1. [QS]“मी सियोनेकरीता शांत राहणार नाही, आणि यरूशलेमेकरीता तिचा चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण जळत्या मशालीप्रमाणे निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही.” [QE]
2. [QS]मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील. [QE][QS]परमेश्वर तुला जे नवे नाव देईल, त्या नावाने तुला हाक मारतील. [QE]
3. [QS]तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील. [QE]
4. [QS]यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. [QE][QS]खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे[* हेपझीबा ]” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित [† बिऊला ]” म्हणतील. [QE][QS]कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल. [QE]
5. [QS]जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले[‡ तुझा निर्माणकर्ता ] तुझ्याशी विवाह करतील. [QE][QS]जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील. [QE]
6. [QS]हे यरूशलेमे, तुझ्या वेशीवर मी रखवालदार ठेवला आहे. [QE][QS]ते रांत्रदिवस गप्प बसणार नाहीत. [QE][QS]जे तुम्ही परमेश्वरास स्मरता, ते तुम्ही शांत बसू नका. [QE]
7. [QS]यरूशलेमेला पुन:स्थापीपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसनीय करीपर्यंत, त्यास विसावा घेऊ देऊ नका. [QE]
8. [QS]परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची आणि सामर्थ्यवान बाहूची शपथ वाहीली आहे, [QE][QS]खचित तुमचे धान्य मी तुझ्या शत्रूंना अन्न व्हायला देणार नाही. [QE]
9. [QS]जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील, [QE][QS]आणि द्राक्षे गोळा करणारा त्याचा द्राक्षरस माझ्या पवित्र भूमीवर पितील. [QE]
10. [QS]वेशीतून आत ये, लोकांचा मार्ग तयार करा! [QE][QS]बांध, मार्ग तयार कर, रस्त्यावरील दगड बाजूला काढा, राष्ट्रांकरिता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा. [QE]
11. [QS]पाहा! परमेश्वराने पृथ्वीच्या सीमेपर्यंत घोषीत केले आहे की, [QE][QS]“सियोनेच्या कन्येला सांग, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. [QE][QS]त्यांचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्यांचे प्रतिफळ त्याच्यापुढे आहे.” [QE]
12. [QS]त्यांना पवित्र लोक, “परमेश्वराने खंडणी भरून सोडवलेले” असे म्हटले जाईल [QE][QS]आणि तुला शोधलेली, न टाकलेली नगरी असे म्हटले जाईल. [QE]