मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
यिर्मया
1. {#1यरूशलेमेच्या नाशाचे भाकीत } [PS]यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिद्कीयाने मल्कीयाचा मुलगा पशहूर आणि मासेया याचा मुलगा सफन्या याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठवले. त्याने म्हटले,
2. “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील व त्यास आमच्यापासून परतवून लावेल.”
3. यिर्मया त्यांना म्हणाला, “सिद्कीया राजाला असे सांगा,
4. परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो पाहा! तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन. बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरूशलेममध्ये आणीन.
5. मी माझ्या सामर्थ्यवान हाताने, क्रोधाने व रोशाने व मोठ्या कोपाने तुमच्याशी युद्ध करीन.
6. मी त्या शहरात राहणाऱ्यांना व मनुष्यांना व प्राण्यांना मारीन. ते मोठ्या रोगराई ने मरतील.
7. परमेश्वर असे म्हणतो, त्यानंतर, मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना, आणि जो कोणी मरीपासून, तलवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल, त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन.
8. आणि तू या लोकांस सांग, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा! जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हापुढे ठेवतो,
9. जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल.
10. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी आपले मुख या शहराच्याविरूद्ध चांगल्यासाठी नाही तर त्याच्या वाईटासाठी केले आहे. मी बाबेलाच्या राजाला ते देऊन टाकीन. तो ते आगीत भस्मसात करील. [PE]
11. {#1यहूदाच्या राजांविरुद्ध भविष्ये }
12. [PS]यहूदाच्या राजाच्या घराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका. [PE][QS]दावीदाच्या घराण्या, परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही सकाळी न्याय करा. [QE][QS]जो लूटलेला त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडवा. नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा रोष अग्नीप्रमाणे बाहेर निघेल आणि त्यास कोणीही विझवू शकणार नाही. [QE]
13. [QS]खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरूद्ध आहे. [QE][QS]जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार? [QE]
14. [QS]परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हास शिक्षा करीन. आणि मी तिच्या वनात अग्नी पेटवीन तेव्हा ते सभोवतीचे सर्वकाही जाळून टाकेल.” [QE]
Total 52 अध्याय, Selected धडा 21 / 52
यरूशलेमेच्या नाशाचे भाकीत 1 यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिद्कीयाने मल्कीयाचा मुलगा पशहूर आणि मासेया याचा मुलगा सफन्या याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठवले. त्याने म्हटले, 2 “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील व त्यास आमच्यापासून परतवून लावेल.” 3 यिर्मया त्यांना म्हणाला, “सिद्कीया राजाला असे सांगा, 4 परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो पाहा! तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन. बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरूशलेममध्ये आणीन. 5 मी माझ्या सामर्थ्यवान हाताने, क्रोधाने व रोशाने व मोठ्या कोपाने तुमच्याशी युद्ध करीन. 6 मी त्या शहरात राहणाऱ्यांना व मनुष्यांना व प्राण्यांना मारीन. ते मोठ्या रोगराई ने मरतील. 7 परमेश्वर असे म्हणतो, त्यानंतर, मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना, आणि जो कोणी मरीपासून, तलवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल, त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन. 8 आणि तू या लोकांस सांग, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा! जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हापुढे ठेवतो, 9 जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल. 10 परमेश्वर असे म्हणतो, कारण मी आपले मुख या शहराच्याविरूद्ध चांगल्यासाठी नाही तर त्याच्या वाईटासाठी केले आहे. मी बाबेलाच्या राजाला ते देऊन टाकीन. तो ते आगीत भस्मसात करील. यहूदाच्या राजांविरुद्ध भविष्ये 11 12 यहूदाच्या राजाच्या घराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका. दावीदाच्या घराण्या, परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही सकाळी न्याय करा. जो लूटलेला त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडवा. नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा रोष अग्नीप्रमाणे बाहेर निघेल आणि त्यास कोणीही विझवू शकणार नाही. 13 खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरूद्ध आहे. जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार? 14 परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हास शिक्षा करीन. आणि मी तिच्या वनात अग्नी पेटवीन तेव्हा ते सभोवतीचे सर्वकाही जाळून टाकेल.”
Total 52 अध्याय, Selected धडा 21 / 52
×

Alert

×

Marathi Letters Keypad References