1. {#1चांगल्या आणू वाईट अंजिरांवरून धडा } [PS]परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकोन्याला व यहूदाचे सरदार व कारागीर व लोहार कैद करून नेले, यरूशलेममधून बाबेलला नेले)
2. एका टोपलीत खूप चांगली अंजीर होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजीर होती. ती खाण्यालायक नव्हती.
3. परमेश्वराने मला विचारले, “यिर्मया, तू काय पाहिलेस?” मी म्हणालो, “मी अंजीर पाहिली. चांगली अंजीर फारच उत्तम आहेत. पण वाईट अंजीर फारच नासकी आहेत. ती खाण्यासारखी नाहीत.”
4. नंतर परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले,
5. परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणाला, “या चांगल्या अंजीरासारखे यहूदा जे कैद करून नेलेले मी स्थानातून खास्द्यांच्या देशात त्यांच्या हितासाठी पाठवले आहे, त्यांच्याकडे मी पाहीन.
6. मी आपले डोळे त्यांच्या चांगल्या करीता लावेन आणि त्यांना या देशात प्रस्थापीत करीन. मी त्यांना खाली पाडणार नाही तर त्यांना बांधीन, मी त्यांना लावीन व उपटनार नाही.
7. मला ओळखण्याचे हृदय मी त्यांना देईल, मग मी परमेश्वर आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. ते सर्व अंत:करणापासून माझ्याकडे परत येतील. [PE]
8. [PS]पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरूशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी त्याना मी सोडून देईन, असे परमेश्वर म्हणतो.
9. मी त्यांना एक भयावह गोष्ट बनवीन, मी त्यांना सर्व मानवजातीच्या दृष्टीत अरिष्ट असे करीन, ते जीथे घालवले जातील तीथे ते चेष्टेचा व निंदा, म्हण व शाप असे होतील.
10. मी त्यांच्याविरुद्ध तलवार, दुष्काळ आणि रोगराई पाठवीन, मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत असे करीन.” [PE]