1. {शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द} [PS] जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल. [QBR] मागील काळी त्याने जबुलून व नफताली प्रांताची, [QBR] अप्रतिष्ठा केली, [QBR] पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील. [QBR]
2. जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे; [QBR] जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे. [QBR]
3. तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे, [QBR] हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो, [QBR] लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत. [QBR]
4. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, [QBR] त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे. [QBR]
5. कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे [QBR] व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील [QBR] ती अग्नीला भक्ष होतील. [QBR]
6. कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; [QBR] आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, [QBR] समर्थ देव [* एल-गिभोर] , सनातन पिता, [QBR] शांतीचा राजा असे म्हणतील. [QBR]
7. त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, [QBR] दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी [QBR] तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, [QBR] सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
8. {इस्राएलावर परमेश्वराचा कोप} [PS] प्रभूने याकोबाच्या विरूद्ध संदेश पाठवीला; आणि तो इस्राएलाच्या ठायी प्राप्त झाला आहे. [QBR]
9. सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात, [QBR]
10. “विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.” [QBR]
11. म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील; [QBR]
12. पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील, [QBR] कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.
13. तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत. [QBR]
14. म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील. [QBR]
15. नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय. [QBR]
16. जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात. [QBR]
17. म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही, [QBR] कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते. [QBR] या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील. [QBR]
18. दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते; [QBR] वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात. [QBR]
19. सेनाधीश परमेश्वराच्या कडेवरुन वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे, लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत, [QBR] आपल्या भावाचीही कोणी मनुष्य गय करीत नाही. [QBR]
20. ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत. [QBR] प्रत्येक जन स्वतःच्या बाहूंचे मांस खातील. [QBR]
21. मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील. [QBR] कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील. [PE]