1. {यहोयामाकीची व्यर्थ आशा} [PS] आता यहोयाकीमचा मुलगा कोन्या याच्याऐवजी, योशीयाचा मुलगा सिद्कीया हा राजा म्हणून राज्य करीत होता. बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने, सिद्कीयाला यहूदा देशावर राजा केले होते.
2. पण सिद्कीया, त्याच्या सेवकांनी व यहूदा देशाच्या लोकांनी परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जी वचने सांगितली होती ती त्यांनी ऐकली नाहीत. [PE][PS]
3. म्हणून राजा सिद्कीयाने शलेम्याचा मुलगा यहूकल व मासेया याजकाचा मुलगा सफन्या ह्यांना पाठवून यिर्मया संदेष्ट्याकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, “तू, आमच्यावतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर.”
4. आता यिर्मया लोकांमध्ये येत व जात होता, कारण आतापर्यंत त्यास बंदिशाळेत टाकले नव्हते.
5. मिसरातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खास्द्यांनी यरूशलेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरूशलेम सोडून गेले. [PE][PS]
6. नंतर यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
7. “परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, तुम्ही यहूदाच्या राजाला हे सांगा, कारण माझ्यापासून सल्ला घेण्यासाठी तुम्हास माझ्याकडे पाठविले आहे, पाहा, फारोचे सैन्य, तुम्हास मदत करण्यासाठी आले, त्यांना स्वतःच्या मिसर देशात परत जावे लागेल.
8. खास्दी परत येतील. ते या नगराविरूद्ध लढतील, ते जिंकून जाळतील. [PE][PS]
9. परमेश्वर असे म्हणतो, खास्दी आम्हापासून निघून जातील असे म्हणून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नका. कारण ते निघून जाणार नाहीत.
10. जरी तुम्हाशी लढणाऱ्या संपूर्ण खास्दी सैन्यावर तुम्ही हल्ला केला, फक्त जखमी माणसे त्यांच्या तंबूत उरले, तरीसुद्धा ते उठून हे शहर जाळतील.” [PE][PS]
11. जसे फारोचे सैन्य येत होते, तेव्हा खास्द्यांच्या सैन्याने, यरूशलेम सोडले,
12. तेव्हा यिर्मया, यरूशलेमेतून बन्यामिनाच्या देशात गेला. तो त्याच्या लोकां मध्ये प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी जाण्यास निघाला.
13. तो जसा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहताच, तेथे पहारेकऱ्यांचा प्रमुख होता. तेव्हा हनन्याचा मुलगा शलेम्या याचा मुलगा इरीया त्याचे नाव होते. त्याने यिर्मया संदेष्ट्याला धरले व म्हणाला, “तू फितून खास्द्यांकडे जात आहेस.” [PE][PS]
14. परंतु यिर्मया म्हणाला, “हे खरे नाही. मी फितून खास्द्यांकडे जात नाही” पण इरीयाने त्याचे ऐकले नाही. त्यांने यिर्मयाला घेतले आणि अधिकाऱ्यांकडे आणले.
15. ते अधिकारी यिर्मयावर रागावले. त्यांनी त्यास मारले आणि त्यास बंदिशाळेत ठेवले, जे योनाथान लेखक याचे घरच होते, कारण ते त्यांनी बंदिशाळेत बदलेले होते. [PS]
16. {सिद्कीया यिर्मयाशी विचारविनिमय करतो} [PS] म्हणून यिर्मयाला तळघरातील कोठडीत ठेवले, तेथे तो पुष्कळ दिवस राहिला.
17. मग सिद्कीया राजाने कोणाला तरी बोलाविणे पाठवून त्यास राजावाड्यात आणले. त्याच्या घरात राजाने एकांतात त्यास विचारले, “परमेश्वराकडून काही वचन आहे का?” यिर्मया म्हणाला, “आहे, व पुढे म्हणाला, तुला बाबेलाच्या राजाच्या हाती दिले जाईल.” [PE][PS]
18. मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “मी तुझ्याविरूद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरूद्ध व यरूशलेमेच्या लोकांविरूद्ध काय पाप केले आहे म्हणून मला बंदिशाळेत टाकले आहेस?
19. तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही?
20. पण आता, हे माझ्या स्वामी राजा ऐक, माझी विनंती तुझ्यासमोर येवो. तू मला परत योनाथान लेखकाच्या घरी पाठवू नकोस, किंवा मी तेथे मरेन.” [PE][PS]
21. म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला. [PE]