1. {#1सीयोनेचे भावी ऐश्वर्य } [QS]“उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.” [QE]
2. [QS]जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल, [QE][QS]तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल. [QE]
3. [QS]राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील. [QE]
4. [QS]तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. [QE][QS]तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील. [QE]
5. [QS]तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासीत होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल. [QE][QS]कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल. [QE]
6. [QS]मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, [QE][QS]शेबातले सर्व येतील, [QE][QS]ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील. [QE]
7. [QS]केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. [QE][QS]ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन. [QE]
8. [QS]हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात? [QE]
9. [QS]द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, [QE][QS]आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, [QE][QS]म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे. [QE]
10. [QS]विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. [QE][QS]“जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.” [QE]
11. [QS]तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. [QE][QS]ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे. [QE]
12. [QS]खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील. [QE]
13. [QS]माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, [QE][QS]देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील. [QE]
14. [QS]ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. [QE][QS]ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील. [QE]
15. [QS]“तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, [QE][QS]मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.” [QE]
16. [QS]तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, [QE][QS]मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे. [QE]
17. [QS]“मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, [QE][QS]आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.” [QE]
18. [QS]तुझ्या भूमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, [QE][QS]परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील. [QE]
19. [QS]“दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही, [QE][QS]आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही. [QE][QS]पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल, [QE][QS]आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.” [QE]
20. [QS]“तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. [QE][QS]कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल, [QE][QS]आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील.” [QE]
21. [QS]“तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, [QE][QS]माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.” [QE]
22. [QS]“जो लहान तो हजार होईल, आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी, परमेश्वर, त्या समयी हे लवकर घडवून आणणार.” [QE]