1. {संदेष्ट्याच्या पुत्राचे नाव} [PS] परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर-शालाल-हाश-बज [* लुटण्यात वेगवान ] असे लिही.”
2. माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन. [PE][PS]
3. मी एका संदेष्ट्रीकडे गेलो. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला मग परमेश्वर मला म्हणाला, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव.
4. कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.” [PE][PS]
5. परमेश्वर माझ्याशी पुन्हा बोलला, [QBR]
6. “हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात, [QBR] आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात. [QBR]
7. म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील. [QBR] तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील. [QBR]
8. आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल. [QBR] हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.” [QBR]
9. अहो लोकांनो युध्द करा, पण तुमचा चुराडा होईल. दूरच्या सर्व देशांनो ऐका; [QBR] युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुराडा होईल; स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुराडा होईल. [QBR]
10. योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही, [QBR] कारण देव आम्हाबरोबर आहे. [PS]
11. {परमेश्वराचे भय धरा} [PS] परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरुन असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको, तो म्हणाला, [QBR]
12. “हे लोक कोणत्याही गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका, [QBR] ते ज्याला भितात त्यास तुम्ही भिऊ नका आणि घाबरु नका. [QBR]
13. सेनाधीश परमेश्वर, त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा [QBR] आणि तोच एक असा पवित्र आहे, की तुम्हास त्याचा धाक वाटावा. [QBR]
14. तो एक पवित्रस्थान होईल; परंतु इस्राएलाच्या दोन्ही घराण्याला तो ठेच लागणारा धोंडा व अडखण्याचा खडक [QBR] आणि यरूशलेमेतील रहिवाश्यास पाश व सापळा असा होईल. [QBR]
15. पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.” [QBR]
16. माझी साक्ष पक्की बांध [† बांधणी ही कागदाच्या गुंडाळीला गुंडाळण्याच्या आणि बांधण्याच्या कृतीचे वर्णन करते. साक्ष कदाचित यशयाच्या पूर्वीच्या शब्दांना सूचित करते, जी एक कागदाच्या गुंडाळीवर नमूद केली गेली असावी. ] , नोंद अधिकृतपणे शिक्कामोर्तब करून माझ्या शिष्यांना दे. [QBR]
17. मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन, जो याकोबाच्या घराण्यापासून आपले तोंड लपवितो; मी त्याची प्रतीक्षा करीन. [QBR]
18. पाहा, मी व मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्राएलास चिन्हे व चमत्कारांसाठी [QBR] जो सैन्याधीश परमेश्वर सीयोन पर्वतावर वसतो त्याने ठेवली आहेत. [PE][PS]
19. ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?
20. म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहीजे! ते अशा गोष्टी बोलत नाहीत कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही. [QBR]
21. ते अतिशय त्रस्त व भुकेले असे देशातून जातील. जेव्हा ते भुकेले होतील तेव्हा संतापून [QBR] आणि त्यांच्या राजाला व देवाला आपली तोंडेवर करून शाप देतील. [QBR]
22. ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील [QBR] आणि पाहा विपत्ती अंधकार व दु:खाचे निराशेचे काहूर त्यांना दिसेल. ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील. [PE]