1. {#1अधोगतीस चाललेल्या इस्त्राएलाची परमेश्वराने केलेली मनधरणी }
2. [PS]परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, [PE][QS]“जा आणि यरूशलेमेच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो, [QE][QS]तुझ्याविषयी तुझ्या तरूणपणाची निष्ठा, तुझ्या वाडनिश्चयाची प्रिती, [QE][QS]जेव्हा तुम्ही वाळवंटातून आणि पडीत जमिनीतून माझ्यामागे आलात, हे माझ्या ध्यानात आहे. [QE]
3. [QS]इस्राएल परमेश्वरास पवित्र होते, त्याच्या उत्पन्नांचे प्रथम फळ. [QE][QS]जो कोणी या प्रथम फळातील खातो तो पाप करतो, त्यांच्यावर आपत्ती येईल, असे परमेश्वर म्हणतो.” [QE]
4. [QS]याकोबाच्या घराण्यांनो आणि इस्राएलाच्या घराण्याच्या सर्व कुळांनो, परमेश्वराचे वचन ऐका. [QE]
5. [QS]परमेश्वर असे म्हणतो: “तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले, जे ते माझ्यापासून दूर गेले आणि, [QE][QS]कवडी मोल दैवतांच्या मागे जाऊन ते पण स्वत: कवडीमोल झाले? [QE]
6. [QS]कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे? [QE][QS]ज्याने आम्हांला रानांतून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून, [QE][QS]जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हांला पार नेले. [QE][QS]तो परमेश्वर कोठे आहे?” [QE]
7. [QS]पण मी तुम्हास कर्मेलाच्या भूमीत आणले ह्यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टीं खाव्या. [QE][QS]तरीही तुम्ही माझी ही भूमी विटाळवीली, तुम्ही माझा वारसा घृणास्पद केला. [QE]
8. [QS]“याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. आणि नियमशास्त्रातील तज्ञांना माझ्या बद्दल काळजी नाही! [QE][QS]राज्यकर्त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला, संदेष्ट्यांनी बआल देवाच्या नावाने याच्या नावे भविष्य वर्तविले आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.” [QE]
9. [QS]म्हणून मी अजूनही तुमच्यावर दोषारोप ठेवणार आहे आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन, परमेश्वर असे म्हणतो. [QE]
10. [QS]कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा, [QE][QS]कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा! [QE]
11. [QS]काय राष्ट्रांनी देवांची अदलाबदली केली, जरी ते देव नसले तरी? [QE][QS]पण माझ्या लोकांनी जे काही मदत करू शकत नाही त्याच्याशी आपल्या वैभवाची अदलाबदली केली आहे. [QE]
12. [QS]“आकाशांनो, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भितीने थरकाप होऊ दे.” असे परमेश्वर म्हणतो. [QE]
13. [QS]कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत. [QE]
14. [QS]“इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे? [QE]
15. [QS]तरुण सिंहांनी त्याच्याविरुध्द डरकाळ्या फोडल्या आहेत. त्यांनी मोठा आवाज केला आहे आणि त्यांनी त्याची भूमी भयानक अशी केली आहे. [QE][QS]त्याच्या शहरांचा नाश झाला आहे, त्यामध्ये कोणी रहिवाशी नाही. [QE]
16. [QS]नोफ आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत. [QE]
17. [QS]तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय? [QE][QS]जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता, तेव्हा तुम्हीच त्यास सोडले. [QE]
18. [QS]तर आता, शिहोराचे [* नाईल ]पाणी पिण्यास मिसरच्या रस्त्यात तुला काय काम आहे? [QE][QS]आणि फरात नदीचे पाणी पिण्यासाठी अश्शूराची वाट का धरावी? [QE]
19. [QS]तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर, [QE][QS]मी, परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे, आणि तुझ्या ठायी माझे भय नाही हे किती वाईट आणि कडू आहे!” प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. [QE]
