तेथे कोणीच नव्हते का? मी हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही का? [QE][QS]माझा हात तुझी खंडणी देण्यास तोकडा होता? माझ्यात तुला सोडवण्याचे सामर्थ्य नाही का? [QE][QS]पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो; मी नद्यांचे वाळवंट करतो; [QE][QS]त्यांचे मासे पाण्या अभावी मरतात आणि सडतात. [QE]
3. [QS]मी आकाशाला काळे कपडे घालतो. मी ते गोणपाटासह झाकतो. [QE]
4. {#1देवाच्या सेवकाचे आज्ञापालन } [QS]थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे. [QE][QS]तो मला सकाळी सकाळी जागे करतो; [QE][QS]तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो. [QE]
5. [QS]प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे, [QE][QS]आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही. [QE]
6. [QS]ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली [QE][QS]आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. [QE][QS]लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. [QE]
7. [QS]कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील. [QE][QS]म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही. [QE]
8. [QS]मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या. [QE]
9. [QS]पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल? [QE][QS]पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील. [QE]
10. [QS]परमेश्वराचे भय धरणारे तुमच्यात कोण आहेत? त्याच्या सेवकाची वाणी ऐकणारे कोण आहेत? [QE][QS]प्रकाशाविना गहन काळोखात कोण चालतो? [QE][QS]त्याने परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवावा आणि आपल्या देवावर अवलंबून रहावे. [QE]
11. [QS]पाहा, जे सर्व तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही स्वतःला मशालीसह सुसज्ज करता; [QE][QS]ते तुम्ही आपल्या अग्नीच्या प्रकाशात आणि तुम्ही पेटविलेल्या ज्योतीत चाला. [QE][QS]परमेश्वर म्हणतो, माझ्या हातून, हे तुमच्याकडे येईलः तुम्ही वेदनेच्या जागी खाली पडून रहाल. [QE]