1. {#1शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द [BR]यश. 11:1-9 } [QS]जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल. [QE][QS]मागील काळी त्याने जबुलून व नफताली प्रांताची, [QE][QS]अप्रतिष्ठा केली, [QE][QS]पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील. [QE]
2. [QS]जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे; [QE][QS]जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे. [QE]
3. [QS]तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे, [QE][QS]हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो, [QE][QS]लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत. [QE]
4. [QS]कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, [QE][QS]त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे. [QE]
5. [QS]कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे [QE][QS]व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील [QE][QS]ती अग्नीला भक्ष होतील. [QE]
6. [QS]कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; [QE][QS]आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, [QE][QS]समर्थ देव[* एल-गिभोर ], सनातन पिता, [QE][QS]शांतीचा राजा असे म्हणतील. [QE]
7. [QS]त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, [QE][QS]दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी [QE][QS]तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, [QE][QS]सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. [QE]
8. {#1इस्राएलावर परमेश्वराचा कोप } [QS]प्रभूने याकोबाच्या विरूद्ध संदेश पाठवीला; आणि तो इस्राएलाच्या ठायी प्राप्त झाला आहे. [QE]
9. [QS]सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात, [QE]
10. [QS]“विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.” [QE]
11. [QS]म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील; [QE]
12. [QS]पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील, [QE][QS]कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.
13. तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत. [QE]
14. [QS]म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील. [QE]
15. [QS]नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय. [QE]
16. [QS]जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात. [QE]
17. [QS]म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही, [QE][QS]कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते. [QE][QS]या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील. [QE]
18. [QS]दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते; [QE][QS]वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात. [QE]
19. [QS]सेनाधीश परमेश्वराच्या कडेवरुन वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे, लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत, [QE][QS]आपल्या भावाचीही कोणी मनुष्य गय करीत नाही. [QE]
20. [QS]ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत. [QE][QS]प्रत्येक जन स्वतःच्या बाहूंचे मांस खातील. [QE]
21. [QS]मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील. [QE][QS]कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील. [QE]