20. [QS]“कारण फार वर्षांपूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तोडली. तरी तू म्हणालीस, [QE][QS]‘मी तुझी सेवा करणार नाही.’ तर प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील तू व्यभिचारीणीप्रमाणे वाकलीस. [QE]
21. [QS]पण मी, माझ्याकरिता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले, [QE][QS]तर आता तू बदलून माझ्यासाठी विश्वासघातकी अशा परक्या जातीच्या द्राक्षवेलीप्रमाणे झाली आहे. [QE]
22. [QS]जरी तू स्वत:ला नदी मध्ये स्वच्छ केलेस किंवा खूप साबणाने आपणाला धूतले, [QE][QS]तरी तुझ्या अपराधाचा डाग माझ्या समोर आहे,” असे सेनाधीश परमेश्वर देव म्हणतो. [QE]
23. [QS]“मी अशुद्ध नाही, मी बआल दैवताच्या मागे गेली नाही” असे तू मला कसे म्हणू शकतेस? [QE][QS]तू दरीमध्ये केलेल्या वर्तनाकडे पाहा! तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरुन दुसऱ्या जागी धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस. [QE]
24. [QS]जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुंगते तशी तू आहेस. [QE][QS]ती माजावर असताना कोण तिला परतवील? जे तिला शोधतात ते आपणास श्रम देणार नाहीत. तिच्या ऋतूत ती त्यांना सापडेल. [QE]
25. [QS]तू आपल्या पायांना अनवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषीत होण्यापासून आवरून धर. [QE][QS]पण तू म्हणतेस, आशा नाही, नाही, मी परक्यांवर प्रीती केली आहे आणि मी त्यांच्या मागे जाईलच. [QE]
26. [QS]चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जीत होतो, त्याचप्रमाणे इस्राएलाचे घराने लाजले आहे. [QE][QS]ते, त्यांचे राजे आणि त्यांचे अधिकारी, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत. [QE]
27. [QS]हे त्यातील एक आहेत जे झाडाला म्हणतात, “तू माझा बाप आहेस” आणि खडकाला बोलतात की, “तू मला जन्म दिला आहेस.” [QE][QS]कारण त्यांनी आपली पाठ माझ्याकडे फिरवली आहे, त्यांचे तोंड नाही. असे असले तरी, ते आपल्या संकटात म्हणतील, “उठ आणि आम्हांला तार.” [QE]
28. [QS]तर तुम्ही स्वत:साठी घडविलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हास सोडावयास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे. [QE][QS]कारण हे यहूदा, तुझ्या शहरांइतक्या तुझ्या मूर्त्या आहेत! [QE]
29. [QS]“तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरूद्ध पाप केले आहेत,” असे परमेश्वर म्हणतो. [QE]
30. [QS]“तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही, [QE][QS]नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यावाद्यांना खाऊन टाकले.” [QE]
31. [QS]जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? [QE][QS]“आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात? [QE]
32. [QS]कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोषाख विसरेल काय? [QE][QS]पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत. [QE]
33. [QS]प्रिती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस, [QE][QS]असे करून तू दुष्ट स्रियांनाही आपले मार्ग शिकवले आहेस. [QE]
34. [QS]गरीब व निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे. [QE][QS]तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत. [QE]
35. [QS]या सर्व गोष्टी असूनही उलट तू म्हणतेस, “मी निरपराध आहे. खरोखर परमेश्वराचा क्रोध माझ्यावरून फिरला आहे.” [QE][QS]पण पाहा, “मी पाप केले नाही” या अशा बोलण्यावरून तुझा न्याय होणार. [QE]
36. [QS]तू आपला मार्ग बदलणे हे एवढे हलक्याने का घेतीस? [QE][QS]अश्शूरविषयी जशी तू निराश झालीस, तशी तू मिसरविषयीही निराश होशील. [QE]
37. [QS]आणि तू आपले हात आपल्या डोक्यावर घेऊन तेथूनही उदास अशी निघून जाशील. [QE][QS]कारण ज्यांच्यावर तुझा भरवसा होता त्यांना परमेश्वराने नाकारले, म्हणून तुला त्यांच्याकडून काहीच मदत होणार नाही. [QE]