मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यिर्मया
1. {यिर्मयाला मृत्यूची भीती} [PS] योशीयाचा मुलगा, यहोयाकीम, यहूदाचा राजा ह्याच्या राज्याच्या आरंभी परमेश्वराकडून हे वचन आले, ते म्हणाले,
2. परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल, एक शब्द कमी करु नको.
3. कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन.
4. तू त्यांना सांग ‘परमेश्वर असे म्हणतो: जर तुम्ही माझ्या नियमशास्त्राप्रमाणे ऐकले नाही, जे मी तुम्हा समोर ठेवले आहे,
5. जर तुम्ही माझ्या सेवकांचे जे संदष्टे आहेत, ज्यांना मी तुम्हाकडे नित्याने पाठवत आलो आहे, त्यांचे ऐकले नाही.
6. तर मी हे घर शिलोसारखे करीन, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन.”
7. परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले.
8. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, तू खचित मरशील!
9. शिलोच्या मंदिराप्रमाणे या घराचा नाश होईल आणि हे नगर निर्जन असे होईल, ज्यात कोणीच राहत नाही, परमेश्वराच्या नावाने तू हे भविष्य का सांगितले? आणि परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
10. यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिकत कळली, म्हणून ते राज्याचा घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानांवर बसले.
11. नंतर याजक व संदेष्टे अधिकाऱ्यांशी व सर्व लोकांशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरूशलेम शहराबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे तुमच्या स्वत:च्या कानांनी ऐकलेच आहे.”
12. मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले.
13. तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थीत करा, आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव, याची वाणी ऐका, म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचीत फेरविचार करीन.
14. माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हास योग्य व बरोबर वाटेल ते माझ्यासोबत करा.
15. पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.”
16. मग अधिकारी आणि सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना बोलले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराच्या नावाने आम्हाला ही वचने घोषीत केली आहे.”
17. नंतर काही वडीलधारी उभे राहिले आणि ते सभेतील सर्व लोकांस उद्देशून म्हणाले,
18. “ते म्हणाले, मोरेष्टचा मीखा, हा हिज्कीया यहूदाचा राजाच्या दिवसात भविष्यसांगत असे. तो यहूदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरूशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडी सारखी होईल.”
19. “तर हिज्कीया यहूदाचा राजा आणि सर्व यहूदाने मीखाला ठार मारले काय? त्याने परमेश्वराबद्दल भय बाळगले की नाही? आणि त्याने परमेश्वराचा राग शांत केला, आणि त्याच्याविरुध्द जे अरिष्ट परमेश्वराने योजिले होते, त्या गोष्टी त्याने घडू दिल्या नाहीत. अशाने तर आम्ही आपल्याच जिवाविरूद्ध मोठे पाप करु.”
20. पूर्वी आणखी एक मनुष्य, किर्याथ-यारीमकर, शमायाचा मुलगा, उरीया, हा परमेश्वराच्या नावाने भविष्य सांगत होता. त्याने या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच भविष्य सांगितले आहेत.
21. परंतू राजा यहोयाकीम, त्याचे सर्व सैन्य व अधिकाऱ्याने हे वचन ऐकले आणि यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता, हे उरीयाला समजल्यावर तो घाबरला व मिसर देशात पळाला.
22. पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या मनुष्याबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठवले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता,
23. त्या मनुष्यांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्यास यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर सामान्य लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत पाठवण्यात आले.
24. पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्या हातातून सोडवले, जे त्यास मारणार होते. [PE]

Notes

No Verse Added

Total 52 अध्याय, Selected धडा 26 / 52
यिर्मया 26:53
यिर्मयाला मृत्यूची भीती 1 योशीयाचा मुलगा, यहोयाकीम, यहूदाचा राजा ह्याच्या राज्याच्या आरंभी परमेश्वराकडून हे वचन आले, ते म्हणाले, 2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल, एक शब्द कमी करु नको. 3 कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन. 4 तू त्यांना सांग ‘परमेश्वर असे म्हणतो: जर तुम्ही माझ्या नियमशास्त्राप्रमाणे ऐकले नाही, जे मी तुम्हा समोर ठेवले आहे, 5 जर तुम्ही माझ्या सेवकांचे जे संदष्टे आहेत, ज्यांना मी तुम्हाकडे नित्याने पाठवत आलो आहे, त्यांचे ऐकले नाही. 6 तर मी हे घर शिलोसारखे करीन, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन.” 7 परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले. 8 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, तू खचित मरशील! 9 शिलोच्या मंदिराप्रमाणे या घराचा नाश होईल आणि हे नगर निर्जन असे होईल, ज्यात कोणीच राहत नाही, परमेश्वराच्या नावाने तू हे भविष्य का सांगितले? आणि परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले. 10 यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिकत कळली, म्हणून ते राज्याचा घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानांवर बसले. 11 नंतर याजक व संदेष्टे अधिकाऱ्यांशी व सर्व लोकांशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरूशलेम शहराबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे तुमच्या स्वत:च्या कानांनी ऐकलेच आहे.” 12 मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले. 13 तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थीत करा, आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव, याची वाणी ऐका, म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचीत फेरविचार करीन. 14 माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हास योग्य व बरोबर वाटेल ते माझ्यासोबत करा. 15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.” 16 मग अधिकारी आणि सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना बोलले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराच्या नावाने आम्हाला ही वचने घोषीत केली आहे.” 17 नंतर काही वडीलधारी उभे राहिले आणि ते सभेतील सर्व लोकांस उद्देशून म्हणाले, 18 “ते म्हणाले, मोरेष्टचा मीखा, हा हिज्कीया यहूदाचा राजाच्या दिवसात भविष्यसांगत असे. तो यहूदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरूशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडी सारखी होईल.” 19 “तर हिज्कीया यहूदाचा राजा आणि सर्व यहूदाने मीखाला ठार मारले काय? त्याने परमेश्वराबद्दल भय बाळगले की नाही? आणि त्याने परमेश्वराचा राग शांत केला, आणि त्याच्याविरुध्द जे अरिष्ट परमेश्वराने योजिले होते, त्या गोष्टी त्याने घडू दिल्या नाहीत. अशाने तर आम्ही आपल्याच जिवाविरूद्ध मोठे पाप करु.” 20 पूर्वी आणखी एक मनुष्य, किर्याथ-यारीमकर, शमायाचा मुलगा, उरीया, हा परमेश्वराच्या नावाने भविष्य सांगत होता. त्याने या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच भविष्य सांगितले आहेत. 21 परंतू राजा यहोयाकीम, त्याचे सर्व सैन्य व अधिकाऱ्याने हे वचन ऐकले आणि यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता, हे उरीयाला समजल्यावर तो घाबरला व मिसर देशात पळाला. 22 पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या मनुष्याबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठवले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता, 23 त्या मनुष्यांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्यास यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर सामान्य लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत पाठवण्यात आले. 24 पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्या हातातून सोडवले, जे त्यास मारणार होते.
Total 52 अध्याय, Selected धडा 26 / 52
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References