1. [QS]धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि कराराचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे. [QE]
2. [QS]तो शांतीत प्रवेश करतो, जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो, तो आपल्या पलंगावर विसावा घेतो. [QE]
3. [QS]पण तुम्ही, चेटकिणीच्या मुलांनो, व्यभिचारिणी आणि जाराच्या संतानांनो, इकडे जवळ या. [QE]
4. [QS]तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता? [QE][QS]कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता? [QE][QS]तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय? [QE]
5. [QS]तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता, [QE][QS]तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्यांमध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता. [QE]
6. [QS]नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत. [QE][QS]तू तुझे पेयार्पणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पण वाहिले आहे. या गोष्टींमध्ये मी आनंद घ्यावा का? [QE]
7. [QS]तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस. [QE]
8. [QS]तू आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले, [QE][QS]तू मला निर्जन केले आहे, तू स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तू आपले अंथरूण पसरट केले. [QE][QS]तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले, तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस. [QE]
9. [QS]तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस. [QE][QS]तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस. [QE]
10. [QS]तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.” [QE][QS]आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस.
11. तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस? [QE][QS]तू माझी दखलही घेतली नाहीस किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे विचारही केला नाहीस. [QE][QS]मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरीही तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही. [QE]
12. [QS]मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेन, पण तुझी कृत्ये लक्षात घेतली असता, [QE][QS]ते तुला मदत करणार नाही. [QE]
13. [QS]जेव्हा तू रडशील, तेव्हा तुझ्या मूर्तींचा समुदाय तुला सोडवो. [QE][QS]त्याऐवजी वारा त्यांना घेऊन जाईल, श्वास त्या सर्वांना उडवून नेईल. पण जो माझ्याठायी आश्रय घेतो तो भूमीचा ताबा घेईल, [QE][QS]आणि माझा पवित्र डोंगर वतन करून घेईल. [QE]
14. [QS]तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा, [QE][QS]माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका. [QE]
15. {#1देवाचे साहाय्य व बरे करणे } [QS]कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, [QE][QS]मी उंच आणि पवित्र जागी राहतो, [QE][QS]नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला, [QE][QS]अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो. [QE]
16. [QS]कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वकाळ रागही धरणार नाही. [QE][QS]कारण मनुष्याचा आत्मा आणि मी त्यास दिलेले जीवन, हे माझ्यासमोर कमजोर होतील. [QE]
17. [QS]कारण त्याच्या लोभाच्या अन्यायामुळे मला राग आला, आणि मी त्यास शिक्षा केली. मी आपले मुख लपवले आणि मी रागावलो. [QE][QS]पण तरीही तो मागे हटला व आपल्या हृदयाच्या मार्गात चालत गेला. [QE]
18. [QS]मी त्याचे मार्ग पाहिले आहेत, [QE][QS]पण मी त्यास बरे करीन. मी त्यास मार्गदर्शन करीन आणि त्यास व त्याच्या शोक करणाऱ्यास सांत्वन देईल. [QE]
19. [QS]आणि मी त्यांच्या मुखातून आभारवचने उच्चारवीन, जो दूर आहे त्याला, [QE][QS]आणि जो जवळ आहे त्यास शांती, असो, असे परमेश्वर म्हणतो, आणि मी त्यास निरोगी करीन. [QE]
20. [QS]पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही, [QE][QS]आणि त्यांची जले हे चिखल व माती ढवळून काढतात. [QE]
21. [QS]“पाप्यांस काही शांती नाही.” असे परमेश्वर म्हणतो. [QE]